Friday, October 11, 2019

शरद पवार यांच्या सभेस दौंड वासीयांची अलोट गर्दी !




दौंड प्रतीनिधी : ता.११ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ (ता.११) रोजी वरवंड ता.दौंड येथे माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आज उरुळी कांचन येथील सभा उरकून शरद पवार हे दौंड तालुक्यातील जनतेला रमेश थोरात यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या असे आव्हान करण्यासाठी आले असता एवढा मोठा जनसमुदाय पाहून आमच्या उमेदवाराचा विजय हा नक्की झाला असे त्यांनी यावेळी सुतोवाच केले.

या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे.सत्तेतील सरकारने आता पर्यंत काहीच केले नाही.फक्त आणि फक्त फसवेगिरी या सरकारने चालवली आहे.तब्बल १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांच्या काळात घडल्या आहेत.अनेक मुद्द्यावरून शरद पवार यांनी सरकार विरोधात मोठे टीकास्त्र यावेळी झाडले आहे.

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपाचे दौंड तालुक्याचे उमेदवार राहुल कुल यांच्या विरोधात शड्डू ठोकत घरात माणसे तीन पक्ष चार लोकांनी कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? तसेच खुणशी राजकारण करून जनतेला वेठीस धरणाऱ्याना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे म्हणत खरपूस शब्दात चाकणकर यांनी राहुल कुल यांचा समाचार घेतला.

राहुल कुल यांनी किती तरी कुटुंबाचे वाटोळे केले आहे.धनगर समाजाचा खूप मोठा विश्वासघात यांनी केला आहे.रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून व तुम्ही माय बाप जनता येथे उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसेच हे सर्व पाहून मला अक्षरशा गहिवरून आले आहे असे यावेळी रमेश थोरात यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
संदीप भागवत,जयश्री भागवत,पोपटभाई ताकवणे व इतर कार्यकर्त्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.