Monday, October 28, 2019

थोरात यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन खोपोडी येथील उपसरपंचाचा राजीनामा !



केडगाव प्रतिनिधी : ता.२९ ऑक्टोबर २०१९

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खोपोडीचे विद्यमान उपसरपंच प्रफुल्ल शितोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.दौंड तालुक्यात शितोळे यांची रमेश थोरात यांच्याशी निकटवर्तीय म्हणून विशेष ओळख आहे.
विशेष म्हणजे शितोळे यांची अवघ्या एक महिन्यापूर्वी खोपोडीच्या उपसरपंच पदी निवड झाली होती. त्यामुळे परिसरामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच सुवर्णा साळवे यांच्याकडे सादर केला आहे.खोपोडी गावातुन थोरात यांना 26 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
 यासंदर्भात बोलताना प्रफुल्ल शितोळे म्हणाले की,रमेश थोरात निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. 
आमचा पराभव  माझ्या जीवाला लागला असून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे.यापुढील कालावधीत देशांमध्ये पक्षाचे काम करण्यासाठी कटिबद्ध राहील.

Wednesday, October 23, 2019

अतिउत्साही तरुणांना खावी लागेल जेलची हवा ?


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.२३ ऑक्टोबर २०१९


दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणे पुणे ग्रामीण अंतर्गत सर्व नागरिकांना व तरुणांना आवाहन करण्यात आले आहे की (ता.२४) रोजी मतमोजणी प्रक्रिया असून निवडणूक निकालानंतर काही अति उत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजामध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात त्यामुळे मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे वाईट परिणाम गावातील लोकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात.



ऐन दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तुरुंगामध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
पुंगळ्या काढून मोटर सायकल फिरवणाऱ्याचे मोटरसायकल चालक यांचेवर वरती कठोर कायदेशीर कारवाई करून मोटरसायकल सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येतील.
गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही भविष्यकाळातील फायदेही मिळणार नाहीत .
ज्याच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना भविष्यात पासपोर्ट खाजगी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी सरकारी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी तसेच इतर अनेक उद्योगधंदे करिता लागणारे NOC मध्ये सदर गुन्हे समाविष्ट होऊन सर्व ठिकाणी अडचणी येणार आहेत.
तसेच सदर प्रकार करण्यामुळे विविध प्रकारच्या कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.
यापूर्वीच गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांना आणखी गुन्हे दाखल झाल्यामुळे तडीपार तसेच यासारख्या विविध प्रतिबंधात्मक कारवायांचा भविष्यात सामना करावा लागेल.
तरी सर्व तरुण मित्रांना व  कार्यकर्ते, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखून शांतता राखावी असे आव्हान तालुक्यातील सर्वत्र पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Saturday, October 19, 2019

मतदान कार्ड नसेल तर या कागदपत्रा नुसार आपण मतदान करू शकता !

डी न्यूज लाईव्ह : मतदान आणि आवश्यक ओळखपत्र
जर आपल्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल तर पुढील 11 प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदार आपला हक्क बजावू शकतो. त्यावर एक नजर...  

*1.*  पासपोर्ट. (पारपत्र)

*2.* वाहन चालक परवाना.

*3.* छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र. (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)

*4.* छायाचित्र असलेले बँकांचे/ टपाल कार्यालयाचे पासबुक.

*5.* पॅनकार्ड.

*6.* राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड.

*7.* मनरेगा जॉबकार्ड.

*8.* कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड.

*9.* छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज.

*10.* खासदार/ आमदार/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र.

*11.* आधारकार्ड.


Friday, October 18, 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनगर समाजाला अनेक महत्वाची पदे बहाल केली - विश्वास देवकाते


दौंड प्रतिनिधि : ता.१८ ऑक्टोम्बर २०१९ 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अजित पवार यांनी माझा मतदार संघ सोडून मला दुसऱ्या मतदार संघात उभे करून मला निवडून आणले आहे.
तसेच थेट राज्यमंत्री पदाचा दर्जाचे पद दिले दिलेला शब्द पाळणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता अजित दादा हे एकमेव नेतृत्व असल्याचे  जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले ते आज खामगाव,नांदूर, मिरवडी,दहीटणे,टेळेवाडी,  वडगांव बांडे,वाळकी या गावांमध्ये आज (ता.१८) रोजी दौरा केला.

धनगर समाजाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी अनेक महत्वाची पदे दिली आहेत.
धनगर समाजाला भाजपाने आरक्षण देतो म्हणून फसवले भाजपाच्या भुल थापांना बळी पडू नका.
दौंड मधून रमेश थोरात यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन देवकाते यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ अर्चना पाटील,पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर,नांदूरचे सरपंच विशाल थोरात,मिरवडीचे सरपंच बाळासाहेब शिंदे,विकी खताळ,दादा टेळे,तात्यासाहेब टेळे,भास्कर देवकर,माऊली आबा शिंदे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी धनगर समाजाने कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आव्हान दहीटने येथे बोलताना केले आहे.

Wednesday, October 16, 2019

दौंड तालुक्यातील धनगर समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी !



टीम डी न्यूज लाईव्ह : ता १७ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड विधानसभेचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ आज मिरवडी, दहीटने, खामगांव, नांदूर या ठिकाणी मतदारांच्या गाटीभेटी घेतल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉ अर्चना पाटील म्हणाल्या की भारतीय जनता  पक्षाने धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून फसवले.राहुल कुल यांना महादेव जाणकार यांच्यामुळे आमदारकीचा मिळाली त्यांचाच विश्वासघात याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. घटक पक्षांना संपवण्याचे काम भाजप करीत आहे.

राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे.यांच्यावर भाजपवले बोलायला तयार नाहीत. त्यामुळे रमेश थोरात यांना विजयी करण्याचे आव्हान डॉ पाटील यांनी केले.

यावेळी पुणे  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर, पंचायत समितीचे सदस्य सुशांत दरेकर, अनिल नागवडे, विकी खताळ, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, विठ्ठल थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Tuesday, October 15, 2019

महाराष्ट्रात वातावरण फिरलय - अमोल कोल्हे



डी न्यूज लाइव्ह टीम : ता.१५ ऑक्टोम्बर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेस,काँग्रेस व मिञ पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने यवत ता.दौंड येथील बाजार मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की,पाच वर्षात सोळा हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.आता महाराष्ट्रात वातावरण फिरल आहे.
येणारी निवडणूक विचारांची निवडणूक आहे.देशाचे मुद्दे तुम्ही राज्यातील निवडणुकीसाठी वापरता हे आता चालणार नाही त्यामुळे जनता हुशार आहे.रमेश थोरात यांना निवडून द्या शरद पवार यांच्या विचाराला साथ द्या असे आव्हान यावेळी कोल्हे यांनी सभेला केले.

यावेळी रमेश थोरात म्हणाले की,पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन  म्हनून काम पाहात असताना बेस्ट चेअरमन म्हणून पुरस्कार मिळाला आहे.बँकेच्या मार्फत तीन लाख पर्यंत कर्ज बीन व्याजी दिले जात आहे.
आता भिमा पाटस कारखान्याचे कामगाराचे पगार थकले आहेत. कॉलेज चालवता न आल्याने कॉलेज बंद पडले आहे.
दुध संघावर तीन-चार महीन्यापासून शेतकरी वर्गाला पगार मिळाला नाही.त्यामुळे जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही.अशा प्रकारे चौफेर फटकेबाजी यावेळी थोरात यांनी केली.सभेत यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग दिसून येत होता.

Monday, October 14, 2019

दौंड तालुक्यात अमोल कोल्हे यांची तोफ कडाडणार !


 दौंड प्रतिनिधी : ता.१४ ऑक्टोबर २०१९ काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे दौंड विधानसभेचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ यवत येथे मंगळवार (ता.१५) रोजी  सकाळी  ११ वा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा  सलगर यांची  प्रचार  सभा आयोजित करण्यात आली आहे.

