"मजुरांच्या मुलांची यशाला गवसणी ; दहावीत यश गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक"
डी न्यूज लाईव्ह कुरकुंभ प्रतिनिधी(अलीम सय्यद) : श्री फिरंगाईमाता विद्यालयातील अतिशय गरीब कुटुंबातील व घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या कु.गौरी सदाशिव जाधव व अंकित नारायण कांबळे या दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवीत विद्यालयाचे नावलौकिक केले आहे.यश मिळविण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची गरज नाही तर जिद्द चिकाटी आत्मविश्वासाची गरज आहे. हे या दोन विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. अंकित कांबळे याची घरची परिस्थिती बेताची असल्याने तो शाळेतून घरी गेल्यावर रात्री वडिलांच्या मदतीसाठी पावभाजी ची गाडी चालवीत असे अशा हलाखीच्या परिस्थिती मध्ये दहावीत ८६.८० टक्के मिळवीत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु. गौरी सदाशिव जाधव हिने ९०.६० टक्के मिळवीत गणित विषयात१०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.या दोन विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.कोणतीच खासगी शिकवणी नसताना ना कोणतीच सुविधा नसताना देखील प्रतिकूल परिस्थिती वर मात करत यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. एकिकडे सर्व सोयी सुविधा घेऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या पालकांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. परिस्थितीशी सामना करीत उत्तम गुणवत्ता समाजापुढे ठेवणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून ही कौतुक होत आहे.
या दोघांना विद्यालयातील गणित विषय शिक्षक बाबासो सांगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गणित विषयाबद्दल असणारी आवड,सराव तसेच गणित शिक्षक सांगळे यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन हेच आमच्या यशाचे रहस्य आहे असे या दोन विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.
"यशाकरिता कुठल्याही सोयी सुविधांची गरज नसते फक्त आवड व काहीतरी करून दाखविण्याची जिद्द लागते."
.........प्राचार्य,नानासाहेब भापकर (श्री फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ )