पारगाव प्रतिनिधी : ता.०९ मार्च २०२०
यात्रा या संकल्पनेला ग्रामीण महाराष्ट्रात वेगळे स्थान आहे. लोकांच्या मनाला आनंद देणारा आणि आंतरमनाला साद घालणारा हा उत्सव असाच उत्सव नानगाव (मांगोबा माळ) ता.दौंड येथे होळी पौर्णिमा निमित्त श्री मांगोबा महाराज यात्रा उत्सव (ता.०९) रोजी पासून सुरू होत आहे.नानगाव व दापोडी शिवेवरती असलेल्या श्री मांगोबा महाराजांचे मंदिर आहे.
दरवर्षी या उरुसास अनेक भाविक भक्त दर्शनास या ठिकाणी येत असतात.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ वा अभिषेख,५ वा सायंकाळी होळी पेटवणे,६ ते ९ वा श्री मांगोबा महाराज नानगाव ते देवस्थान सवाद्य मिरवणूक,९.३० वा ईश्वर बापू पिंपरीकर सह गणेश कुमार महेश कुमार पिंपरीकर लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष सहकार्य म्हणून सुरेश महाराज खळदकर,आनंद कदम व बाळासाहेब खळदकर यांचे असते अशी माहिती यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य राहुल वळू यांनी दिली आहे.
यावेळी मा.ग्रा.पं सदस्य विकास आढागळे,मच्छीन्द्र आढा गळे, गणेश शेंडगे,सागर आढागळे, अक्षय आढागळे, दिपक पाटोळे,सुनील आढागळे व आदी मान्यवर उपस्थित होते.