दौंड प्रतिनिधी : ता.१२ ऑक्टोंबर २०१९ दापोडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बबन भाऊ खोडवे यांनी कुल गटातून पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात रमेश थोरात व आप्पासाहेब पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
यावेळी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.तर नानगाव येथे देखिल प्रचारात मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केडगाव ते नानगाव व नानगाव ते पारगाव दरम्यान प्रवास करताना असे दिसून येते की १४०० कोटीचा विकास खड्ड्यात बूडाला की काय अशी परीस्थिती सध्या दिसून येत आहे कि,अशी बोचरी टीका नानगाव येथील प्रचार सभेत आमदार राहूल कुल यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांनी केली आहे.
वरवंड येथे झालेल्या शरद पवार यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेची दखल मतदारांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्ता स्वताहुन प्रचार यंत्रनेत सहभागी होताना दिसत आहे.