Tuesday, April 7, 2020

नानगाव येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक !



पारगाव प्रतिनिधी : ता.०७ एप्रिल २०२०

नानगाव(गणेशरोड) ता.दौंड येथे गुरुवार (०२ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून हातवळण एजी लाईन तारांचे घर्षण होऊन २० एकर पैकी १३ एकर ऊस जळून खाक झाला आहे अशी माहिती शेतकरी ज्ञानदेव काळे यांनी दिली आहे.

धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली.आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
या दोन्ही शेतकऱ्यांचे लोखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या आधीही येथील अनेक शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक झाले आहे.अस्मानी संकटांबरोबरच महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते.अशाच प्रकारे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना होत आहेत.
पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक एन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जाळून खाक झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडे संचारबंदी लागू आहे.याचदरम्यान बाजारपेठा हतबल झाल्या आहेत.शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.पारगाव सबस्टेशन कनिष्ठ अभियंता पी.एन. पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.दुष्काळ सदृश परिस्थितीसमोर असताना या ओढवलेल्या संकटांमुळे सरकारकडून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांनकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Monday, April 6, 2020

खडकी व दापोडी येथील शाळेत पोषण आहार वाटप !


दौंड प्रतिनिधी : ता.०६ एप्रिल २०२०
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खडकी व दापोडी येथे शालेय पोषण आहाराचे इयत्ता १ली ते ७वी चे एकूण ४३५ मुले-मुली यांचा पोषण आहाराचे वाटप पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले,सचिन काळभोर,पोलिस पाटिल संदीप काळे,रमेश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाहन सौजन्य खडकी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.या वाटपासाठी काल आपल्या शाळा व्यस्थापन समिती मधील अध्यक्ष शब्बीर पठाण,उपाध्यक्षा सोनाली मोहीते तसेच रत्नमाला शेजाळ, निलिमा काळभोर, बाळासाहेब गुणवरे, श्रीकांत काळे, संतोष निंबाळकर, शुभांगी साळुंखे या सर्व सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन  तांदूळ,मसूरडाळ,चवळी,मटकी,मूग ही कडधान्ये यांचे  २१७५ पॅकिंग करण्यासाठी सहकार्य केले.यासाठी शिक्षक सुरेश वाळके,हनुमंत पानसरे,हेमंत नाझरकर,विकास काळे,मुख्याध्यापक अमिना सय्यद यांनी देखिल खूप परिश्रम घेतले.

तसेच दापोडी येथील जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीचे एकूण विद्याथी १३३ मुली मुले यांना आहार वाटप मुख्याध्यापिका संगीता खाडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आहाराचे वाटप केले.

Saturday, April 4, 2020

दापोडी येथे जुगार खेळणाऱ्याना समज देऊन सोडले?


केडगाव प्रतिनिधी ता.०४ एप्रिल २०२०
दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कंपनीच्या शेजारी जुगारीचा डाव चालू आसल्याची माहिती  आज (ता.०४ एप्रिल) रोजी खब-यामार्फत पोलिसांना मिळाली.

तसेच त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पाच ते दहा लोकांना पकडण्यात आले.त्यातील काही लोकांना त्याठिकाणीच सोडून देण्यात आले.आणि बाकीच्या व्यक्तीना कारवाईला आलेली टीम यांनी सोबत घेऊन चौकीला गेले.संबधीत पोलीस कर्मचारी यांना संपर्क केला असता जुगारीना समज देऊन आम्ही सोडुन दिले आहे असे कळाले.

लॉकडाऊनच्या काळात पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.करोणाचा फैलाव रोखावा हा त्यामागचा उद्देश आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक धनंजय कापरे यांना विचारले असता याबाबत मला काहिच माहिती नाही. मी पाटस टोल नाक्यावर डयुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात सार्वजनीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत आहे.या लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Friday, April 3, 2020

दापोडी व खोपोडीमध्ये सँनिटायजर व साबणाचे वाटप।



केडगाव प्रतिनिधी : ता.०३ एप्रिल २०२०
दौंड़ तालुक्यातील दापोडी व  खोपोडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मोल-मजुरी करण-याना व ज्यांचे पोट भरण्यासाठी दारोदारी फिरवे लागत आहे.त्यांना साबणाचे वाटप करण्यात आले आहे.

स्वच्छ हात धुण्यासाठी साबणाचे वाटप करण्यात आले.तर या पूर्वी  गावात जंतूनाशक फवारनी केली होती यावेळी करोनाला हरवन्यासाठी स्वच्छता राखन्याचे आवहान सरपंच नंदा भांंडवलकर यांनी केले आह.

यावेळी ग्रामसेवक पुनम थोरात व भाऊसाहेब भांडवलकर यांच्या    उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने साबण वाटप करण्यात आले आहे.           

खोपोडी येथे सँनिटायजर व साबणाचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी गावतील सर्व लोकांना सँनिटायजर व साबण देण्यात येणार असल्याचे सरपंच सुवर्णा साळवे यांनी सांगीतले यावेळी उपसरपंच प्रफुल्ल शीतोळे, ग्रामसेवक उद्ध्व जाधव,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, April 2, 2020

दौंड | केडगाव | समाजातील विविध वंचित घटकांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप !


केडगाव प्रतिनिधी २ एप्रिल                
केडगाव ता.दौंड येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ यांच्या वतीने समाजातील विविध वंचित  घटकांना (ता.०२ एप्रिल) रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच यामध्ये वीटभट्टीवर काम करणारे कामगार,बांधकाम करणारे मजूर,कचरा गोळा करणारे घटक तसेच दारोदार फिरणारे फेरीवाले यांना शिधा वाटप करण्यात आले.

