Saturday, June 23, 2018

आनंद भोसले या शिक्षकाचे नानगाव येथील जि.प.प्रा.शाळेत कौतकास्पद कार्य !



पी.बी.गांधले(मुख्याध्यापक) व ए.एच.भोसले(उपशिक्षक) यांचा निरोप समारंभ
आनंद भोसले या शिक्षकाचे नानगाव येथील जि.प.प्रा.शाळेत कौतकास्पद कार्य !
पाटेठाण येथील शाळेत बदली; भोसले शिक्षक मुलांच्या व पालकांच्या कायम मनात राहतील

दौंड प्रतिनिधी:जि.प.प्रा.शाळा नानगाव येथील पी.बी.गांधले(मुख्याध्यापक) व ए.एच.भोसले(उपशिक्षक) यांची २७/०२ च्या जीआर नुसार बदली झाली असून,या दोन्हीही शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन (२३जून) रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी केले होते.यावेळी पालकांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी आपल्या मुलांना लावलेल्या शिस्तीविषयी व गुणवत्ता वाढीसाठी केले प्रयत्न हे खर्च खूप कौतुकासप्द असल्याचे सांगण्यात आले.या वर्षीपासून शाळेच्या नूतन इमारतीमध्ये मुलांचा प्रवेश झाला आहे.या नूतन इमारतीसाठी आनंद भोसले व गावकर्यांनी केले प्रयत्न अखेर यशाला आले आहे.सुट्टीच्या काळात सुद्धा शिक्षक आनंद भोसले यांनी स्वतः हजेरी लाऊन शाळेला रंगरोटी व इतर काम काम करून घेण्यास मोठा मोलाचा हातभार लावला आहे.सांस्कृतिक,कला,क्रीडा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास कायम तत्पर असलेले भोसले शिक्षक मुलांच्या व पालकांच्या कायम मनात राहतील.दौंड तालुक्यातील पाटेठाण या शाळेत यांची बदली झाली असून ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यास यावेळी भरभरून शुभेच्छा दिल्या.