केडगाव प्रतिनिधी : ता.२९ ऑक्टोबर २०१९
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खोपोडीचे विद्यमान उपसरपंच प्रफुल्ल शितोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.दौंड तालुक्यात शितोळे यांची रमेश थोरात यांच्याशी निकटवर्तीय म्हणून विशेष ओळख आहे.
विशेष म्हणजे शितोळे यांची अवघ्या एक महिन्यापूर्वी खोपोडीच्या उपसरपंच पदी निवड झाली होती. त्यामुळे परिसरामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच सुवर्णा साळवे यांच्याकडे सादर केला आहे.खोपोडी गावातुन थोरात यांना 26 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
यासंदर्भात बोलताना प्रफुल्ल शितोळे म्हणाले की,रमेश थोरात निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.
आमचा पराभव माझ्या जीवाला लागला असून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे.यापुढील कालावधीत देशांमध्ये पक्षाचे काम करण्यासाठी कटिबद्ध राहील.