Saturday, February 29, 2020

मढी येथील मानाच्या होळीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील - नंदकुमार पवार

पाथर्डी  प्रतिनिधी : ता.२९ फेब्रु 

श्री क्षेत्र मढी या ठिकाणी कानिफनाथ महाराज मंदिर असून भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून या ठिकाणाला महत्व आहे.सदर मंदिराचे बांधकाम करण्याकामी गोपाळ समाजाची महत्वाची भूमिका होती.त्यामुळे गोपाळ समाजाला होळीच्या दिवशी सर्वप्रथम होळी पेटवण्याचा मान असतो.
श्री क्षेत्र मढी या ठिकाणाची मानाची होळी पेटवल्यानंतरच संपुर्ण भारतभर होळी पेटवली जाते. परंतु आजपर्यंत गोपाळ समाजातील काही कुटुंबांनी समाजाची दिशाभूल करून होळी पेटवण्याचा मान स्वतःकडेच ठेवला आहे.परीणामी समाजातील इतर लोकांना होळीचा मान आजतागायत घेता आला नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी संपूर्ण भारतातून येणाऱ्या समाजाची लोकसंख्या वर्षानुवर्षे कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे दरवर्षी एकत्र येऊन होणारे कार्यक्रम व प्रबोधन होत नाही.मढी येथे होणारी आर्थिक उलाढाल कमी होत चालली आहे. मोठया पोलीस बंदोबस्तामुळे राज्य शासनाचा खूप मोठा खर्च होऊन पोलीस डिपार्टमेंटला मानसिक तनावाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून चालू वर्षी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी मानाची होळी पेटवण्याचा मान नवीन व्यक्तींना रोटेशन पद्धतीने देण्यात यावा याबाबत भारतातील गोपाळ समाजातील प्रतिनिधींनी ठराव करून नवीन मानकऱ्यांबाबतचे निवेदन देवस्थान ट्रस्टला दिनांक 10 फेब्रुवारी 2020 ला दिले होते. त्यानंतर जुने मानकरी यांच्या खोट्या सह्या करून काही लोकांनी देवस्थान ट्रस्ट ला 13 फेब्रुवारी 2020 ला अर्ज करण्यात आला होता. देवस्थानकडे दोन अर्ज आल्यामुळे होळी यात्रेचे अध्यक्ष या नात्याने त्या दोन्ही अर्जाबाबत निर्णय देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट ने मा तहसीलदार पाथर्डी यांना निवेदन पाठवले.त्यांनतर तहसीलदार यांनी सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ला दोन्ही अर्जदारांना बोलावून सुनावणी घेतली. त्यामध्ये जुने मानकरी यांच्या वतीने पंडित लोणारे,माणिकराव लोणारे व नामदेव माळी यांनी आपली बाजू एकही पुरावा न देता मांडली अशी माहिती यावेळी गोपाळ समाजहित महासंघ पश्चिम महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली आहे.
तसेच नवीन मानकरी यांच्या वतीने नंदकुमार पवार व सुभाष गव्हाणे यांनी सर्व पुराव्यानिशी आपली बाजू मांडली. नवीन मानकरी यांना मान देण्यात यावा यासाठी भारत देशातील विविध राज्यातील व जिल्ह्यातील जवळपास 800 ते 900 सह्यांचे निवेदन तसेच महाराष्ट्र राज्यातील गोपाळ समाजाच्या दोन मोठ्या संघटनांच्या ठरावाच्या प्रति सुद्धा देण्यात आल्या होत्या,तरी तहसीलदारांनी नवीन मानकरी यांचा अर्ज निकाली काढला आहे. 1999 साली झालेल्या सुलेनाम्या नुसार भारतातील समाज बांधव ठरवतील त्यांना मान देण्यात येईल असे पाथर्डी कोर्टासमोर निर्णय झाला असताना सुद्धा देवस्थान ने 1999 ते आजपर्यंत त्याच त्या लोकांना होळी चा मान दिल्यामुळे कोर्टाचा देखील अवमान झाला असून,तहसिलदार यांनी कोणत्या कागद पत्रांच्या आधारे व कोणत्या कायद्याच्या आधारे संबंधित नवीन मानकरी यांचा अर्ज फेटाळला हा एक मोठा प्रश्न असून त्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील केले आहे. तसेच लवकरच सामाजिक न्याय मंत्री यांना भेटणार असल्याची माहिती गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