आम्ही हे सर्व प्रसिद्धीसाठी करत नसून यामधून बोध घेऊन समाजकार्य करणारे समाजसेवक यांनी पुढे येऊन मिळेल तशी मदत करावी हा यामागील उद्देश असल्याचे मत नितीन कुतवळ यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी राकेश लाड ,गोविंद भोंडवे,संजय गरदडे,महेंद्र गोसावी मेहेर ,राजेंद्र मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, April 1, 2020

दौंड | यवत | संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ युवकांवर गुन्हा दाखल !

केडगाव प्रतिनिधी : ता.०१ एप्रिल २०२०
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. या विषाणूपासून वाचायचे असेल गरज नसताना नागरिकांनी बाहेर पडणे टाळायला हवे मात्र तसे होताना दिसत नसून शासकीय आदेशाची पायमल्ली करून मोकाटपणे बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली असून यवत, केडगाव, बोरीपारधी येथे आज यवत पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत सुमारे १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

अनेकवेळा पोलिसांनी सूचना देऊनही बेफिकीरपणा करणाऱ्यांना यवत पोलिसांनीही जशास तसे उत्तर देत या १३ युवकांवर कलम१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या युवकांबाबत माहिती देताना यवत, केडगाव, बोरीपारधी या ठिकाणी लॉकडाउन आदेशाचे पालन न करता मोकाटपणे फिरत असलेल्या सुजित राजाराम करडे, संतोष बजरंग लोकरे, प्रसाद अशोक रोकडे (रा.यवत)  सुदाम बाळू चव्हाण, सुभाष बबन ताडगे, उमेश मछिंद्र देशमुख, दत्तात्रय प्रेमा जाधव, (रा.बोरीपारधी) चौफुला येथील शेखर विलास राजगुरू तसेच केडगाव येथील अमोल पोपट जाधव, रमेश तुकाराम सूळ, गणेश रामदास सरोदे, महेश दादासो गरदडे, किरण माणिक सरोदे या सर्वांना ड्रोन व पेट्रोलिंग करताना पकडण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

Monday, March 30, 2020

पोलीस कर्मचारी व आशा सेविका यांना मास्क व सॅनिटाईझरचे वाटप !



पुणे प्रतिनिधी ता:३० मार्च २०२०
अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर जिल्हा शाखा व स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान यांच्या  वतीने यवत पोलिस स्टेशन,केडगाव पोलिस चोकी व बोरिपार्धी येथील आशा सेविका यांना मास्क व सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.
तसेच यांप्रसंगी मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष  संतोष नानवटे कायदेतज्ञ,प्रदीप बेलसरे मराठा क्रांती मोर्चा व मराठा महासंघ राज्य समन्वयक परशुराम कासुळे व प्रतिष्ठानचे सतीश ताडगे,दिलीप ठाकूर,रवींद्र ताडगे, आनंदराव सोडनवर,अजय ताडगे, कविता ताडगे,आशा सेविका व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल ताडगे उपस्थित होते.

पुण्यातील मिरॅकल एड फाउंडेशन भागवतंय रोज ५०० जणांची भूक !




पुणे प्रतिनिधी ता: ३० मार्च २०२०                                
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.मात्र, यामुळे अनेकांचं जीवन विस्कळीत झालं आहे.लॉकडाऊन दरम्यान बेघर आणि हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहेत.हे ओळखून त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून पुण्यातील मिरॅकल एड फाऊंडेशनने शहरात गरजूंना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. 
 
पहिल्या दिवशी पुण्यातील विविध भागांत २०० लोकांना मोफत जेवण वितरित करण्यात आलं आणि आजपासून पुढील २० दिवस रोज ५०० लोकांचं जेवण वितरित करण्यात येणार आहे.पुणे शहरातील बाहेर गावाहून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.या लॉकडाऊन दरम्यान सर्व मेस बंद असल्याकारणाने त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत असे विद्यार्थी, फुटपाथवर राहणारे, बेघर, गरजू आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस बांधवांसाठी मोफत जेवण दिलं जात आहे. 
 
मिरॅकल एड फाउंडेशन ट्रस्ट आणि इतर मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने  पुढचे २० दिवस रोज ५०० लोकांसाठी तयार जेवण आणि काही फूड पॅकेट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल हिरेमठ यांनी दिली. या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी पुढे येऊन शासनाला सहकार्य करण्याचं आणि या कामात हातभार लावण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
 



Friday, March 27, 2020

कर्जाचे हफ्ते तीन महिन्यानंतर भरले तरी चालतील - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास



मुंबई | डी न्यूज लाईव्ह वृत्त सेवा : कोरोनामुळे घाबरलेल्या नागरिकांना रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाने दिलासा दिला असून सर्व कर्जांचे हप्ते तीन महिन्यांसाठी नाही भरले तरी चालतील, अशी घोषणा केली. तसेच व्याजदरात (रेपो रेट) 0.75 टक्क्यांनी कट केल्याने अनेकांच्या कर्जांचे हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत आज घोषणा केली. कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे दास यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल 1.70 लाख कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आज आरबीआयने घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. गृह, वाहन, उद्योग, या साठीच्या कर्जदारांना याचा उपयोग होईल

Thursday, March 26, 2020

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा !



डी न्यूज लाईव्ह वृत्तसेवा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये जनतेला आर्थिक अडचण येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मोठी घोषणा करत 80 कोटी लोकांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा करताना सर्वच बाबी लक्षात घेऊन या मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्योगधंदे ठप्प झाले असून अनेकांचे रोजगार, व्यवसाय बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

निर्मला सीतारामन यांनी आज  कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी Live पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या विविध योजनांची माहिती दिली आहे.
"अर्थमंत्री सीतारामन" यांनी पुढील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
~ कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
~ पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर मानसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.
~ मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.
~ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत. याचा फायदा 8.69 करोड शेतकऱ्यांना होणार आहे.
~ जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार.
~ उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.

Tuesday, March 24, 2020

नानगांव येथे निर्जंतुक औषध फवारणी !


