Monday, March 23, 2020

राज्यात आजपासून संचारबंदी | जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


डी न्यूज लाईव्ह वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करून संपूर्ण राज्यात नाईलाजाने संचारबंदी लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की,यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहतील,सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा प्रार्थनास्थळंही आजपासून बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गर्दी नाही म्हणजे नाहीच असे ठणकावले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं आणि घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाणार आहे.

“घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या निर्बुद्धांमुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही.

सगळे मिळून या संकटावर मात करु असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केली आहे.