पुणे प्रतिनिधी ता:
३० मार्च २०२०
कोरोना
व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.मात्र, यामुळे अनेकांचं जीवन विस्कळीत झालं आहे.लॉकडाऊन
दरम्यान बेघर आणि हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहेत.हे ओळखून
त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून पुण्यातील मिरॅकल एड
फाऊंडेशनने शहरात गरजूंना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.
पहिल्या दिवशी
पुण्यातील विविध भागांत २०० लोकांना मोफत जेवण वितरित करण्यात आलं आणि आजपासून
पुढील २० दिवस रोज ५०० लोकांचं जेवण वितरित करण्यात येणार आहे.पुणे शहरातील बाहेर गावाहून
शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.या लॉकडाऊन दरम्यान सर्व
मेस बंद असल्याकारणाने त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत असे विद्यार्थी, फुटपाथवर राहणारे, बेघर, गरजू आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस बांधवांसाठी मोफत जेवण दिलं जात आहे.
मिरॅकल एड
फाउंडेशन ट्रस्ट आणि इतर मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पुढचे २० दिवस रोज ५०० लोकांसाठी तयार जेवण
आणि काही फूड पॅकेट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल
हिरेमठ यांनी दिली. या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी पुढे
येऊन शासनाला सहकार्य करण्याचं आणि या कामात हातभार लावण्याचं आवाहनही त्यांनी
केलंय.