वरवंड येथील शरद पवार यांच्या सभेस अलोट गर्दी जमा झाली होती.मतदारांचा वाढता कल राष्ट्रवादी काँग्रेस कडे झुकलेला दिसून येत आहे.
अमोल कोल्हे यांची तोफ दौंड तालुक्यात कडाडणार म्हणून पुन्हा एकदा वरवंड येथील सभेचे रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

 कार्यक्रमास उपस्थीती म्हणून दौंड राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बापूराव सोलनकर,डॉ.अर्चना पाटील, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग मेरगळ,पुणे जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,सोहेल खान,राणी शेळके,रामभाऊ टुले,दौलत ठोंबरे,नितीन दोरगे व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Saturday, October 12, 2019

दौंड | बोरिभडक | हॉटेलवर वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या टोळीस अटक !

दौंड प्रतिनिधि : ता.१३ ऑक्टोम्बर २०१९ 
वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्यांना अटक, तिघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
5 मुलींची सुटका करण्यात आली.
पुणे सोलापूर हायवे लगत त्रिमूर्ती लॉज वर काही इसम स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता मुली व महिलांना पैशाचे आमिष दाखवून काही मुली, महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याबाबत मा.जयंत मीना सो यांना गोपनीय माहिती मिळाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक श्री मीना सो यांनी श्री भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन आणि बारामती क्राईम ब्रँच चे श्री.चंद्रशेखर यादव यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत कळविले असता सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवुन सापळा लावुन छापा घातला असता सदर ठिकाणी 2 इसम हे स्वतः च्या आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत असताना मिळून आले. सदर आरोपी हे 2 पोलीस स्टेशनच्या बॉर्डर वर हद्दीचा फायदा घेऊन वेश्या व्यवसाय करून घेता होता. सदर ठिकाणी 5 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. २ आरोपींचे ताब्यात घेतले, 3 आरोपींचे विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 आरोपिंची नावे खालील प्रमाणे
1) नविन सलीयन शीना, रा. त्रिमूर्ती हॉटेल यवत 
2) सोहेल गुलमहंमद अन्सारी रा.त्रिमूर्ती हॉटेल यवत 
3) प्रभाकर गोपाळ शेट्टी, रा. उडपी, कर्नाटक.

सदर ची कामगिरी ही संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) जयंत मीना सो अप्पर पोलीसअधीक्षक, बारामती
ऐश्वर्या शर्मा,उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड उपविभाग
यांचे मार्गदर्शनाखाली

भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक,यवत पोलीस स्टेशन
बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे पो.कॉ. दशरथ कोळेकर पो.कॉ. विशाल जावळे
पो.कॉ. शर्मा पवार,पो. कॉ.अमृता भोईटे आणि पोलीस जवान संपत खबाले, महेश बनकर,उत्तप्पा संकुल यवत पोलीस स्टेशन यांनी केली.

दौंड | रमेश थोरात यांची प्रचारात आघाडी !


दौंड प्रतिनिधी : ता.१२ ऑक्टोंबर २०१९ दापोडी  येथील माजी ग्रामपंचायत सदस्य  बबन भाऊ खोडवे यांनी कुल गटातून पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात रमेश थोरात व आप्पासाहेब पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
यावेळी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.तर नानगाव येथे देखिल प्रचारात मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडगाव ते नानगाव व नानगाव ते पारगाव दरम्यान प्रवास करताना असे दिसून येते की १४०० कोटीचा विकास खड्ड्यात बूडाला की काय अशी परीस्थिती सध्या दिसून येत आहे कि,अशी बोचरी टीका नानगाव येथील प्रचार सभेत आमदार राहूल कुल यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांनी केली आहे.

वरवंड येथे झालेल्या शरद पवार यांच्या  रेकॉर्ड ब्रेक सभेची दखल मतदारांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्ता स्वताहुन प्रचार यंत्रनेत सहभागी होताना दिसत आहे.

