Sunday, December 29, 2019

केडगाव | गळ्यातील दागिने हिसकावून चोरटे फरार !

केडगाव प्रतिनिधी ता.२९ डिसें
     केडगाव ता.दौंड मधील धक्कादायक घटना शिक्षिकेच्या गळ्यातील अडीच  तोळ्याचे गंठन हिसकावुन चोरटे फरार झाले आहे.
केडगाव ता.दौंड येथील आशा अनिल बाप्ते  वय वर्षे 56 रा.सरदार नगर केडगाव स्टेशन या जवाहरलाल विद्यालय येथे शिक्षीका आहेत. (ता 29 डिसेंबर 2019) रोजी सकाळी 11•45 वा च्या सुमारास आशा बाप्ते या घरामध्ये असलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी गेल्या होत्या कचरा टाकुन घराकडे जात असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकल वर बसून त्यांच्या समोर आले.
त्यांच्यातील मोटार सायकल वर पाठिमागे बसलेला इसम मोटार सायकल वरून उतरून त्याच्या जवळ येऊन तुम्हांला पत्रिका द्यायची आहे.
आमच्यातील अणखी एक जन पलिकडील लाईनला पत्रिका वाटुन येत आहे.आम्हाला तुमच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्या सारखे दागिने करायचे आहे असे म्हणत त्याने अचानकपणे त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन जबरदस्तीने गळ्यातून हिसका मारत तोडले.
पळत जाऊन मोटार सायकल थांबलेल्या इसमाच्या पाठिमागे बसून दोघेही मोटार सायकल वरून पळून गेले.
मोटरसायकल वर पुढे बसलेल्या चोरट्यांचे वर्णनं वय अंदाजे 34 ते 38 वर्षं असुन अंगाने जाड जुड,रंगाने काळा अंगात काळे रंगची जरकींन पँट असा त्याच्या पेहराव आहे.
 गंठन हिसकावुन नेलेल्या इसमाचे वय अंदाजे 30 ते 32 असुन तो रंगाने गोरापान अंगात टी शर्ट निळ्या रंगाची जीन्स पँट असा पेहराव या घटनेचा अधीक तपास पोलिस सहायक निरीक्षक धनंजय कापरे,पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.