दौंड | नानगाव - कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्याची खबरदारी म्हणून नानगांव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीकडून गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नानगांव हे गाव शिरूर- दौंड तालुक्‍याला जोडणारे असल्याने या गावातून सातत्याने प्रवाशांची वर्दळ असते.

परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवा व सुविधा सुरू आहेत.
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये देखील जनजागृती केली जात आहे, अशी माहिती नानगांव ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा गुंड यांनी दिली.

शासनानेही जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई केली जात आहे. मेडिकल, किराणा दुकान, दूध डेअरी या अत्यावश्‍यक सेवा वगळता परिसरात सर्व दुकाने बंद असून पोलीस प्रशासनाच्या वतीने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

दापोडीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक औषधाची फवारणी !


केडगाव प्रतिनिधी ता.२४ मार्च

जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची आता राज्य सरकारसह ग्रामपंचायतींनीही स्वच्छतेला प्राधान्य देत  गावातून जंतुनाशक औषध फवारणी मोहीम हाती घेतली आहे. 

तसेच एक भाग म्हणून आज दि.२४ मार्च रोजी  दौंड तालुक्यातील दापोडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नंदा भांडवलकर  यांच्या उपस्थितीमध्ये औषध फवारणी सुरू करण्यात आली. यावेळी दापोडी  ग्रामपंचायत कर्मचारी, काही सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

औषध फवारणी अगोदर कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत  माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन म्हणून जनजागृती करणे, घराघरांतून कोरोना व्हायरसबाबत आवश्यक काळजी व उपाययोजना याची माहिती देण्यात आली.

Monday, March 23, 2020

राज्यात आजपासून संचारबंदी | जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


डी न्यूज लाईव्ह वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करून संपूर्ण राज्यात नाईलाजाने संचारबंदी लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की,यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहतील,सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा प्रार्थनास्थळंही आजपासून बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गर्दी नाही म्हणजे नाहीच असे ठणकावले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं आणि घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाणार आहे.

“घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या निर्बुद्धांमुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही.

सगळे मिळून या संकटावर मात करु असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केली आहे.

Sunday, March 22, 2020

दौंड | वरवंड | एमएसईबी च्या वरवंड सबस्टेशनवर चोरट्यांचा हल्ला !

दौंड प्रतिनिधी : ता.२३ मार्च
दौंड तालुक्यातील वरवंड येथे असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चार चोरट्यांनी सशस्त्र हल्ला करून तेथे कार्यरत असणाऱ्या गणेश शितोळे (वय 35) या ऑपरेटरला गावातील लाईट बंद कर असे म्हणून त्याच्या डोक्यात कुर्हाड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार आज दि.२३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडला आहे. या हल्ल्यामध्ये एमएसईबीचे ऑपरेटर गणेश शितोळे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर चोरट्यांनी शितोळे यांच्या खिशातील ४ हजार रोख रक्कम, दोन मोबाईल आणि दुचाकी असा ऐवज घेऊन ते पसार झाले असल्याची माहिती शितोळे यांनी दिली आहे.

माहिती मिळताच यवत, पाटस पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून गणेश शितोळे यांना साईदर्शन या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

Saturday, March 21, 2020

कोरोना व्हायरस | दौंड | रेल्वे स्टेशनवर "त्या" प्रवाशाला दोन तास ठेवले स्ट्रेचरवर !

दौंड (पुणे) प्रतिनिधी : ता.२१ मार्च
होम क्वारंटाइनची सूचना असतानाही मुंबईवरून गुलबर्गाकडे उद्यान एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाला दौंड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. पूर्वसूचना देऊनही आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने सदर प्रवासी पावणे दोन तास स्ट्रेचरवर होता.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि प्रादुर्भाव वाढू नये याकरिता कतार येथून मुंबई विमानतळावर आलेल्या या प्रवाशाच्या हातावर मुंबई येथे होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. दरम्यान, विमानतळावरून आलेला हा 28 वर्षीय तरूण आज (ता.21) साध्या तिकिटावर मुंबई-बंगळुरू उद्यान एक्सप्रेसच्या आरक्षित डब्ब्यातून प्रवास करीत होता. हातावर शिक्का असतानाही प्रवास करीत असल्याने उद्यान एक्सप्रेसमधील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे चौकशी करून नियंत्रण कक्षाला कळविले.
नियंत्रण कक्षाने त्या प्रवाशाला दौंड येथे उतरविण्याचे आदेश दिले.
दरम्यान दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी उद्यान एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकावर दाखल होताच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास यांच्या निरीक्षणाखाली त्याला उतरविण्यात आले. तो प्रवास करत असलेला डब्ब्यावर फवारणी करून त्यामधील प्रवाशांना अन्य डब्यांमध्ये हलविण्यात आले. रेल्वे स्थानक व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन यांच्यासह लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी केली.
पुढील तपासणी व उपचारांसाठी सदर प्रवाशाला पुणे येथे हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. परंतु दुपारी एक वाजता आलेला सदर प्रवाशाला रूग्णवाहिका नसल्याने दुपारी दोन वाजून 50 मिनिटांपर्यंत स्ट्रेचरवर ठेवण्यात आले होते. दौंड येथील उपजिल्हा रूग्णालय व आपत्ती व्यवस्थापन कक्षात समन्वय नसल्याने पावणे दोन तास सदर तरूण रेल्वेच्या लिफ्टजवळ स्ट्रेचरवरच होता. रूग्णालयातून पुढील तपासणीसाठी त्याला पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

माजी आमदार रमेश किसन थोरात यांच्या प्रयत्नाला यश !