"जुने मानकरी हे स्वयंघोषित मानकरी असून ते विशिष्ट 6 कुटुंबाचेच प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे यावर्षी संपूर्ण भारतातुन येणारे समाजबांधव होळीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असून, यापुढे सदर मानकऱ्यां बाबतची कायदेशीर लढाई चालू ठेवणार असून लवकरच समाजाला न्याय मिळेल"

        - भाऊसाहेब चौगुले- पुणे जिल्हा अध्यक्ष,                 गोपाळ समाजहित महासंघ

Friday, February 28, 2020

शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये बिबट्या अडकला !


पारगाव प्रतिनिधी : ता.२७ फेब्रु २०२०

पारगाव ता.दौंड येथील भीमा नदीच्या शेजारी सुनील शेळके आपला मुलगा आनंद सोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना आपल्या शेतामध्ये गव्हाच्या पिकात काही अंतरावर बिबट्या नजरेस पडला.
 भयभीत झालेले शेळके यांनी त्वरित ही माहिती ग्रामस्थांना कळवली.ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्या असल्याची माहिती देण्यात आली. सर्व माहितीची खातरजमा करून वन विभागाकडून पुणे येथील रेस्कु टीमला बोलावण्यात आले.यानंतर पाच तासाच्या आत अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या रेस्कु टीमला जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
या मिशनमध्ये वन विभागाचे 35 कर्मचारी सहभागी होते. या मिशनचे नेतृत्व पुणे येथील उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी व दौंडचे वन परीक्षक महादेव हजारे यांनी केले होते.
सविस्तर हकीकत अशी,एका शिकाऱ्याने रान डुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीमध्ये बिबट्याचा पाय अडकला होता.वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या वतीने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले व त्यानंतर बिबट्या पकडण्यात आला.
 पुढील उपचारासाठी बिबट्याला पौड येथे नेण्यात आले आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापासून भीमा नदीच्या पट्ट्यात अनेक बिबटे पाहायला मिळत आहे.
 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामध्ये पाळीव प्राण्यांचा बिबट्या फडशा पाडत आहे.एक दिवस माणसावर बिबट्या हल्ला करेल तेव्हाच वनविभाग खडखडून जागा होईल का? असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्यावतीने वन विभागाला अजून काही पिंजरे लावण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

Monday, February 24, 2020

माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवार यांचे वर्चस्व !



बारामती प्रतिनिधी : ता.२५ फेब्रु २०२०

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगावमध्ये अजित पवारांची सत्ता येणार हे आता शिक्कामोर्तब झाले आहे.अजित पवारांनी ग्रामपंचायतीपासून सर्व साखर कारखान्यावर आपली सत्ता काबीज केली आहे मात्र माळेगाव साखर कारखान्यावर  अजित पवार यांना वर्चस्व राखणे शक्य होत नव्हते.

या निवडणुकीला मात्र माळेगावकरांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळंकठेश्वर पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर यश मिळवून माळेगाव साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत.

चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे संचालक म्हणून कारखान्यावर निवडून आले आहेत. राखीव ५ जागांवरील मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरुच होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.

चंद्रराव तावरे हे शरद पवार यांचे समर्थक होते.

मात्र, अजित पवार यांच्याकडे बारामतीची सुत्रे गेल्यानंतर अजित पवार आणि तावरे यांच्यामध्ये धुसपुस होती. २०१४ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर २०१५ मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव
केला होता. त्यामुळे आता राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर कारखान्यावरही वर्चस्व मिळविण्यासाठी अजित पवार यांनी आपली ताकद लावली होती. त्यांनी माळेगाव कारखान्याच्या परिसरात ४ सभाही घेतल्या होत्या. 

रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी अनेक आक्षेप घेतले गेल्याने प्रत्यक्ष मतमोजणी दुपारनंतर सुरु झाली. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या १८जागांपैकी १३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेघर पॅनेलने कारखान्यावरील सत्ता खेचून आणली आहे.