Friday, October 11, 2019

शरद पवार यांच्या सभेस दौंड वासीयांची अलोट गर्दी !




दौंड प्रतीनिधी : ता.११ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ (ता.११) रोजी वरवंड ता.दौंड येथे माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आज उरुळी कांचन येथील सभा उरकून शरद पवार हे दौंड तालुक्यातील जनतेला रमेश थोरात यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या असे आव्हान करण्यासाठी आले असता एवढा मोठा जनसमुदाय पाहून आमच्या उमेदवाराचा विजय हा नक्की झाला असे त्यांनी यावेळी सुतोवाच केले.

या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे.सत्तेतील सरकारने आता पर्यंत काहीच केले नाही.फक्त आणि फक्त फसवेगिरी या सरकारने चालवली आहे.तब्बल १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांच्या काळात घडल्या आहेत.अनेक मुद्द्यावरून शरद पवार यांनी सरकार विरोधात मोठे टीकास्त्र यावेळी झाडले आहे.

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपाचे दौंड तालुक्याचे उमेदवार राहुल कुल यांच्या विरोधात शड्डू ठोकत घरात माणसे तीन पक्ष चार लोकांनी कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? तसेच खुणशी राजकारण करून जनतेला वेठीस धरणाऱ्याना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे म्हणत खरपूस शब्दात चाकणकर यांनी राहुल कुल यांचा समाचार घेतला.

राहुल कुल यांनी किती तरी कुटुंबाचे वाटोळे केले आहे.धनगर समाजाचा खूप मोठा विश्वासघात यांनी केला आहे.रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून व तुम्ही माय बाप जनता येथे उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसेच हे सर्व पाहून मला अक्षरशा गहिवरून आले आहे असे यावेळी रमेश थोरात यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
संदीप भागवत,जयश्री भागवत,पोपटभाई ताकवणे व इतर कार्यकर्त्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.



Wednesday, October 9, 2019

सुनिता रासकर यांची नानगावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड !


प्रतिनिधी : ता.०९ ऑक्टोंबर २०१९

नानगाव ता.दौंड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुनिता प्रल्हाद रासकर यांची (ता.०८) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.यापूर्वी शारदा खळदकर यांनी (ता.२९ सप्टेंबर) रोजी सहखुशीने राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पदाची जागा हि रिक्त होती.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी पोपट शेलार यांनी काम पाहिले.व  तसेच पोलीस कॉन्स्तेबल विशाल जाधव यांनी उपस्थित राहून गुलालाची उधळण  व फटाके उडवू नका अशी सूचना केली.शांततेत निवडणूक कार्यक्रम पार पडला.

नानगाव ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असून त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आहे त्याचे मी नक्कीच सोने करेल व राहिलेला कालावधीमध्ये सर्वाना विचारात घेऊन चोख काम करेल असे मनोगत यावेळी नवनियुक्त उपसरपंच सुनिता रासकर यांनी केले.


यावेळी सी बी खळदकर,पुष्पा गुंड,विश्वास भोसले,शारदा खळदकर, रुपाली खळदकर,जालिंदर काळे,विकास खळदकर,माऊली खळदकर,विशाल शेलार,संजय रासकर,सुदाम खळदकर,विकास रासकर,नारायण रासकर,माऊली रासकर,प्रल्हाद रासकर व आदि मान्यवर उपस्थित होते.

दौंड | सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटीची केलेली तरतूद हि फसवी - ठोंबरे

Tuesday, October 8, 2019

विश्वासघातकी राजकारण करणारे कुल यांना दौंडच्या जनतेनी जागा दाखवावी-बापूराव सोलनकर


