यवत प्रतिनिधी : ता.१३ मार्च २०२०
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदूर गावच्या महालक्ष्मी मोबाईल शॉपी समोर एकावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांनी अटक केली आहे.
सदर हकीकत अशी की विक्रम बबन चौगुले वय वर्षे 26 धंदा चायनीज हॉटेल राहणार नांदूर साई कृपा बिल्डिंग तालुका दौंड जिल्हा पुणे यांस ता.६/३/२०२० रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान नांदूर गावच्या हद्दीतील महालक्ष्मी मोबाईल शॉपी समोरील नांदूर रोड वर तालुका दौंड जिल्हा पुणे येथील तरुण भरत अनिल शिंदे वय २२ वर्षे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे व इतर त्याचे तीन साथीदारांनी हॉटेलच्या वादाच्या कारणावरून रस्त्यात अडवून लोखंडी रॉड, कुर्हाडीने व बांबूच्या काठीने फिर्यादी विक्रम चौगुले यांचे डोक्यात, तोंडावर हातापायावर मारहान करून गंभीर जखमी केले अशी फिर्याद दाखल करण्यात आली.त्यानुसार तारीख ७/३/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी भरत शिंदे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे हा गुन्हा केल्यापासून फरार होता त्याबाबत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आरोपीचा शोध घेणे बाबत धनंजय कापरे पोलीस उपनिरीक्षक, दशरथ बनसोडे पोलीस नाईक, संतोष पंडित पोलीस नाईक यांचे एक खास पथक तयार करून आरोपी अटक करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा उरुळी कांचन तालुका हवेली परिसरात येणार असल्याची माहिती सदर पथकास मिळाल्याने आरोपीच्या शोधात पोलिस पथक गेले होते.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तारीख ११/३/२०२० रोजी पोलीस नाईक दशरथ बनसोडे, संतोष पंडित, रमेश चव्हाण यांनी आरोपी भरत शिंदे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तालुका हवेली पीएमटी बस स्टॉप येथून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहे.