दौंड प्रतिनिधि : ता.०५ ऑक्टोम्बर २०१९
दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव उमेदवार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप या पक्षाकडून दाखल केल्यामुळे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जोरदार धक्का बसला आहे . राहुल कुल यांनी तीन फॉर्म भरले आहे त्याफॉर्म मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून एक अर्ज दाखल केला पण त्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचा AB फॉर्म जोडला नाही तर दोन फॉर्म भाजप या पक्षाकडून भरले आहे त्यासोबत भाजप पक्षाचा AB फॉर्म देखील जोडले आहेत. काल आमदार राहुल कुल यांचा फॉर्म भरण्यासाठी महादेव जानकर देखील उपस्थित होते त्यामुळे त्यांना या बद्दल माहिती होती का नाही या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
2014 मध्ये विधानसभेची निवडणूक राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवली होती तर राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी लोकसभेची निवडणूक भाजप या पक्षाकडून लढवली होती.
प्रसार माध्यमाशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादा केसकर यांनी सांगितले की,आम्ही AB फॉर्म स्वता त्यांच्या कार्यकर्त्यना कडे दिला होता परंतु त्यांनी जोडला नाही हे आमचे दुर्द्वयच म्हणावे.
याबाबत जिल्हाध्यक्ष हरीश खोमने म्हणले की, जर असेल तर खांद्यावर हात टाकुन गळा आवळयाची आमची अवलाद नाही.रासपला अंधारात ठेवल्याने याचे परिणाम भोगावे लागेल.यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.निवडणुकीत आमची ताकद आम्ही दाखवून देऊन असेही सांगण्यात आले.