Monday, June 11, 2018

"एक मित्र एक वृक्ष' ग्रुप ने जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान जागृती अभियान,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन


"एक मित्र एक वृक्ष' ग्रुप ने जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान जागृती अभियान,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन

यावेळी विठ्ठलवाडीतील ९७ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.तसेच मृत्यूनंतर नेत्रदान केलेल्या नेत्रदात्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.एक मित्र एक वृक्ष या ग्रुपचे अध्यक्ष  प्रशांत मुथा यांनी गेली ३ वर्षे केलेल्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. श्रीवल्लभ अवचट यांनी आयुर्वेदिक व देशी वृक्षांचे महत्व सांगितले.मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलवाडी शाळेत अडूळसा, पारिजातक, सिसम, वड, पिंपळ, कडूलिंब, बहावा, बकूळ, ताम्हण, उंबर, पांगारा, पळस, आपटा अशा विविध दुर्मिळ व देशी वृक्षांचे रोपन करण्यात आले. "झाडे लावू-झाडे जगवू" हा संदेश देण्यात आला.यावेळी सुभाष फासगे यांनी नेत्रदान जागृतीवर रांगोळी रेखाटली होती.तसेच दौंडचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी नेत्रदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
दौंड तालुक्यात १२ वीच्या विज्ञात शाखेत प्रथम आलेली निकिता जालिंदर कांबळे व १० वीमधून प्रथम आलेली नेहा जालिंदर कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर देऊळगावगाडा माध्यमिक विद्यालयामध्ये १० वीमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेले प्रतिक्षा दादा बारवकर, पवन पोपट बारवकर,प्रतीक नानासो बारवकर,किरणकुमार होले,ॠषिकेश बारवकर या गुणवंत विद्यार्थ्यांचेही वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.