डी न्यूज लाइव्ह टीम : ता.०७ ऑक्टोम्बर २०१९
अर्ज छाननी प्रक्रियेत रासपाचा एबी फॉर्म न जोडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
त्याच पार्श्वभूमिवर आज (ता.०७) रोजी रासपा मुंबई कार्यालय येथे पदाधीकारी यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी सांगितले की,आमच्या आमदारानी आम्हाला फसवले आहे.अंधारात ठेवले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आले होते.परंतु या सर्व घटनेमुळे पक्षाची खुप मोठी हानी झाली आहे त्यामुळे या दोन्ही जागावरील उमेदवारांना आम्ही पक्षातून बेदखल केले आहे.
तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला मदत करणार असून आम्ही महायुतीतच राहणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.