दौंड प्रतिनिधी दि २१                                          दौंड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
माजी आमदार रमेश किसन थोरात, सभापती आशा शितोळे,पंचायत समिती दौंड उपसभापती नितीन दोरगे,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रयत्नातून दौंड पंचायत समितीच्या नूतन ईमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे.
दौंड शहरात मध्यवर्ती ठिकाणी पंचायत समिती नुतन ईमारत होण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.
वेळोवेळी पाठपूरावा करत असताना दादांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस करत ७ कोटी रूपयांच्या या कामास प्रशासकिय मंजूरी मिळाली आहे.

Friday, March 20, 2020

दौंड | चौफुला | वाखारी | भीषण अपघातात एक जखमी तर एक जागीच ठार !



केडगाव प्रतिनिधी : ता.२० मार्च 

पुणे सोलापूर महामार्गावर (२० मार्च) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जखमी तर एक जागीच ठार झाले आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर  ट्रक आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
 या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.अपघात झालेले इसम हे  शिंदावणे येथे नातेवाईकाच्या अंत्यविधी साठी गेले होते.परंतु घरी परत येत असताना  यांच्यावरच काळाने घाला घातला आहे. हे इसम शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा   येथील असल्याचे समजले आहे.
या जखमी झालेल्या इसमास पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात  दाखल करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Wednesday, March 18, 2020

अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळासाठी बापूराव सोलनकर दावेदार !

दौंड प्रतिनिधी दि १८               
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्ष निरीक्षक बापुराव सोलनकर यांची अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळावर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
बापुराव सोलनकर यांचा महाराष्ट्र मध्ये धनगर समाजामध्ये मोठा जनसंपर्क आहे.त्यांनी मेंढपाळांच्या विविध समस्या बाबत आवाज उठवला आहे.सोलनकर यांची निवड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला फायदा होईल.आपण या विषय सकारात्मक निर्णय द्यावा असे पत्र अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.हे पत्र संदिपान महादेव वाघमोडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Tuesday, March 17, 2020

निधन वार्ता | बबन बोराटे यांचे अल्पशा आजाराने निधन !

दौंड,प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील नांदुर येथील बबन रावजी बोराटे (वय-८२ वर्ष ) यांचे सोमवार दि.१६ मार्च २०२० रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. बबन बोराटे हे प्रगतशिल शेतकरी म्हणून गावामध्ये प्रसिध्द होते. धार्मिक कार्यक्रमाची खुप आवड असणारे सर्वांशी मनमिळाऊ होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा खुप मोठा परिवार आहे. पुणे जिल्हा पञकार संघाचे दौंड तालुका सचिव व दैनिक प्रभातचे पञकार अतुल बोराटे यांचे ते आजोबा होते. दि.२० मार्च २०२० रोजी त्यांचा दशक्रिया विधी वैकुंठ स्मशान भुमी नांदुर (बोराटे वस्ती) या ठिकाणी करण्यात येईल.

Friday, March 13, 2020

दौंड | नांदूर | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांकडून अटक !

यवत प्रतिनिधी : ता.१३ मार्च २०२०
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदूर गावच्या महालक्ष्मी मोबाईल शॉपी समोर एकावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांनी अटक केली आहे.
 सदर हकीकत अशी की विक्रम बबन चौगुले वय वर्षे 26 धंदा चायनीज हॉटेल राहणार नांदूर साई कृपा बिल्डिंग तालुका दौंड जिल्हा पुणे यांस ता.६/३/२०२० रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या  दरम्यान नांदूर गावच्या हद्दीतील महालक्ष्मी मोबाईल शॉपी समोरील नांदूर रोड वर तालुका दौंड जिल्हा पुणे येथील तरुण  भरत अनिल शिंदे वय २२ वर्षे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे व इतर त्याचे तीन साथीदारांनी  हॉटेलच्या वादाच्या कारणावरून रस्त्यात अडवून लोखंडी रॉड, कुर्‍हाडीने व बांबूच्या काठीने फिर्यादी विक्रम चौगुले यांचे डोक्यात, तोंडावर हातापायावर मारहान करून गंभीर जखमी केले अशी फिर्याद दाखल करण्यात आली.त्यानुसार  तारीख ७/३/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात  आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी  भरत शिंदे  राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे हा गुन्हा केल्यापासून फरार होता त्याबाबत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आरोपीचा शोध घेणे बाबत धनंजय कापरे पोलीस उपनिरीक्षक, दशरथ बनसोडे पोलीस नाईक, संतोष पंडित पोलीस नाईक यांचे एक खास पथक तयार करून आरोपी अटक करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा उरुळी कांचन तालुका हवेली परिसरात येणार असल्याची माहिती सदर पथकास मिळाल्याने आरोपीच्या शोधात पोलिस पथक गेले होते.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तारीख ११/३/२०२० रोजी पोलीस नाईक दशरथ बनसोडे, संतोष पंडित, रमेश चव्हाण यांनी आरोपी  भरत शिंदे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तालुका हवेली पीएमटी बस स्टॉप येथून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहे.

Thursday, March 12, 2020

दौंड | यवत | बारामती क्राईम ब्राँचने ११ लाख ३६ हजारांचा गुटखा केला जप्त !


