दौंड प्रतिनिधि : ता.१८ ऑक्टोम्बर २०१९
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अजित पवार यांनी माझा मतदार संघ सोडून मला दुसऱ्या मतदार संघात उभे करून मला निवडून आणले आहे.
तसेच थेट राज्यमंत्री पदाचा दर्जाचे पद दिले दिलेला शब्द पाळणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता अजित दादा हे एकमेव नेतृत्व असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले ते आज खामगाव,नांदूर, मिरवडी,दहीटणे,टेळेवाडी, वडगांव बांडे,वाळकी या गावांमध्ये आज (ता.१८) रोजी दौरा केला.
धनगर समाजाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी अनेक महत्वाची पदे दिली आहेत.
धनगर समाजाला भाजपाने आरक्षण देतो म्हणून फसवले भाजपाच्या भुल थापांना बळी पडू नका.
दौंड मधून रमेश थोरात यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन देवकाते यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ अर्चना पाटील,पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर,नांदूरचे सरपंच विशाल थोरात,मिरवडीचे सरपंच बाळासाहेब शिंदे,विकी खताळ,दादा टेळे,तात्यासाहेब टेळे,भास्कर देवकर,माऊली आबा शिंदे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी धनगर समाजाने कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आव्हान दहीटने येथे बोलताना केले आहे.