केडगाव प्रतिनिधी : ता.०३ एप्रिल २०२०
दौंड़ तालुक्यातील दापोडी व खोपोडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मोल-मजुरी करण-याना व ज्यांचे पोट भरण्यासाठी दारोदारी फिरवे लागत आहे.त्यांना साबणाचे वाटप करण्यात आले आहे.
स्वच्छ हात धुण्यासाठी साबणाचे वाटप करण्यात आले.तर या पूर्वी गावात जंतूनाशक फवारनी केली होती यावेळी करोनाला हरवन्यासाठी स्वच्छता राखन्याचे आवहान सरपंच नंदा भांंडवलकर यांनी केले आह.
यावेळी ग्रामसेवक पुनम थोरात व भाऊसाहेब भांडवलकर यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने साबण वाटप करण्यात आले आहे.
खोपोडी येथे सँनिटायजर व साबणाचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी गावतील सर्व लोकांना सँनिटायजर व साबण देण्यात येणार असल्याचे सरपंच सुवर्णा साळवे यांनी सांगीतले यावेळी उपसरपंच प्रफुल्ल शीतोळे, ग्रामसेवक उद्ध्व जाधव,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.