Wednesday, October 23, 2019

अतिउत्साही तरुणांना खावी लागेल जेलची हवा ?


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.२३ ऑक्टोबर २०१९


दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणे पुणे ग्रामीण अंतर्गत सर्व नागरिकांना व तरुणांना आवाहन करण्यात आले आहे की (ता.२४) रोजी मतमोजणी प्रक्रिया असून निवडणूक निकालानंतर काही अति उत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजामध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात त्यामुळे मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे वाईट परिणाम गावातील लोकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात.



ऐन दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तुरुंगामध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
पुंगळ्या काढून मोटर सायकल फिरवणाऱ्याचे मोटरसायकल चालक यांचेवर वरती कठोर कायदेशीर कारवाई करून मोटरसायकल सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येतील.
गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही भविष्यकाळातील फायदेही मिळणार नाहीत .
ज्याच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना भविष्यात पासपोर्ट खाजगी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी सरकारी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी तसेच इतर अनेक उद्योगधंदे करिता लागणारे NOC मध्ये सदर गुन्हे समाविष्ट होऊन सर्व ठिकाणी अडचणी येणार आहेत.
तसेच सदर प्रकार करण्यामुळे विविध प्रकारच्या कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.
यापूर्वीच गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांना आणखी गुन्हे दाखल झाल्यामुळे तडीपार तसेच यासारख्या विविध प्रतिबंधात्मक कारवायांचा भविष्यात सामना करावा लागेल.
तरी सर्व तरुण मित्रांना व  कार्यकर्ते, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखून शांतता राखावी असे आव्हान तालुक्यातील सर्वत्र पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.