दौंड प्रतिनिधी : ता.१२ मार्च

दौंड तालुक्यातील यवत येथे बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने जोरदार कारवाई करत सुमारे अकरा लाख छत्तीस हजारांचा गुटखा तसेच गुटखा वाहतूक करणारी पाच लाखाची पिकअप असा सुमारे सोळा लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील,बारामती विभागाचे अप्पर पोलीस, अधीक्षक (आय.पी.एस) जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ,संदीप जाधव,स्वप्निल अहिवळे, शर्मा, पवार, विशाल जावळे,  तसेच बारामती उपविभागीय कार्यालयाचे पो हवा. रमेश केकान, यवत पोलीस स्टेशन चे पोलिस जवान सोमनाथ सुपेकर, नारायण जाधव यांनी कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना गोपनीय माहितीद्वारे यवत शहरामध्ये गुटख्याच्या मोठा साठा करून तो यवत शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पिकअप वाहनाने सप्लाय करून विक्री करत असल्याची खबर मिळाली होती. सदर इसमाची आणि त्याचे गोडाऊनची माहिती घेऊन त्या ठिकाणी छापा टाकणे. बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना जयंत मीना यांनी आदेश दिले असता त्यांनी त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यवत शहरात मलभारे वस्ती येथे गोपनीयरित्या जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान आणि यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस जवान यांच्यासह अचानक  छापा टाकला असता सदर ठिकाणी राजेंद्र गणपत मलभारे (रा. मलभारे वस्ती, यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे) हा 11,36,058 रु किमतीचा विमल, महेक, आर.एम.डी, तुलसी, नावाचा गुटखा आणि 5 लाखाच्या पिकअप गाडी असा एकूण 16,36,058 रुपयांचा
गुटखा व वाहन  बेकायदेशीररित्या बाळगून बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला असून त्याचे ताब्यातून वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन, पुणे यांना कळविले असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब चौगुले यांना राज्यस्तरीय सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान !



पारगाव प्रतिनिधी : ता.१२ मार्च २०२०

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने भाऊसाहेब चौगुले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्यामुळे आपले कार्य समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे.म्हणूनच आपल्या कार्याची दखल घेऊन गुरुवार दि.१२ मार्च रोजी सांस्कृतिक आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात भाऊसाहेब चौगुले यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले  (तंजावर तमिळनाडू) व्यंकोजीराजे यांचे १३वे वंशज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भाऊसाहेब चौगुले हे गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पुणेचे अध्यक्ष असून समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी नवनाथ गव्हाणे यांच्या विचारसरणीला प्रेरित होऊन जी.एस.एम राज्य अध्यक्ष प्रभाकर तपासे आणि उपाध्यक्ष सुभाष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक कार्य करत आहेत.

कुटुंबातील गरीब परिस्थिती मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून चौगुले हे सध्या पशुपालन व्यवसाय करत आहे. विखुरलेल्या समाजाला संघटीत करून समाजहिताचे कार्य मोठ्या जोमाने हाती घेऊन गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे चे अध्यक्ष पद भाऊसाहेब चौगुले हे भूषवत आहेत.

यावेळी हा पुरस्कार प्रदान करताना संमेलनाध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर,संस्थापक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव,स्वागताध्यक्ष शिवाजीराव कोलते,निमंत्रक राजकुमार काळभोर,राजाभाऊ जगताप,संजय सोनवणे,गंगाराम जाधव,सुनील धिवार,रवींद्र फुले,नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे,सुनील लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हा पुरस्कार स्वीकारताना रमेश पवार,नंदकुमार पवार, दत्तात्रय चौगुले,प्रदीप गव्हाणे,मच्छिन्द्र कोळेकर,दिपक पवार,गणेश पवार आदी उपस्थित होते.

Monday, March 9, 2020

जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांचा सन्मान !


केडगाव प्रतिनिधी : ता.०९ मार्च २०२०                              स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित् बोरिपार्धी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
 दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तात्यासाहेब टुले,प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल ताडगे, दिलीप ठाकूर, मच्छीन्द्र लकडे ,संभाजी कोळपे, अमोल धनवडे, अमोल ताडगे, साहेबराव सोडणवर, विकी ताडगे, सेविका नंदा जाधव, वर्षा होळकर,शैला बर्वे, संध्या टेंगले, सुजाता चव्हाण , अजय ताडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sunday, March 8, 2020

दौंड | नानगाव | मांगोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ !


पारगाव प्रतिनिधी : ता.०९ मार्च २०२०

यात्रा या संकल्पनेला ग्रामीण महाराष्ट्रात वेगळे स्थान आहे. लोकांच्या मनाला आनंद देणारा आणि आंतरमनाला साद घालणारा हा उत्सव असाच उत्सव नानगाव (मांगोबा माळ) ता.दौंड येथे होळी पौर्णिमा निमित्त श्री मांगोबा महाराज यात्रा उत्सव (ता.०९) रोजी पासून सुरू होत आहे.नानगाव व दापोडी शिवेवरती असलेल्या श्री मांगोबा महाराजांचे मंदिर आहे.
दरवर्षी या उरुसास अनेक भाविक भक्त दर्शनास या ठिकाणी येत असतात.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ वा अभिषेख,५ वा सायंकाळी होळी पेटवणे,६ ते ९ वा श्री मांगोबा महाराज नानगाव ते देवस्थान सवाद्य मिरवणूक,९.३० वा ईश्वर बापू पिंपरीकर सह गणेश कुमार महेश कुमार पिंपरीकर लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष सहकार्य म्हणून सुरेश महाराज खळदकर,आनंद कदम व बाळासाहेब खळदकर यांचे असते अशी माहिती यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य राहुल वळू यांनी दिली आहे.
यावेळी मा.ग्रा.पं सदस्य विकास आढागळे,मच्छीन्द्र आढा गळे, गणेश शेंडगे,सागर आढागळे, अक्षय आढागळे, दिपक पाटोळे,सुनील आढागळे व आदी मान्यवर उपस्थित होते.

अवैध मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

डी न्यूज लाईव्ह टीम बारामती, दि. ०८ : कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. तथापि, अजूनही अवैध मार्गाने विक्री होताना आढळून येत आहे. अशा अवैध मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथील हॉस्पिटल आणि सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील तसेच विविध संस्थेचे मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीनुसार जगामध्ये कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा आजार असून या आजारामुळे मोठ्या संख्येने नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. हवामानबदल, आहारातील बदल तसेच ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तथापि,  कर्करोग झालेल्या रुग्णांनी घाबरू नये, वेळीच औषधोपचार घ्यावेत, रोज सकस व प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेता आरोग्य या विषयासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता जागांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहेत. नागरिकांनी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करून डॉ. रमेश भोईटे व त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले. 

