Friday, March 27, 2020

कर्जाचे हफ्ते तीन महिन्यानंतर भरले तरी चालतील - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास



मुंबई | डी न्यूज लाईव्ह वृत्त सेवा : कोरोनामुळे घाबरलेल्या नागरिकांना रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाने दिलासा दिला असून सर्व कर्जांचे हप्ते तीन महिन्यांसाठी नाही भरले तरी चालतील, अशी घोषणा केली. तसेच व्याजदरात (रेपो रेट) 0.75 टक्क्यांनी कट केल्याने अनेकांच्या कर्जांचे हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत आज घोषणा केली. कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे दास यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल 1.70 लाख कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आज आरबीआयने घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. गृह, वाहन, उद्योग, या साठीच्या कर्जदारांना याचा उपयोग होईल