Saturday, December 28, 2019

नानगांव ग्रामपंचायतचा "आमचा गाव आमचा विकास" आराखडा रेडी !



दौंड प्रतिनिधी : ता.२९ डिसें

आमचा गाव आमचा विकास २०२०-२१ ते २४-२५ या पंचवार्षिक कार्यकाळात राबविण्यात येणाऱ्या विकास आराखडयासाठी ग्रामसभेचे ता.२८ रोजी आयोजन करण्यात आले होते.
मानव विकास निर्देशांक, शिक्षण, आरोग्य,उपजीविका, महिला बालकल्याण, मागासवर्गीय व इतर कामाबाबत विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच मंजुरी साठी प्रस्ताव पुढे पाठवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पोपट शेलार यांनी दिली आहे.
नानगाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ५६२९ लोकसंख्या आहे.
जिल्हा परिषद यांच्या माहितीप्रमाणे लोकसंख्येच्या आकडेवारी नुसार विकास कामांची मांडणी करण्यात येत असते.
दौंड तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक आराखडा बाबत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु अनेक ठिकाणी वादात ग्रामसभेचा समारोप झालेला दिसून आला आहे.तसेच नानगांव ग्रामपंचायत येथे ग्रामसभा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी केडगाव पोलीस औट पोस्टचे पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे हे यावेळी उपस्थित होते.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व ग्रामसभा शांततेत पार पडली.
ग्रामसभेसाठी यावेळी सरपंच पुष्पा गुंड,उपसरपंच सुनीता रासकर,सी.बी.खळदकर,विश्वास भोसले,पोपट लव्हे,विकास रासकर,अशोक खळदकर, विष्णू खराडे,विशाल शेलार,संजय शेलार व सर्व महिला सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.