Thursday, March 5, 2020

दौंड | उंडवडी | उंडवडी येथे मोफत रेशनिंग कार्ड मेळावा !



यवत प्रतिनिधी : ता.०५ मार्च 
ञिदल सैनिक सेवा संघ,महाराष्ट्र राज्य,माहिती सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत उंडवडी यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील उंडवडी येथे सामान्य गोरगरिब जनतेसाठी मोफत रेशनिंग कार्ड मेळावा आयोजित करण्यात आला होता.यामध्ये नविन कार्ड, विभक्त, दुबार कार्ड, नाव कमी करणे, नाव वाढविणे यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या याच बरोबर  श्रावण बाळ योजना , संजय गांधी निराधार योजना व शासकीय अनेक योजनांची माहिती देण्यात आली.अनेकांनी या योजनांचा लाभ घेतला संस्थेच्या कार्याचे कौतुक केले  यापुढे संस्थेला सहकार्य केले जाईल असे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप लगड यांनी नागरिकांना संस्थेची माहिती दिली. 

कार्यक्रमासाठी ञिदल सैनिक सेवा संघाचे सतिश बोराटे, विकास यादव, गणेश सोनवणे, तानाजी यादव, उंडवडीच्या सरपंच सौ.वैशालीताई गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे, सदस्य सतिश लोहकरे, सदस्या इंदुबाई जाधव, रेशनिंग दुकानदार ,शहा, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंड, माहिती सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, March 4, 2020

रावणगाव येथील बेपत्ता तरुण कुंजीरवाडी येथे सापडला !

रावणगाव प्रतिनिधी : ता.०४ मार्च २०२०
रावणगाव ता.दौंड येथील महाविद्यालयीन विद्यार्थी घरातून न सांगताच (ता.०२ मार्च) रोजी बेपत्ता झाला होता.
तेजस पोपट फाजगे असे या तरुणाचे नाव आहे.तीन दिवसानंतर या तरुणाचा शोध कुंजीरवाडी ता.हवेली येथे लागला आहे.
याबाबत रावणगाव पोलीसाना कळवण्यात आले होते.तसेच हा तरुण त्याचा घरी पोहचला असून सोशल मिडीयावर व्हारल करण्यात आलेल्या मेसेज व पालकांच्या सतर्कतेमुळे त्याचा शोध घेण्यास यश मिळाले आहे.तरी यापुढे शोध घेणे व पोस्ट टाकणे थांबवण्यात यावे अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे.

Saturday, February 29, 2020

मढी येथील मानाच्या होळीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील - नंदकुमार पवार

पाथर्डी  प्रतिनिधी : ता.२९ फेब्रु 

श्री क्षेत्र मढी या ठिकाणी कानिफनाथ महाराज मंदिर असून भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून या ठिकाणाला महत्व आहे.सदर मंदिराचे बांधकाम करण्याकामी गोपाळ समाजाची महत्वाची भूमिका होती.त्यामुळे गोपाळ समाजाला होळीच्या दिवशी सर्वप्रथम होळी पेटवण्याचा मान असतो.
श्री क्षेत्र मढी या ठिकाणाची मानाची होळी पेटवल्यानंतरच संपुर्ण भारतभर होळी पेटवली जाते. परंतु आजपर्यंत गोपाळ समाजातील काही कुटुंबांनी समाजाची दिशाभूल करून होळी पेटवण्याचा मान स्वतःकडेच ठेवला आहे.परीणामी समाजातील इतर लोकांना होळीचा मान आजतागायत घेता आला नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी संपूर्ण भारतातून येणाऱ्या समाजाची लोकसंख्या वर्षानुवर्षे कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे दरवर्षी एकत्र येऊन होणारे कार्यक्रम व प्रबोधन होत नाही.मढी येथे होणारी आर्थिक उलाढाल कमी होत चालली आहे. मोठया पोलीस बंदोबस्तामुळे राज्य शासनाचा खूप मोठा खर्च होऊन पोलीस डिपार्टमेंटला मानसिक तनावाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून चालू वर्षी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी मानाची होळी पेटवण्याचा मान नवीन व्यक्तींना रोटेशन पद्धतीने देण्यात यावा याबाबत भारतातील गोपाळ समाजातील प्रतिनिधींनी ठराव करून नवीन मानकऱ्यांबाबतचे निवेदन देवस्थान ट्रस्टला दिनांक 10 फेब्रुवारी 2020 ला दिले होते. त्यानंतर जुने मानकरी यांच्या खोट्या सह्या करून काही लोकांनी देवस्थान ट्रस्ट ला 13 फेब्रुवारी 2020 ला अर्ज करण्यात आला होता. देवस्थानकडे दोन अर्ज आल्यामुळे होळी यात्रेचे अध्यक्ष या नात्याने त्या दोन्ही अर्जाबाबत निर्णय देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट ने मा तहसीलदार पाथर्डी यांना निवेदन पाठवले.त्यांनतर तहसीलदार यांनी सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ला दोन्ही अर्जदारांना बोलावून सुनावणी घेतली. त्यामध्ये जुने मानकरी यांच्या वतीने पंडित लोणारे,माणिकराव लोणारे व नामदेव माळी यांनी आपली बाजू एकही पुरावा न देता मांडली अशी माहिती यावेळी गोपाळ समाजहित महासंघ पश्चिम महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली आहे.
तसेच नवीन मानकरी यांच्या वतीने नंदकुमार पवार व सुभाष गव्हाणे यांनी सर्व पुराव्यानिशी आपली बाजू मांडली. नवीन मानकरी यांना मान देण्यात यावा यासाठी भारत देशातील विविध राज्यातील व जिल्ह्यातील जवळपास 800 ते 900 सह्यांचे निवेदन तसेच महाराष्ट्र राज्यातील गोपाळ समाजाच्या दोन मोठ्या संघटनांच्या ठरावाच्या प्रति सुद्धा देण्यात आल्या होत्या,तरी तहसीलदारांनी नवीन मानकरी यांचा अर्ज निकाली काढला आहे. 1999 साली झालेल्या सुलेनाम्या नुसार भारतातील समाज बांधव ठरवतील त्यांना मान देण्यात येईल असे पाथर्डी कोर्टासमोर निर्णय झाला असताना सुद्धा देवस्थान ने 1999 ते आजपर्यंत त्याच त्या लोकांना होळी चा मान दिल्यामुळे कोर्टाचा देखील अवमान झाला असून,तहसिलदार यांनी कोणत्या कागद पत्रांच्या आधारे व कोणत्या कायद्याच्या आधारे संबंधित नवीन मानकरी यांचा अर्ज फेटाळला हा एक मोठा प्रश्न असून त्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील केले आहे. तसेच लवकरच सामाजिक न्याय मंत्री यांना भेटणार असल्याची माहिती गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

