दौंड प्रतिनिधी : ता.१४ ऑक्टोबर २०१९ काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे दौंड विधानसभेचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ यवत येथे मंगळवार (ता.१५) रोजी सकाळी ११ वा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.
वरवंड येथील शरद पवार यांच्या सभेस अलोट गर्दी जमा झाली होती.मतदारांचा वाढता कल राष्ट्रवादी काँग्रेस कडे झुकलेला दिसून येत आहे.
अमोल कोल्हे यांची तोफ दौंड तालुक्यात कडाडणार म्हणून पुन्हा एकदा वरवंड येथील सभेचे रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
कार्यक्रमास उपस्थीती म्हणून दौंड राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बापूराव सोलनकर,डॉ.अर्चना पाटील, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग मेरगळ,पुणे जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,सोहेल खान,राणी शेळके,रामभाऊ टुले,दौलत ठोंबरे,नितीन दोरगे व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.