Wednesday, October 9, 2019

सुनिता रासकर यांची नानगावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड !


प्रतिनिधी : ता.०९ ऑक्टोंबर २०१९

नानगाव ता.दौंड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुनिता प्रल्हाद रासकर यांची (ता.०८) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.यापूर्वी शारदा खळदकर यांनी (ता.२९ सप्टेंबर) रोजी सहखुशीने राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पदाची जागा हि रिक्त होती.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी पोपट शेलार यांनी काम पाहिले.व  तसेच पोलीस कॉन्स्तेबल विशाल जाधव यांनी उपस्थित राहून गुलालाची उधळण  व फटाके उडवू नका अशी सूचना केली.शांततेत निवडणूक कार्यक्रम पार पडला.

नानगाव ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असून त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आहे त्याचे मी नक्कीच सोने करेल व राहिलेला कालावधीमध्ये सर्वाना विचारात घेऊन चोख काम करेल असे मनोगत यावेळी नवनियुक्त उपसरपंच सुनिता रासकर यांनी केले.


यावेळी सी बी खळदकर,पुष्पा गुंड,विश्वास भोसले,शारदा खळदकर, रुपाली खळदकर,जालिंदर काळे,विकास खळदकर,माऊली खळदकर,विशाल शेलार,संजय रासकर,सुदाम खळदकर,विकास रासकर,नारायण रासकर,माऊली रासकर,प्रल्हाद रासकर व आदि मान्यवर उपस्थित होते.