"दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुण कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या रोजगारापासून वंचित !"
डी न्यूज लाईव्ह कुरकुंभ प्रतिनिधी (अलीम सय्यद): दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या करिता येथील स्वतः पुढाकार घेऊन स्थानिक रोजगार उपलब्ध देण्याकरिता येथील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या आस्थापनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर प्रथम प्राधान्य हा स्थानिक बेरोजगारांना मिळणे आवश्यक आहे पण कुरकुंभ एम आय डीसी येथील परप्रांतीयांना पहिले प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जाते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही प्रदुषणासाठी बहुवार्चित आहे , गेली तीस वर्षांपासून औद्योगिक वसाहतिचे प्रदुषण ग्रामस्थ सहन करीत आहेत ,अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला प्रदूषण जास्त असताना ही पर्यायी व्यवस्था नसल्याने बहुतांश स्थानिक शेतकरी त्रास सहन करीत याच ठिकाणी राहत आहेत. कित्येकांची जमीन वसाहतितील कंपन्यांना गेल्या आहे अशा स्थितितही स्थानिकाना प्राधान्य दिले जात नसल्याने वसाहतविषयी उच्चशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. असताना देखील येथील स्थानिक तरुणांना नोकरीचा खालचा दर्जाची वागणूक येथिल कंपन्यांकडून दिली जात असल्याचा दावा येथील बेरोजगार करीत आहे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्थानिक तरुणांना रोजगारीकरिता प्राधान्य देत नसल्याने परिसरात बेरोजगार तरुनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न गंभीर बनत चालला आहे कुरकुंभ आणि पांढरेवाडी , परिसरातील युवक सुशिक्षित आणि उच्चशिक्षित आहेंत आशावेळी पात्रता असूनही नोकरीसाठी केलेला अर्जाची साधी दखलही कंपन्यांकडून घेतली जात नाही.संबधित युवक कंपनीच्या गेटवर विचारना करण्यासाठी गेल्यास किंवा संबंधित अधिकार्यांना भेटल्यावर त्यांनी हिन् दर्जाचा वागणूक देत उडवाउडवीची उत्तरे देउन परत पाठवून दिले जाते. गावामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे शिक्षण घेउन देखिल रोजगार मिळत नसल्याने तरुण वाममार्गाचा अवलंब करीत आहेत, याच प्रश्नावर विचार करून येथील स्थानिक तरुण युवक स्वतः सहभाग घेत एम आय डी सी मधील प्रत्येक कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्होवा या करिता प्रत्येक कंपनीत जाऊन स्थानिकांना रोजगार मिळवा असा पत्र , अर्ज, प्रत्येक कंपनी ला देण्यात आला आहे. सर्व तरुण एकत्र येऊन या लढ्याला यश मिळेल अशी अपेक्षा येथील तरुण करीत आहे.
"गेली तीस वर्षांपासून आम्हाला या कंपन्यांनी हीन दरजेची वागणूक दिली पण आता आम्हाला न्याय हवा यामुळे आम्ही सर्व तरुण या प्रत्येक कंपनीना अर्ज देत आहोत."
................ बेरोजगार तरुण
"पुढील काळाचा विचार करून स्थानिक तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार काम व अन्य व्यवसाय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. "
........... छाया नानासो झगडे (सरपंच(नवनिर्वाचित),ग्रा.पं.पांढरेवाडी)
...........रशीद मुलाणी (सरपंच(प्रभारी),ग्रा.पं.कुरकुंभ)
...........राहुल भोसले (सरपंच(नवनिर्वाचित),कुरकुंभ)