दौंड प्रतिनिधी : ता.14 डिसें 2019
दौंड शहरातील उड्डाण पूल ते गोल राऊंड हा रहदारीचा मुख्य रस्ता नियमानुसार केला जात नाही.नियमानुसार हा रस्ता २४ मीटरचा हवा होता परंतु काही ठिकाणी १८ मीटर तर काही ठिकाणी १२ मीटर चा केला आहे.
वास्तविक पाहता हा रस्ता मोठा होणे गरजेचे आहे.मात्र काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता लहान केल्याची अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान व दौंड नगरपरिषदचे नगरसेवक राजेश गायकवाड यांनी दिली आहे.
हा रस्ता मोठा होण्यासाठी तोंडी व लेखी स्वरूपाची सूचना प्रशासनाला केली आहे.परंतु प्रशासन गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
येथील अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता मोठा झाला पाहिजे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
(ता.१३) रोजी तडका हॉटेल समोर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन स्थानिक नागरिकांना बरोबर प्रशासनाच्या विरोधात दौंडकर जागे व्हा रस्ता रुंदीकरणासाठी एकत्र या दौंडकराच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही,अतिक्रमण काढा दुर्घटना टाळा,'तेरी भी चूप,मेरी भी चूप',मायबाप सरकार जागे व्हा,आमदार खासदार जागे व्हा दौंडकरांच्या जीवाशी खेळू नका अशा स्वरूपाचे फलक हातात घेउन घोषणा बाजी यावेळी करण्यात आल्या होत्या.
यावेळी वासुदेव काळे,सचिन गायकवाड,राजेंद्र खट्टी,बबलू कांबळे,बादशहा शेख,ओसीम शेख,रुपेश होंकाडे,आबा होले, सचिन धोत्रे व आदी मान्यवर उपस्थित होते.