दौंड प्रतिनिधी : ता.०८ ऑक्टोबर २०१९
 माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी राजकारणाचे बाळकडू पाजून ज्यांना मोठे केले त्याच पवार कुटूंबांचा विश्वासात केला.ज्या राष्ट्रीय समाज पक्षामुळे महादेव जानकर यांच्यामुळे राहुल कुल हे आमदार झाले त्यांच्या ही पाठीत विश्वासघाती खंजीर खुपसला आहे. 
जे कुल पवार कुटुंब व जानकर यांचा विश्वासघात करू शकतात ते दौंडच्या जनतेचा विश्वासघात का करू शकतनाही,विश्वासघातकी राजकारण करणारे कुल यांना दौंडच्या जनतेनी जागा दाखवावी असे आव्हान राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे दौंड पक्ष निरीक्षक बापुराव सोनवलकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे कॅाग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माजी आमदार सुभाष कुल व रंजना कुल यांना नेहमीच सहकार्य केले आहे. राहुल कुल यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी राजकारणाचे बाळकडू पवार कुटूंबांनी राहुल कुल यांना दिले आहे. कुल यांना
मदत केली आहे. 
यामुळे कुल हे मोठे झाले आहेत. मात्र त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करून पवार कुटूंबाचा विश्वासघात केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही आमदार कुल यांनी भाजपकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी कांचन कुल यांना उभे करून आपली लायकी दाखवली आहे.ज्या राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकर यांनी उमेदवारी देवून कुल यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार केले.धनगर समाजाच्या मतांवर कुल हे आमदार झाले आहेत.
मात्र मागील पाच वर्षात धनगर समाजाच्याआरक्षणाबाबत कुल यांनी कोणतीच भुमीका घेतली नाही यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षात असताना कुल यांच्या पक्ष विरोधी धोरणाचा आक्षेप घेत कारवाईची मागणी जानकर
यांच्याकडे केली होती. मात्र जानकर यांनी कुल यांच्यावर विश्वास ठेवून कुल यांच्यावर दौंड तालुक्याची जबाबदारी दिली होती. मात्र कुल यांनी भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल करून जानकर व धनगर समाजाचा विश्वासघातकरून आपली राजकीय पोळी भाजली आहे. कुल यांनी आतापर्यंत स्वार्थी व विश्वासघातकी राजकरण केले आहे.यामुळे कुल यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. धनगर समाज व तरूणवर्ग कुल यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यामुळे भाजपा मधील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या संपर्कात असल्याचा दावा सोनवलकर यांनी केला आहे.

Monday, October 7, 2019

महादेव जानकर यांनी राहुल कुल यांची रासपा मधून केली हकालपट्टी!


डी न्यूज लाइव्ह टीम : ता.०७ ऑक्टोम्बर २०१९

अर्ज छाननी प्रक्रियेत रासपाचा एबी फॉर्म न जोडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
त्याच पार्श्वभूमिवर आज (ता.०७) रोजी रासपा मुंबई कार्यालय येथे पदाधीकारी यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी सांगितले की,आमच्या आमदारानी आम्हाला फसवले आहे.अंधारात ठेवले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आले होते.परंतु या सर्व घटनेमुळे पक्षाची खुप मोठी हानी झाली आहे त्यामुळे या दोन्ही जागावरील उमेदवारांना आम्ही पक्षातून बेदखल केले आहे.
तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला मदत करणार असून आम्ही महायुतीतच राहणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दौंडच्या कारभाऱ्यानी कारखाना,शाळा, कॉलेज खाल्ला आता जानकरांचा रासपा पक्ष ही संपवला-पाराजी हंडाळ


