Monday, June 4, 2018

पुणे जिल्ह्यात गोपाळ समाजहित महासंघाचा दुसरा वर्धापन दिन साजरा



पुणे जिल्ह्यात गोपाळ समाजहित महासंघाचा दुसरा वर्धापन दिन साजरा

शिरूर प्रतिनिधी : ता.०४ जुलै २०१८ गोपाळ समाजहित महासंघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्यातील शिरूर तालुक्यामध्ये मांडवगण फराटा येथे आयोजित GSM आढावा बैठक पार पडली.गोपाळ समाजहित महासंघाच्या पुढील ध्येय-धोरणांविषयी आणि GSM च्या दोन वर्षाच्या कार्य काळातील कार्यावर एक प्रकाश झोत टाकत समाज बांधवांना संघटनेची गरज का आहे?का आपण एकत्र आलं पाहिजे? शिक्षणाचे महत्त्व तसेच आपल्या समाज बांधवांवर होणारे अन्याय अत्याचाराला कशा प्रकारे संघटनेच्या मार्फत सामोरे जावं अशा प्रकारची माहिती देऊन एका आनंदमय वातावरणामद्धे GSM चा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.