Saturday, February 22, 2020

दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार - आ.राहुल कुल


केडगाव प्रतिनिधी : ता.२२ फेब्रु २०२०

राज्यातील महा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती  आमदार राहुल कुल यांनी शनिवारी चौफुला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
 अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि फळबागांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे असे म्हणत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे  असा सवाल उपस्थित केला गेला.  
भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदत कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती, उपकरण, पशुपालन, शेळीपालन, मधमाशी पालन, अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.

दौंड | सचिन आव्हाड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार !




दौंड प्रतिनिधी : ता.२२ फेब्रु २०२०

दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे जनहित फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने तीन दिवसीय अटल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शिवजयंती च्या निमित्ताने सचिन जगन्नाथ आव्हाड यांना पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला 
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह  आणि आंब्याचे झाड देऊन देऊन आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले . तसेच परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रामस्थांचा आणि भारतीय सैन्य दलात सेवा केलेल्या जवानांचा सन्मान  करण्यात आला .

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , आनंद थोरात , महेश भागवत , कुसेगाव चे सरपंच रमेश भोसले , बाळासाहेब तोंडे पाटील , वसंत साळुंखे ,  माजी सरपंच मनोज फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते .

फोटो ओळ : सचिन आव्हाड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देताना आमदार राहूल कुल आणि उपस्थित मान्यवर

Friday, February 21, 2020

नानगांव | सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेऊन गेले पाहिजे - माणिक अढागळे

केडगाव प्रतिनिधी : ता.२२ फेबु २०२० 
महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती (तारखेनुसार) संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने ठीकठिकाणी मिरवणुका,बाईक रॅली व अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नानगाव ता.दौंड येथील अण्णा भाऊ साठे सभागृह गणेशरोड येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन कसे करायाचे जे कळाले होते ते आता कुणालाच कळत नाही हे खूप मोठे दुर्दाव्य आहे.आता तरी सर्वाना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी अशी खंत यावेळी भाजपा अनु.जमा.मोर्चा दौंड तालुका अध्यक्ष माणिक आढागळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
तरुण वर्गाला यावेळी विष्णू खराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते व त्यांचे कोणते गुण अंगिकारले पाहिजे या विषयी सविस्तर असे आपल्या व्याखानातून मार्गदर्शन केले.
यावेळी विठ्ठ्ल खराडे,सचिन शिंदे,राजकुमार मोटे,विष्णू खराडे,शंकर देवकर अनिल गुंड,संजय रासकर, संभाजी खळदकर,श्रीकांत ससाणे व हनुमान तरुण मंडळचे सर्व सदस्य व आदि उपस्थित होते.

शिरूर | रांजणगाव गणपती | वेश्याव्यवसयातून पाच परप्रांतीय महिलांची सुटका !


रांजणगाव गणपती (शिरूर) प्रतिनिधी : ता.२१ फेब्रु

रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी बारामती क्राईम ब्रांच च्या पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्याव्यवसाय करणा-या पाच परप्रांतिय महिलांची सुटका केली तर सात आरोपींना अटक केल्याची माहिती बारामती क्राईम ब्रांच चे प्रमुख पोलीस निरीक्षक चद्रशेखर यादव यांनी दिली.

याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव येथील हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी बारामती क्राईम ब्रांच च्या पथकास स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परप्रांतिय महिलांकडुन वेश्याव्यसाय करवुन घेतला जात असल्याची गोपनीय व खाञीशीर माहिती अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांना मिळाली होती.त्यानुसार,बारामती क्राईम ब्रांच चे प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस व क्राइम ब्रांच च्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मुक्ताई  येथे तीन परप्रांतीय महिला (पश्चिम बंगाल) व  हॉटेल गारवा  येथे दोन परप्रांतीय (पश्चिम बंगाल) महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेताना आढळुन आल्या.यातील पाचही महिलांना सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

तर या प्रकरणी  महेश उर्फ बापुण, (रा.रांजणगाव) 2) सुमित साहू, (रा.रांजणगाव) 3) संदीप बळवंत येंधे, (रा.जुन्नर) 4) राजू पित्तवास साहू, (रा.ओडिसा),5) संतोष लोकनाथ बेहरा,(रा. ओडिसा), 6) नारायण संजय दुधाटे, (रा.परभणी), 7) राकेश उर्फ लूफताद रहमान शेख असे एकूण ७ आरोपींविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन ला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,रांजणगावचे पोलीस निरीक्षक भारतकुमार राऊत,सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-रांजणगाव पोलीस  स्टेशनचे पोलिस जवान किशोर तेलंग, अजित भुजबळ, रघुनाथ हळनोर यांनी ही कारवाई केली.