दौंड प्रतिनिधी : ता.०७ ऑक्टोबर २०१९
दौंड तालुक्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत.
वाऱ्याच्या वेगाप्रमाणे कार्यकर्ते पक्ष बदलत आहेत. यामध्ये महेश भागवत व आनंद थोरात यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला आहे.यासाठी यापूर्वीही राजाभाऊ तांबे यांना ही राहुल कुल यांनी भाजपा मध्ये घेऊन गेले आहेत.त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होत आहे की,रासपा चे विद्यमान आमदार हे रासपा चे होते की,भाजपा चे?
पक्ष प्रवाशाने दौंड तालुक्यात जातीचे राजकारण सध्या तापू लागले आहेत.
तालुक्यातील नेत्यांनी प्रवेश केल्यानंतर पाराजी हंडाळ यांनी सांगितले की,गेले पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री यांनी आरक्षणाचा शद्ब दिला होता तो शब्द न पाळल्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस कडे झुकताना दिसत आहे.
तालुक्याच्या कारभारी यांनी आधी कारखाना संपवला, शाळा ,कॉलेज संपवले व आता उदयास आलेला महादेव जानकर यांचा रासपा पक्षच संपवला आहे.
तसेच बापूराव सोनलकर यांनी सांगितले की,विद्यमान आमदारांनी रासपा व भाजपाला सोईस्करपणे आपल्या स्वार्थासाठी वापरून घेण्याचे सध्या काम चालवले आहे.२०१४ साली रासपाच्या तिकिटावर कुल यांना आमदार केले त्या महादेव जानकरांच्या पाठीत खंजीर खुपसन्याचे काम या आमदारानी केले आहे.दौंड ची जनता ही भाजपा वर नाराज असून, कुणी कुठेही गेले तरी,यावेळचा आमदार हा राष्ट्रवादी कोंग्रेसचाच असणार आहे.
भिवाजी गरदडे व भानुदास नेवसे यांनी सांगितले कि, अनेक वेळा पक्ष बदल्यामुळे या नेत्यांच्या अनेक संधी अनेक वेळा हुकल्या आहेत.त्यांनी आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलला असून,एवढा काही फरक पडणार नाही व येणारी वेळच यांच्या विषयी जनता ठरवेल. यावेळी माणिक राउत,दौलत ठोम्बरे, रामभाऊ टुले,सुहास रूपनवर व आदि मान्यवर उपस्थित होते.

Sunday, October 6, 2019

दौंड | रासपा कार्यकर्ते यांच्यात नाराजीचा सूर !

दौंड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाढता पाठींबा !



दौंड प्रतिनिधी : ता.०६ ऑक्टोंबर २०१९
दौंड तालुक्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.अर्ज छानणीमध्ये तीन अर्ज बाद झाले असून,१७ अर्ज बाकी राहिले आहेत.अर्ज माघारी घेण्यासाठी (ता.०७) रोजी नंतरच सर्व चित्र स्पष्ठ होईल.
रासपाचे एकमेव विद्यमान आमदार राहुल कुल यांनी चक्क पक्षाचा एबी फॉर्म जोडलाच नाही.त्या सोबत फक्त बीजेपी पक्षाचा एबी फॉर्म जोडला होता.हि बाब रासपा कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्यानंतर सर्व सैराभैर उडाली.आणि जमेल तसे आतील गोटातील कार्यकर्ते रमेश थोरात यांना पाठींबा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करु लागले आहेत.

कुरकुंभ व नानवीज येथील रासपा व बीजेपी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
कुरकुंभ येथील भामाबाई दोडके(ग्रा.सदस्य.कुरकुंभ),तारा सोमनाथ गायकवाड(मा.ग्रा.सदस्य,कुरकुंभ),विशाल गायकवाड(भारीपा पुणे जिल्हा सचिव) यांनी प्रवेश केला आहे.


नानवीज येथील हार्दिक पाटोळे,अमोल पाटोळे,आकाश पाटोळे,विशाल पाटोळे,प्रवीण थोरात,निखील पाटोळे,गौरव पाटोळे,ऋषिकेश लगड,विराज शितोळे,गौरव धुमाळ,रोहन शितोळे,भूषण पाटोळे,अभिजित लगड,अतुल पाटोळे,मुकुंद पाटोळे,निखील पाटोळे,ज्ञानेश्वर पाटोळे,प्रफुल पाटोळे व आदि मान्यवरांनी यावेळी जाहीर प्रवेश केला आहे.


Saturday, October 5, 2019

महादेव जानकर यांना जोरदार धक्का देत राहुल कुल हे भाजप या पक्षाकडून निवडणूक लढविणार !