"जुने मानकरी हे स्वयंघोषित मानकरी असून ते विशिष्ट 6 कुटुंबाचेच प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे यावर्षी संपूर्ण भारतातुन येणारे समाजबांधव होळीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असून, यापुढे सदर मानकऱ्यां बाबतची कायदेशीर लढाई चालू ठेवणार असून लवकरच समाजाला न्याय मिळेल"

        - भाऊसाहेब चौगुले- पुणे जिल्हा अध्यक्ष,                 गोपाळ समाजहित महासंघ

Friday, February 28, 2020

शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये बिबट्या अडकला !


पारगाव प्रतिनिधी : ता.२७ फेब्रु २०२०

पारगाव ता.दौंड येथील भीमा नदीच्या शेजारी सुनील शेळके आपला मुलगा आनंद सोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना आपल्या शेतामध्ये गव्हाच्या पिकात काही अंतरावर बिबट्या नजरेस पडला.
 भयभीत झालेले शेळके यांनी त्वरित ही माहिती ग्रामस्थांना कळवली.ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्या असल्याची माहिती देण्यात आली. सर्व माहितीची खातरजमा करून वन विभागाकडून पुणे येथील रेस्कु टीमला बोलावण्यात आले.यानंतर पाच तासाच्या आत अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या रेस्कु टीमला जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
या मिशनमध्ये वन विभागाचे 35 कर्मचारी सहभागी होते. या मिशनचे नेतृत्व पुणे येथील उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी व दौंडचे वन परीक्षक महादेव हजारे यांनी केले होते.
सविस्तर हकीकत अशी,एका शिकाऱ्याने रान डुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीमध्ये बिबट्याचा पाय अडकला होता.वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या वतीने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले व त्यानंतर बिबट्या पकडण्यात आला.
 पुढील उपचारासाठी बिबट्याला पौड येथे नेण्यात आले आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापासून भीमा नदीच्या पट्ट्यात अनेक बिबटे पाहायला मिळत आहे.
 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामध्ये पाळीव प्राण्यांचा बिबट्या फडशा पाडत आहे.एक दिवस माणसावर बिबट्या हल्ला करेल तेव्हाच वनविभाग खडखडून जागा होईल का? असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्यावतीने वन विभागाला अजून काही पिंजरे लावण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

Monday, February 24, 2020

माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवार यांचे वर्चस्व !



बारामती प्रतिनिधी : ता.२५ फेब्रु २०२०

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगावमध्ये अजित पवारांची सत्ता येणार हे आता शिक्कामोर्तब झाले आहे.अजित पवारांनी ग्रामपंचायतीपासून सर्व साखर कारखान्यावर आपली सत्ता काबीज केली आहे मात्र माळेगाव साखर कारखान्यावर  अजित पवार यांना वर्चस्व राखणे शक्य होत नव्हते.

या निवडणुकीला मात्र माळेगावकरांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळंकठेश्वर पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर यश मिळवून माळेगाव साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत.

चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे संचालक म्हणून कारखान्यावर निवडून आले आहेत. राखीव ५ जागांवरील मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरुच होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.

चंद्रराव तावरे हे शरद पवार यांचे समर्थक होते.

मात्र, अजित पवार यांच्याकडे बारामतीची सुत्रे गेल्यानंतर अजित पवार आणि तावरे यांच्यामध्ये धुसपुस होती. २०१४ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर २०१५ मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव
केला होता. त्यामुळे आता राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर कारखान्यावरही वर्चस्व मिळविण्यासाठी अजित पवार यांनी आपली ताकद लावली होती. त्यांनी माळेगाव कारखान्याच्या परिसरात ४ सभाही घेतल्या होत्या. 

रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी अनेक आक्षेप घेतले गेल्याने प्रत्यक्ष मतमोजणी दुपारनंतर सुरु झाली. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या १८जागांपैकी १३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेघर पॅनेलने कारखान्यावरील सत्ता खेचून आणली आहे.

Saturday, February 22, 2020

दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार - आ.राहुल कुल


केडगाव प्रतिनिधी : ता.२२ फेब्रु २०२०

राज्यातील महा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती  आमदार राहुल कुल यांनी शनिवारी चौफुला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
 अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि फळबागांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे असे म्हणत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे  असा सवाल उपस्थित केला गेला.  
भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदत कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती, उपकरण, पशुपालन, शेळीपालन, मधमाशी पालन, अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.

दौंड | सचिन आव्हाड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार !




दौंड प्रतिनिधी : ता.२२ फेब्रु २०२०

दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे जनहित फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने तीन दिवसीय अटल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शिवजयंती च्या निमित्ताने सचिन जगन्नाथ आव्हाड यांना पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला 
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह  आणि आंब्याचे झाड देऊन देऊन आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले . तसेच परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रामस्थांचा आणि भारतीय सैन्य दलात सेवा केलेल्या जवानांचा सन्मान  करण्यात आला .

