Tuesday, April 7, 2020

नानगाव येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक !



पारगाव प्रतिनिधी : ता.०७ एप्रिल २०२०

नानगाव(गणेशरोड) ता.दौंड येथे गुरुवार (०२ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून हातवळण एजी लाईन तारांचे घर्षण होऊन २० एकर पैकी १३ एकर ऊस जळून खाक झाला आहे अशी माहिती शेतकरी ज्ञानदेव काळे यांनी दिली आहे.

धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली.आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
या दोन्ही शेतकऱ्यांचे लोखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या आधीही येथील अनेक शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक झाले आहे.अस्मानी संकटांबरोबरच महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते.अशाच प्रकारे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना होत आहेत.
पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक एन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जाळून खाक झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडे संचारबंदी लागू आहे.याचदरम्यान बाजारपेठा हतबल झाल्या आहेत.शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.पारगाव सबस्टेशन कनिष्ठ अभियंता पी.एन. पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.दुष्काळ सदृश परिस्थितीसमोर असताना या ओढवलेल्या संकटांमुळे सरकारकडून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांनकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.