दौंड प्रतिनिधि : ता.०५ ऑक्टोम्बर २०१९ 
दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव उमेदवार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप या पक्षाकडून दाखल केल्यामुळे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जोरदार धक्का बसला आहे . राहुल कुल यांनी तीन फॉर्म भरले आहे त्याफॉर्म मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून एक अर्ज दाखल केला पण त्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचा AB फॉर्म जोडला नाही तर दोन फॉर्म भाजप या पक्षाकडून भरले आहे त्यासोबत भाजप पक्षाचा AB फॉर्म देखील जोडले आहेत. काल आमदार राहुल कुल यांचा फॉर्म भरण्यासाठी महादेव जानकर देखील उपस्थित होते त्यामुळे त्यांना या बद्दल माहिती होती का नाही या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


2014 मध्ये विधानसभेची निवडणूक राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवली होती तर राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी लोकसभेची निवडणूक भाजप या पक्षाकडून लढवली होती. 
प्रसार माध्यमाशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादा केसकर यांनी सांगितले की,आम्ही AB फॉर्म स्वता त्यांच्या कार्यकर्त्यना कडे दिला होता परंतु त्यांनी जोडला नाही हे आमचे दुर्द्वयच म्हणावे.



याबाबत जिल्हाध्यक्ष हरीश खोमने म्हणले की, जर असेल तर खांद्यावर हात टाकुन गळा आवळयाची आमची अवलाद नाही.रासपला अंधारात ठेवल्याने याचे परिणाम भोगावे लागेल.यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.निवडणुकीत आमची ताकद आम्ही दाखवून देऊन असेही सांगण्यात आले.

Wednesday, October 2, 2019

पारगाव येथील तुकाई देवी मंदिरात नवरात्री निमित्त 100 स्त्री-पुरुष उपवासाला बसले !

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.०३ ऑक्टोबर 
पारगाव ता. दौंड येथील तुकाईदेवी मंदीराला नवरात्रीनिमीत्त विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
नवरात्रीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. यामध्ये गावातील 100 स्री-पुरुष मंदीरात उपवासासाठी बसले आहेत.संबधित भक्त  10 दिवस घरदार सोडुन मंदीरात मुक्कामी असतात. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना फराळ पुरवले जाते. प्रथम  देवीला ग्रामस्थांनी बनवलेल्या 20 तोळे सोने अलंकाराची मिरवणुक निघाली. नवरात्रीमध्ये देवीला सोने परिधान केले जाते. दररोज पहाटे तुकाईदेवी, लक्ष्मीआई, रेणुकादेवी, वाघजाईमाता यांची आरती होते. सायंकाळी आरतीनंतर  देवीची पालखीतुन मिरवणुक निघते. भोई समाजाला पालखीला खांदा देण्याचा मान आहे. ग्रामस्थांच्या वतीने तुकाईदेवी मंदीराला तर रेणुका मित्र मंडळाने रेणुकादेवी  मंदीराला विद्युतरोषणाई केली आहे. घटस्थापणापुर्वी ग्रामस्थांनी 1 लाख 60 हजार रुपये खर्चुन मंदीर परिसरात फरशीकाम केले आहे. पाचव्या व सातव्या माळेला ग्रामस्थांच्या वतीने देवीला तोरण निघते. संपुर्ण पुणे जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात.

दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला वाढता प्रतिसाद;रासपा कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश



दौंड प्रतिनिधी : ता.०२ ऑक्टोबर २०१९

 दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथील रा स प  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात,पक्ष निरीक्षक बापूराव सोलनकर, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे,पंचायत समिती सदस्य उत्तम अाटोळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला आहे.

यावेळी रमेश थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

यामध्ये यावेळी युवा नेते संदीप हडागळे,मिलिंद कड देशमुख,रोहित कड,राजेंद्र गावडे, मदन बर्गे,अशोक बर्गे,पांडुरंग शिंदे,धनराज कोळकर,संग्राम आटोळे आदींच्या उपस्थितीमध्ये हडगळे वस्ती  मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व ग्रामस्थांनी जाहीर प्रवेश केला.