दौंड प्रतिनिधी : ता.०६ एप्रिल २०२०
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खडकी व दापोडी येथे शालेय पोषण आहाराचे इयत्ता १ली ते ७वी चे एकूण ४३५ मुले-मुली यांचा पोषण आहाराचे वाटप पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले,सचिन काळभोर,पोलिस पाटिल संदीप काळे,रमेश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाहन सौजन्य खडकी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.या वाटपासाठी काल आपल्या शाळा व्यस्थापन समिती मधील अध्यक्ष शब्बीर पठाण,उपाध्यक्षा सोनाली मोहीते तसेच रत्नमाला शेजाळ, निलिमा काळभोर, बाळासाहेब गुणवरे, श्रीकांत काळे, संतोष निंबाळकर, शुभांगी साळुंखे या सर्व सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन तांदूळ,मसूरडाळ,चवळी,मटकी,मूग ही कडधान्ये यांचे २१७५ पॅकिंग करण्यासाठी सहकार्य केले.यासाठी शिक्षक सुरेश वाळके,हनुमंत पानसरे,हेमंत नाझरकर,विकास काळे,मुख्याध्यापक अमिना सय्यद यांनी देखिल खूप परिश्रम घेतले.
तसेच दापोडी येथील जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीचे एकूण विद्याथी १३३ मुली मुले यांना आहार वाटप मुख्याध्यापिका संगीता खाडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आहाराचे वाटप केले.