डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.०३ ऑक्टोबर
पारगाव ता. दौंड येथील तुकाईदेवी मंदीराला नवरात्रीनिमीत्त विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
नवरात्रीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. यामध्ये गावातील 100 स्री-पुरुष मंदीरात उपवासासाठी बसले आहेत.संबधित भक्त 10 दिवस घरदार सोडुन मंदीरात मुक्कामी असतात. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना फराळ पुरवले जाते. प्रथम देवीला ग्रामस्थांनी बनवलेल्या 20 तोळे सोने अलंकाराची मिरवणुक निघाली. नवरात्रीमध्ये देवीला सोने परिधान केले जाते. दररोज पहाटे तुकाईदेवी, लक्ष्मीआई, रेणुकादेवी, वाघजाईमाता यांची आरती होते. सायंकाळी आरतीनंतर देवीची पालखीतुन मिरवणुक निघते. भोई समाजाला पालखीला खांदा देण्याचा मान आहे. ग्रामस्थांच्या वतीने तुकाईदेवी मंदीराला तर रेणुका मित्र मंडळाने रेणुकादेवी मंदीराला विद्युतरोषणाई केली आहे. घटस्थापणापुर्वी ग्रामस्थांनी 1 लाख 60 हजार रुपये खर्चुन मंदीर परिसरात फरशीकाम केले आहे. पाचव्या व सातव्या माळेला ग्रामस्थांच्या वतीने देवीला तोरण निघते. संपुर्ण पुणे जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात.