केडगाव प्रतिनिधी ता.३० डिसें
नाथनगर विद्यालय बोरिपार्धी ता.दौंड येथे सन 1997 च्या वेळी दहावीत असणारे विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनी भेटले.
अनेक दिवसापासून सर्वजण एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होते.परंतु दहावी झाल्यानंतर प्रत्येक जणाचे मार्ग वेगळे झाले होते.प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे असल्याने सर्वांना संपर्क साधने अवघड झाले होते.परंतु यासाठी दिलीप साळुंखे यांनी सर्वांचे फोन नंबर मिळवून एक ग्रुप तयार केला.त्या माध्यमातून सर्वजण चौफुला येथे बोरमलनाथ येथे जमले होते.परंतू बावीस वर्षानी प्रथम भेटणार असल्याने बावीस वर्षात सर्व जणामध्ये बदल झाला होता.
काहीना हा अपल्या वर्गात होता असे वाटत नव्हते.इतका बदल पहावयास मिळाला ज्या वेळी सर्व जण आले.त्यावेळी इयत्ता दहावी नंतर कुणी काय केले. याबद्दल गप्पा झाल्या जुन्या आठवणीना पुन्हा उजाळा मिळाला.सर्वजण पुन्हा शाळेत घडलेल्या घटनेत रममाण झाले की ते आता विद्यार्थी नाहीत याचे देखिल भान विसरले.सर्वजण इतके गप्पात रममाण झाले की दिवस कसा निघुन गेला हे कळले नाही.
यापुढे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुख दुखात सहभगी होण्यासाठी हा ग्रुप बनवला आहे. तब्बल बावीस वर्षानी भोजनाचा आंनद घेतला या पुढे ग्रुपच्या माध्यमातून समाज उपयोगी कामे करण्याचा निर्णय ग्रुपने घेतला आहे.