Thursday, February 20, 2020

दौंड | वाळू उपसा हद्दिच्या वादातुन तरुणाचा खून ; तीन दिवसापासून मृतदेह नदीत !


तीन दिवसांनी नदी पात्रात युवकाचा मृतदेह सापडला !
एन.डी.आर.एफ ज्या जवानांची मोठी पराकाष्ठा !

राजेगाव :प्रतिनिधी 
मलठण ता.दौंड येथील भीमा नदी पात्रात वाळू तस्करांच्या हद्दीच्या वादातून मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात शाब्दिक बाचाबाची होऊन नदीपात्रातच  हाणामारी झाली यांध्ये शिरापूर येथील  युवक निखील संतोष होलम वय २६ हा दि १७ फेब्रूवारी च्या मध्यरात्री नदी पात्रात बुडाल्याचा संशय व्यक्त केला होता.परतुं दि २० फेब्रूवारी दुपारच्या सुमारास  एन.डी.आर.एफ ज्या जवानांनी मोठी पराकाष्ठा करून त्या युवकाचा मृत देह बाहेर काढण्यात यश आले आणि शवविच्छेदन करण्यासाठी दौंड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .
गेली तीन दिवसापसुन मावळ येथील आपत्ती व्यवस्थापन यंत्रांना व स्थनिक मासेमारी करणे नागरिक ,पोलीस व मह्सूल यंत्रणा यांच्या मदतीने दि १९ फेब्रूवारी रोजी युवकाचा शोध नदी पात्रात चालू होता परंतु त्यांना काही हाती ण लागल्याने दौंड चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दि २० फेब्रूवारी रोजी एन.डी.आर.एफ चे मदत कार्य बोलावले.आणि हे पथक सकाळी घटनास्थळी येउन  आपले शोध कार्य सुरु केले आणि त्यांना दुपारच्या वेळेस होलम याचा मृत देह सापडला.
नदी पात्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत तरीही प्रशासन यांची गंभीर दखल घेत नाही अशा घटना का घडत आहेत यांची सखोल माहिती घेऊन कार्यवाही केली तर पुढील काळात नदी पात्रात अशा घटना घडणार नाहीत.

Wednesday, February 19, 2020

पारगाव येथील वृत्तवाहिनीचे कार्यालय चोरटयांनी फोडले !



पारगाव प्रतिनिधि : ता.१९ फेब्रु

इतर वस्तुची चोरी न करता "महत्वाची कागदपत्रे गायब" !

पारगाव ता.दौंड येथील डी न्यूज लाइव वृत्तवाहिनी व साप्ताहिक दौंड एक्सप्रेसचे मध्यवर्ती कार्यालय (ता.१८) रोजी रात्रीच्या सुमारास कार्यालयाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एका वर्षापासून सुरु असलेले वृतवाहिनीचे कार्यालय व शेजारील दत्ता काळे यांचे दुकान ही चोरीटयांनी फोडले आहे.
सदर घटना ही गाळा मालक भानुदास शिंदे यांनी सकाळी आल्यानंतर पाहिली असता केडगांव पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पानसरे यांना संपर्क साधून या घटनेची माहिती कळवली आहे.
डी न्यूज वृतवाहिनीचे संपादक सचिन रूपनवर यांनी यावेळी सांगितले की,कार्यालयात इतर किमतीचे वस्तु उपलब्ध होत्या परंतु त्या चोरुन न घेऊन जाता महत्वाचे कागदपत्रे चोरटयांनी चोरुन नेले आहेत.
इतर वस्तु चोरी न करता महत्वाचे दस्तेवज चोरुन नेले आहे त्यामुळे नक्की चोरांचा उद्देश काय होता व हे चोरटे कुणाच्या सांगन्यावरुन आले होते हे अद्याप कळून आले नाही सदर घटनेची माहिती स्थानिक पोलिस चौकित दिली आहे अशी माहीत रूपनवर यांनी दिली आहे.
पारगाव येथे अवैध धंद्यात वाढ झाली असून वाळू उपसा करणारे परप्रांतीय,गुरहाळ घरात काम करणारे मजूर असे अनेक बाहेरील लोक येथे वातव्यास आले आहेत त्यांची कुठेही नोंद नसल्यामुळे चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व दूकानदारानी केली आहे.

