केडगाव प्रतिनिधी २ एप्रिल
केडगाव ता.दौंड येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ यांच्या वतीने समाजातील विविध वंचित घटकांना (ता.०२ एप्रिल) रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
तसेच यामध्ये वीटभट्टीवर काम करणारे कामगार,बांधकाम करणारे मजूर,कचरा गोळा करणारे घटक तसेच दारोदार फिरणारे फेरीवाले यांना शिधा वाटप करण्यात आले.
आम्ही हे सर्व प्रसिद्धीसाठी करत नसून यामधून बोध घेऊन समाजकार्य करणारे समाजसेवक यांनी पुढे येऊन मिळेल तशी मदत करावी हा यामागील उद्देश असल्याचे मत नितीन कुतवळ यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी राकेश लाड ,गोविंद भोंडवे,संजय गरदडे,महेंद्र गोसावी मेहेर ,राजेंद्र मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.