केडगाव प्रतिनिधी : ता.२० मार्च
पुणे सोलापूर महामार्गावर (२० मार्च) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जखमी तर एक जागीच ठार झाले आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.अपघात झालेले इसम हे शिंदावणे येथे नातेवाईकाच्या अंत्यविधी साठी गेले होते.परंतु घरी परत येत असताना यांच्यावरच काळाने घाला घातला आहे. हे इसम शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील असल्याचे समजले आहे.
या जखमी झालेल्या इसमास पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.