दौंड प्रतिनिधी दि २१ दौंड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
माजी आमदार रमेश किसन थोरात, सभापती आशा शितोळे,पंचायत समिती दौंड उपसभापती नितीन दोरगे,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रयत्नातून दौंड पंचायत समितीच्या नूतन ईमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे.
दौंड शहरात मध्यवर्ती ठिकाणी पंचायत समिती नुतन ईमारत होण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.
वेळोवेळी पाठपूरावा करत असताना दादांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस करत ७ कोटी रूपयांच्या या कामास प्रशासकिय मंजूरी मिळाली आहे.