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , आनंद थोरात , महेश भागवत , कुसेगाव चे सरपंच रमेश भोसले , बाळासाहेब तोंडे पाटील , वसंत साळुंखे ,  माजी सरपंच मनोज फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते .

फोटो ओळ : सचिन आव्हाड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देताना आमदार राहूल कुल आणि उपस्थित मान्यवर

Friday, February 21, 2020

नानगांव | सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेऊन गेले पाहिजे - माणिक अढागळे

केडगाव प्रतिनिधी : ता.२२ फेबु २०२० 
महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती (तारखेनुसार) संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने ठीकठिकाणी मिरवणुका,बाईक रॅली व अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नानगाव ता.दौंड येथील अण्णा भाऊ साठे सभागृह गणेशरोड येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन कसे करायाचे जे कळाले होते ते आता कुणालाच कळत नाही हे खूप मोठे दुर्दाव्य आहे.आता तरी सर्वाना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी अशी खंत यावेळी भाजपा अनु.जमा.मोर्चा दौंड तालुका अध्यक्ष माणिक आढागळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
तरुण वर्गाला यावेळी विष्णू खराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते व त्यांचे कोणते गुण अंगिकारले पाहिजे या विषयी सविस्तर असे आपल्या व्याखानातून मार्गदर्शन केले.
यावेळी विठ्ठ्ल खराडे,सचिन शिंदे,राजकुमार मोटे,विष्णू खराडे,शंकर देवकर अनिल गुंड,संजय रासकर, संभाजी खळदकर,श्रीकांत ससाणे व हनुमान तरुण मंडळचे सर्व सदस्य व आदि उपस्थित होते.

शिरूर | रांजणगाव गणपती | वेश्याव्यवसयातून पाच परप्रांतीय महिलांची सुटका !


रांजणगाव गणपती (शिरूर) प्रतिनिधी : ता.२१ फेब्रु

रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी बारामती क्राईम ब्रांच च्या पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्याव्यवसाय करणा-या पाच परप्रांतिय महिलांची सुटका केली तर सात आरोपींना अटक केल्याची माहिती बारामती क्राईम ब्रांच चे प्रमुख पोलीस निरीक्षक चद्रशेखर यादव यांनी दिली.

याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव येथील हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी बारामती क्राईम ब्रांच च्या पथकास स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परप्रांतिय महिलांकडुन वेश्याव्यसाय करवुन घेतला जात असल्याची गोपनीय व खाञीशीर माहिती अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांना मिळाली होती.त्यानुसार,बारामती क्राईम ब्रांच चे प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस व क्राइम ब्रांच च्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मुक्ताई  येथे तीन परप्रांतीय महिला (पश्चिम बंगाल) व  हॉटेल गारवा  येथे दोन परप्रांतीय (पश्चिम बंगाल) महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेताना आढळुन आल्या.यातील पाचही महिलांना सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

तर या प्रकरणी  महेश उर्फ बापुण, (रा.रांजणगाव) 2) सुमित साहू, (रा.रांजणगाव) 3) संदीप बळवंत येंधे, (रा.जुन्नर) 4) राजू पित्तवास साहू, (रा.ओडिसा),5) संतोष लोकनाथ बेहरा,(रा. ओडिसा), 6) नारायण संजय दुधाटे, (रा.परभणी), 7) राकेश उर्फ लूफताद रहमान शेख असे एकूण ७ आरोपींविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन ला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,रांजणगावचे पोलीस निरीक्षक भारतकुमार राऊत,सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-रांजणगाव पोलीस  स्टेशनचे पोलिस जवान किशोर तेलंग, अजित भुजबळ, रघुनाथ हळनोर यांनी ही कारवाई केली.

Thursday, February 20, 2020

दौंड | वाळू उपसा हद्दिच्या वादातुन तरुणाचा खून ; तीन दिवसापासून मृतदेह नदीत !


तीन दिवसांनी नदी पात्रात युवकाचा मृतदेह सापडला !
एन.डी.आर.एफ ज्या जवानांची मोठी पराकाष्ठा !

राजेगाव :प्रतिनिधी 
मलठण ता.दौंड येथील भीमा नदी पात्रात वाळू तस्करांच्या हद्दीच्या वादातून मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात शाब्दिक बाचाबाची होऊन नदीपात्रातच  हाणामारी झाली यांध्ये शिरापूर येथील  युवक निखील संतोष होलम वय २६ हा दि १७ फेब्रूवारी च्या मध्यरात्री नदी पात्रात बुडाल्याचा संशय व्यक्त केला होता.परतुं दि २० फेब्रूवारी दुपारच्या सुमारास  एन.डी.आर.एफ ज्या जवानांनी मोठी पराकाष्ठा करून त्या युवकाचा मृत देह बाहेर काढण्यात यश आले आणि शवविच्छेदन करण्यासाठी दौंड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .
गेली तीन दिवसापसुन मावळ येथील आपत्ती व्यवस्थापन यंत्रांना व स्थनिक मासेमारी करणे नागरिक ,पोलीस व मह्सूल यंत्रणा यांच्या मदतीने दि १९ फेब्रूवारी रोजी युवकाचा शोध नदी पात्रात चालू होता परंतु त्यांना काही हाती ण लागल्याने दौंड चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दि २० फेब्रूवारी रोजी एन.डी.आर.एफ चे मदत कार्य बोलावले.आणि हे पथक सकाळी घटनास्थळी येउन  आपले शोध कार्य सुरु केले आणि त्यांना दुपारच्या वेळेस होलम याचा मृत देह सापडला.
नदी पात्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत तरीही प्रशासन यांची गंभीर दखल घेत नाही अशा घटना का घडत आहेत यांची सखोल माहिती घेऊन कार्यवाही केली तर पुढील काळात नदी पात्रात अशा घटना घडणार नाहीत.