पुण्यामध्ये जोरदार पाऊस
पुणे प्रतिनिधी : पुणे व पिंपरी चिंचवड येथे शुक्रवार ता.०१ जून रोजी गारांचा पाऊस झाला असुन,या पावसाने पुणेकर सुखावले आहेत. पुण्यात आज मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती.घामाच्या धारा निघत होत्या.अंगांची काहिली होत असताना,आज झालेल्या पावसाने पुणेकर सुखवले आहेत.या पावसाने हवेत गारवा जाणवत होता.