Tuesday, October 8, 2019

विश्वासघातकी राजकारण करणारे कुल यांना दौंडच्या जनतेनी जागा दाखवावी-बापूराव सोलनकर


दौंड प्रतिनिधी : ता.०८ ऑक्टोबर २०१९
 माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी राजकारणाचे बाळकडू पाजून ज्यांना मोठे केले त्याच पवार कुटूंबांचा विश्वासात केला.ज्या राष्ट्रीय समाज पक्षामुळे महादेव जानकर यांच्यामुळे राहुल कुल हे आमदार झाले त्यांच्या ही पाठीत विश्वासघाती खंजीर खुपसला आहे. 
जे कुल पवार कुटुंब व जानकर यांचा विश्वासघात करू शकतात ते दौंडच्या जनतेचा विश्वासघात का करू शकतनाही,विश्वासघातकी राजकारण करणारे कुल यांना दौंडच्या जनतेनी जागा दाखवावी असे आव्हान राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे दौंड पक्ष निरीक्षक बापुराव सोनवलकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे कॅाग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माजी आमदार सुभाष कुल व रंजना कुल यांना नेहमीच सहकार्य केले आहे. राहुल कुल यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी राजकारणाचे बाळकडू पवार कुटूंबांनी राहुल कुल यांना दिले आहे. कुल यांना
मदत केली आहे. 
यामुळे कुल हे मोठे झाले आहेत. मात्र त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करून पवार कुटूंबाचा विश्वासघात केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही आमदार कुल यांनी भाजपकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी कांचन कुल यांना उभे करून आपली लायकी दाखवली आहे.ज्या राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकर यांनी उमेदवारी देवून कुल यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार केले.धनगर समाजाच्या मतांवर कुल हे आमदार झाले आहेत.
मात्र मागील पाच वर्षात धनगर समाजाच्याआरक्षणाबाबत कुल यांनी कोणतीच भुमीका घेतली नाही यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षात असताना कुल यांच्या पक्ष विरोधी धोरणाचा आक्षेप घेत कारवाईची मागणी जानकर
यांच्याकडे केली होती. मात्र जानकर यांनी कुल यांच्यावर विश्वास ठेवून कुल यांच्यावर दौंड तालुक्याची जबाबदारी दिली होती. मात्र कुल यांनी भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल करून जानकर व धनगर समाजाचा विश्वासघातकरून आपली राजकीय पोळी भाजली आहे. कुल यांनी आतापर्यंत स्वार्थी व विश्वासघातकी राजकरण केले आहे.यामुळे कुल यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. धनगर समाज व तरूणवर्ग कुल यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यामुळे भाजपा मधील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या संपर्कात असल्याचा दावा सोनवलकर यांनी केला आहे.