डी न्यूज लाइव्ह टीम : ता.१५ ऑक्टोम्बर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेस,काँग्रेस व मिञ पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने यवत ता.दौंड येथील बाजार मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की,पाच वर्षात सोळा हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.आता महाराष्ट्रात वातावरण फिरल आहे.
येणारी निवडणूक विचारांची निवडणूक आहे.देशाचे मुद्दे तुम्ही राज्यातील निवडणुकीसाठी वापरता हे आता चालणार नाही त्यामुळे जनता हुशार आहे.रमेश थोरात यांना निवडून द्या शरद पवार यांच्या विचाराला साथ द्या असे आव्हान यावेळी कोल्हे यांनी सभेला केले.
यावेळी रमेश थोरात म्हणाले की,पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन म्हनून काम पाहात असताना बेस्ट चेअरमन म्हणून पुरस्कार मिळाला आहे.बँकेच्या मार्फत तीन लाख पर्यंत कर्ज बीन व्याजी दिले जात आहे.
आता भिमा पाटस कारखान्याचे कामगाराचे पगार थकले आहेत. कॉलेज चालवता न आल्याने कॉलेज बंद पडले आहे.
दुध संघावर तीन-चार महीन्यापासून शेतकरी वर्गाला पगार मिळाला नाही.त्यामुळे जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही.अशा प्रकारे चौफेर फटकेबाजी यावेळी थोरात यांनी केली.सभेत यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग दिसून येत होता.