Thursday, February 13, 2020

दापोडी येथे पाळीव जनावराच्या चोरीच्या प्रमाणात वाढ !


केडगाव प्रतिनिधी ता:१३ फेब्रु २०२०
दापोडी ता.दौंड येथे गेल्या पंधरा दिवसांपासून शेळ्या व म्हशीच्या चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
दापोडी येथील ताडगे वस्तीवर गोठ्यातील म्हशी पंधरा दिवसापुर्वी चोरीला गेली आहे. तसेच मांगोबाचे माळ येथील एका शेत मजुरांची म्हैश चोरीला गेली आहे.तसेच रस्त्याच्या कडेला असणा-या शेळ्या देखिल चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. अनेक दिवसापासून रस्त्याच्या कडेला असना-या शेळ्या व म्हशी चोरीला जात आहे.परंतू हे चोरीच सत्र थांबत नाही.
ज्या लोकांच्या म्हशी चोरीला गेल्या आहेत.त्यांची कींमत अंदाजे 50 हजार रुपयेच्या आसपास सांगीतले जात आहे. पाळत ठेवून म्हशी व शेळ्या चोरीला जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.जर जीवापाड जपलेले पाळीव प्राणी जर चोरीला जात असेल तर काय करावे असा प्रश्न निर्माण होत आहे.यामुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे.असा प्रयत्न अनेक वेळा आशा चो-या झाल्या आहेत.परंतू चोर सापडलेला  नाही.त्यामुळे जनावरे चोरीला जात आहे. याकडे लक्ष देने गरजेचे आहे.

Thursday, February 6, 2020

यवत पोलिसांकडून गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक !


केडगाव प्रतिनिधी : ०६|०२|२०२०                                                                                
नानगाव ता.दौंड येथील स्मशानभूमी हद्दीतील  रस्त्याच्या कडेला असलेल्या शंकराच्या मंदिरामध्ये अक्षय सुरेश खळदकर वय वर्ष 22 राहणार नानगांव तालुका दौंड जिल्हा पुणे यास सापळा लावून पकडले आहे. त्याच्याजवळ कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल व खिशामध्ये दोन पितळे जिवंत काडतुस त्याची किंमत बावीस हजार रुपये आंदाजे  आहे.त्यामुुुुळे  त्याच्या  विरुद्ध गजानन खत्री यांनी फिर्याद   दिली आहे.             
        
या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत.सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा व बी एन पाटील पोलीस निरीक्षक यवत यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पानसरे पोलीस हवालदार,कदम पोलीस नाईक,आर आर गोसावी पोलीस कॉन्स्टेबल व गजानन खत्री यांनी केली आहे.                  

नानगांव | रस्त्याच्या साईडपट्टया न भरल्यामुळे अपघातात वाढ !


केडगांव प्रतिनिधि : ता.०६ जाने

नानगांव ता.दौंड मधील गुंडवस्ती येथील काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 25/15 या निधीमधून अंदाजे 18 लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या साइड पट्या तीन ते चार फूट उंचीची आहेत.याठिकाणी ट्रॅक्टर,दुचाकी,शाळेत जाणारे विद्यार्थी त्याठिकाणी घसरून खाली पडले आहेत व किरकोळ जखमी झाले आहेत.


भविष्यात याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ राहुल गुंड यांनी दिली आहे. लवकरात लवकर मुरूम टाकून या साइडपट्या भरण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Wednesday, February 5, 2020

कुरकुंभ येथे हेन्केलने सुरु केला अत्याधुनिक कारखाना !


भारतात नवीन मल्टी-टेक प्लांटचा शुभारंभ !

विकासाच्या विपुल संधी उपलब्ध असलेल्या बाजारपेठांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमतांचा विस्तार !

