केडगाव प्रतिनिधी ता.०४ एप्रिल २०२०
दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कंपनीच्या शेजारी जुगारीचा डाव चालू आसल्याची माहिती आज (ता.०४ एप्रिल) रोजी खब-यामार्फत पोलिसांना मिळाली.
तसेच त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पाच ते दहा लोकांना पकडण्यात आले.त्यातील काही लोकांना त्याठिकाणीच सोडून देण्यात आले.आणि बाकीच्या व्यक्तीना कारवाईला आलेली टीम यांनी सोबत घेऊन चौकीला गेले.संबधीत पोलीस कर्मचारी यांना संपर्क केला असता जुगारीना समज देऊन आम्ही सोडुन दिले आहे असे कळाले.
लॉकडाऊनच्या काळात पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.करोणाचा फैलाव रोखावा हा त्यामागचा उद्देश आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक धनंजय कापरे यांना विचारले असता याबाबत मला काहिच माहिती नाही. मी पाटस टोल नाक्यावर डयुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात सार्वजनीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत आहे.या लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.