डी न्यूज लाइव टीम  : ता.०५ जाने २०२०

 हेन्केल एजी अँड कंपनी केजीएएची संपूर्ण मालकीची उपकंपनी हेन्केल ऍडहेसिव्हस् टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आज पुण्यानजीक कुरकुंभ येथे आपला नवीन कारखाना (ता.०५) रोजी सुरु करण्यात आला आहे. जवळपास ५० मेऊर (४०० कोटी रुपये) गुंतवणुकीसह उच्च दर्जाची ऍडहेसिव्हस्, सिलंट्स आणि पृष्ठभाग प्रक्रिया उत्पादनांसाठी भारतातील उद्योगक्षेत्राच्या सातत्याने वाढत असलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे.  हेन्केल कुरकुंभ उत्पादन कारखान्याचे औपचारिक उदघाटन ५ फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आले.  यावेळी मुंबईतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कॉन्सुल जनरल डॉ. युर्गन मोर्हर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाचे सीईओ डॉ. पी. अनबलगन यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.

तब्बल १,००,००० चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या ५१,००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा भारतातील सर्वात मोठा ऍडहेसिव्हस् उत्पादन कारखाना आहे.  विविध प्रकारे वापरता येतील अशी पॅकेजिंग्स, ऑटोमोटिव्ह, शेती व बांधकामाची उपकरणे, इतर उद्योग आणि धातू अशा विविध मार्केट्सच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हेन्केलच्या क्षमता वाढवण्यात हा नवीन कारखाना मोलाची भूमिका बजावेल.

हेन्केल एजी अँड कंपनी, केजीएएच्या ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज बिझनेस युनिटचे मॅनेजमेंट बोर्ड सदस्य आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट यान-डर्क ऑरिस यांनी सांगितले, "अतिशय महत्वाच्या, वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतामध्ये ऍडहेसिव्हस् व्यवसायासाठी प्रचंड विकास संधी उपलब्ध आहेत."  ते पुढे म्हणाले, "जगभरातील सर्व उत्पादन उद्योगातील ऍप्लिकेशन एक्स्पर्टस आमच्याकडे आहेत.  आमची आमच्या ग्राहकांच्या तसेच भागीदारांच्या गरजा नीट समजून घेऊन त्यानुसार काम करतो.  ४० टेक्नॉलॉजीजच्या आमच्या अतुलनीय पोर्टफोलिओवर आधारित आमची अतिशय विश्वसनीय आणि आघाडीची उत्पादने व ब्रँड्स आमच्या ग्राहकांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करत आहेत.  या अत्याधुनिक, मल्टी-टेक्नॉलॉजी कारखान्याची सुरुवात करून या वेगाने वाढत आणि बदलत असलेल्या मार्केटमध्ये आमच्या प्रभावी, उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी असलेली प्रचंड मागणी पूर्ण करण्याची क्षमता आम्ही निर्माण केली आहे. या गुंतवणुकीमुळे आम्हाला भविष्यकाळात लाभदायक वाढ करणे शक्य होणार आहे."   

उत्पादनांमध्ये अंगभूत गुणवत्ता निर्माण करून संपूर्ण उत्पादन प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठीचे तंत्रज्ञान या कारखान्यामध्ये उपलब्ध करवून देण्यात आले आहे.  प्लांट ऑपरेशन्सचे  सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटलायझेशन करण्यात आल्यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाल्या आहेत.  यामध्ये क्लोज्ड मटेरियल हँडलिंग सिस्टिम्स आणि उच्च स्तराचे प्रोसेस ऑटोमेशन वापरण्यात आले आहे.  हेन्केलमध्ये जागतिक स्तरावरील चाचणी म्हणून पहिल्यांदाच या कारखान्यात स्मार्ट फॅक्टरी (इंडस्ट्री ४.०) सोबत प्रोसेस ऑटोमेशनचा सर्व ठिकाणी अंतर्भाव करण्यात आला आहे.

कुरकुंभ कारखान्यामध्ये पर्यावरण संवर्धन, संरक्षणाच्या उच्चतम मापदंडांचे पालन करण्यात आले आहे.  यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून सर्वसमावेशक ऊर्जा सक्षमतेच्या संकल्पनेवर आधारित एलईईडी गोल्ड सर्टिफिकेट देण्यात आलेल्या अगदी मोजक्या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग साईट्समध्ये या कारखान्याचा समावेश आहे.  या कारखान्याला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास १०% गरज सौर ऊर्जेतून भागवली जाते. शाश्वत ऊर्जेचा वापर वाढवत नेण्याची कंपनीची योजना आहे.  या कारखान्याला संपूर्ण वर्षभरात लागणार असलेल्या एकूण पाण्यापैकी जवळपास १६% पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगमार्फत उपलब्ध केले जाणार आहे.  हवा तसेच सांडपाण्याची व्यवस्था यावर ऑनलाईन लक्ष  ठेवले जात आहे.

हेन्केल इंडियाचे प्रेसिडेंट शिलिप कुमार यांनी सांगितले, "स्थानीय पातळीवर उत्पादनामुळे भारतातील आमच्या ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज व्यवसायाला धोरणात्मक लाभ मिळतील त्यामुळे या क्षेत्रात आम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहू.  भारतात हेन्केलच्या प्रवासात कुरकुंभ कारखाना हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.  या कारखान्यातून भारतीय बाजारपेठांबरोबरीनेच मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया यासारख्या भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या बाजारपेठांना देखील उत्पादने पुरवली जातील.  या  उद्योगक्षेत्रातील मार्केट लीडर या नात्याने आमच्या ग्राहकांना प्रभावी उत्पादने पुरवणे आणि बाजारपेठेतील संधींचे रूपांतर लाभकारी प्रगतीमध्ये करण्यावर आमचा मुख्य भर असेल."

हेन्केल ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज ही ऍडहेसिव्हस्, सिलंट्स आणि फंक्शनल कोटिंग्स या उद्योगक्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी आहे.  ८०० पेक्षा जास्त उद्योगांमधील जवळपास १,३०,००० ग्राहकांच्या मागण्या हे बिझनेस युनिट पुरवते.  ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार बनवण्यात आलेली उत्पादने आणि तंत्रज्ञान यांचा वापर विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू तसेच औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो.

कलावंतांचे प्रश्न मार्गी लावणार - अमित देशमुख


केडगाव प्रतिनिधी :  ता. ०५|२|२०२०       
                    
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन कलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
मराठी रंगभूमी  प्रयोग परिनिरीक्षक मंडळाचे सदस्य व तमाशा थेटर मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक जाधव यांनी लावणी कलावंतांच्या समस्यांचे निवेदन दिल्यानंतर अमित देशमुख बोलत होते. यावेळी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तमाशा कलावंतांचे मानधन रखडले आहे तसेच ज्या लावणी कलावंतांना पेन्शन योजना लागू करण्यात आले आहे त्यांना ती वेळेवर मिळत नाही. वयोवृद्ध लावणी कलावंतांना सरकार  दरबारी हेलपाटे मारणे शक्य होत नाही.त्यांना योग्य मानसन्मान दिला जात नाही. लावणी कलावंत वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना घरकुल योजनेतून सरकारी जागेवर घर बांधून देण्यात यावी काही ठिकाणी लावणी कलावंतांवर हल्ले केले जात असतात अशा हल्लेखोरांना शासन करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचीची मागणी देखील निवेदनात केली आहे.

Monday, February 3, 2020

सेवाभावी संस्थेच्या वतीने सहलीचे आयोजन !

                       
दौंड प्रतिनिधी : ता.०४ जाने २०२०
आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.शुभांगी धायगुडे-शिंगटे व सर्व सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दौंड शहरातील भोईटे नगर परिसरातील महिलांसाठी तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा वाई जि.सातारा व महालक्ष्मी कोल्हापूर या ठिकाणी देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहलीला जाण्यासाठी सहभाग  घेतला होता.ज्या दिवशी सूर्य महोत्सव  होता.त्या दिवशी  सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्याच्या किरणानी एकदा महालक्ष्मीच्या पदस्पर्श दर्शनाने घेतल्याचे पाहून सहलीला  आलेल्या महिलांनी आनंद व समाधान  व्यक्त केले.

इंदापूरात रविवारी माळी समाज नव वधू-वर परिचय मेळावा


कुरकुंभ प्रतिनिधी : ता.०३ जाने २०२०

विविध माण्यवरांचा पुरस्कार गुणगौरव सोहळा !

रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी इंदापूर येथे जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माळी समाज नव वधू- वर व पालक परिचय मेळावा व माळी समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असुन रविवारी संपन्न होणारा १५ वा माळी मेळावा असल्याची माहीती मुख्य आयोजक सुधाकर बोराटे यांनी इंदापूर येथे बोलताना दीली.
 राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावीत्रीबाई जोतीराव फुले यांचे जयंती निमित्त जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माळी समाज नव वधू - वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन इंदापूर येथील शहा सास्कृतीक भवन येथे रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक १:३० वाजता करण्यात आले असुन यामध्ये विवाह इच्छुक नव वधू- वर, विधवा, विधूर,व घटस्फोटीत यांनाही सहभागी होऊन इच्छित स्थळ मिळण्यासाठी नाव नोंदणी करता येइल.मेळाव्यास येताना वधू-वरांनी स्वत:चा संपूर्ण माहिती बायोडाटा व एक आय कार्ड साइज फोटो आणावा. सोबत पालकांसह मेळावा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर उपस्थित रहावे. 

त्याचबरोबर जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे सन.२०१९ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले असुन माळी समाजात विविध सामाजिक, राजकिय, शैक्षणीक,कला,वाणीज्य व विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.यामध्ये पूणे जिल्हा परिषद सदस्य व पूणे जिल्हा शिक्षण व क्रिडा समिती सदस्य, सागर मल्हारी भोसले. (माळी युवा समाजरत्न), कर्जत नगर पंचायत नगरसेवक व सावता परिषद महाला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.मनिषाताई सचिन सोनमाळी यांना (माळी समाजरत्न),इंदापूर पंचायत समितीचे मा.सदस्य व मा.ग्रामविकास अधिकारी निवृृत्ती भिकू गायकवाड (माळी समाज जिवन गौरव), व कुरकुंभ ग्रामपंचायत माजी सरपंच सौ.जयश्री संदिप भागवत (माळी समाज गौरव) पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार असुन माळी समाजातील इच्छुक नव वधू-वर यांनी अधिक माहीतीसाठी मुख्य आयोजक सुधाकर बोराटे (9561190332) याचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

——————————————————

Saturday, February 1, 2020

चाकण | हळदी-कुंकु समारंभात वाहतुक नियमाचे संदेश !


पुणे प्रतिनिधी: ता.०२ फेब्रु २०२०

ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण येथील विद्यालयात हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात वाहतुकीचे नियम पाळा,हेल्मेट वापरा,जीव वाचवा, असे संदेश महाविद्यालयातील मुला-मुलींना शिक्षकांनी दिला. चाकण वाहतूक पोलिस निरीक्षक यांचे नेहमी  सहकार्य लाभत असल्याची माहिती प्राचार्या प्रमिला गोरे यांनी दिली.
यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

चौफुला येथील रेणुका कलाकेंद्रातील नृत्यांगणावर प्राणघातक हल्ला !


केडगाव प्रतिनिधी ता.०१ फेब्रु २०२०

दौंड तालुक्यातील चौफुला येथील रेणुका कला केन्द्रामध्ये एका नृत्यांगणावर कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे.
 याबाबत आरोपी मनोज सखाराम उजागरे रा.पाटस ता.दौंड याच्यावर नृत्यांगणाच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ता.३० जानेवारी रोजी रात्री 10: 30 वाजण्याच्या सुमारास रेणुका कला केंद्रातील खोलीमध्ये हि नृत्यांगणा एकटी बसलेली असताना तेथे अचानकपणे आरोपी येऊन तू मला आवडते म्हणून तू इतर कोणाहि पुरुषाशी बोलायचे नाही.वारंवार  सांगितले असताना, तू माझे ऐकत नाही असे म्हणून हुज्जत घालू लागला. मला नाचगाने करताना इतर पुरुषाशी बोलने भाग पडते असे म्हणताच अरोपीने नृत्यांगणावर हाताने लाथा बुक्यानी मारहाण करत कमरेचा धारदार कोयता काढून नृत्यांगणाच्या मानेवर पाठीवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
हल्यानंतर आता तुझ्या मुलाला व घरच्याना सुध्दा जीवे मारनार अशी धमकी देऊन त्या ठिकाणाहून निघुन गेला. जखमी नृत्यांगणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पुढील तपास यवत पोलिस करत आहे.