Thursday, June 28, 2018
Tuesday, June 26, 2018
Monday, June 25, 2018
Sunday, June 24, 2018
Saturday, June 23, 2018
आनंद भोसले या शिक्षकाचे नानगाव येथील जि.प.प्रा.शाळेत कौतकास्पद कार्य !
पी.बी.गांधले(मुख्याध्यापक)
व ए.एच.भोसले(उपशिक्षक) यांचा निरोप समारंभ
आनंद भोसले या
शिक्षकाचे नानगाव येथील जि.प.प्रा.शाळेत कौतकास्पद कार्य !
पाटेठाण येथील शाळेत
बदली; भोसले शिक्षक मुलांच्या व पालकांच्या कायम मनात राहतील
दौंड प्रतिनिधी:जि.प.प्रा.शाळा
नानगाव येथील पी.बी.गांधले(मुख्याध्यापक) व ए.एच.भोसले(उपशिक्षक) यांची २७/०२ च्या
जीआर नुसार बदली झाली असून,या दोन्हीही शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे
आयोजन (२३जून) रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी केले होते.यावेळी पालकांनी आपल्या
मनोगतात शिक्षकांनी आपल्या मुलांना लावलेल्या शिस्तीविषयी व गुणवत्ता वाढीसाठी केले
प्रयत्न हे खर्च खूप कौतुकासप्द असल्याचे सांगण्यात आले.या वर्षीपासून शाळेच्या
नूतन इमारतीमध्ये मुलांचा प्रवेश झाला आहे.या नूतन इमारतीसाठी आनंद भोसले व
गावकर्यांनी केले प्रयत्न अखेर यशाला आले आहे.सुट्टीच्या काळात सुद्धा शिक्षक आनंद
भोसले यांनी स्वतः हजेरी लाऊन शाळेला रंगरोटी व इतर काम काम करून घेण्यास मोठा
मोलाचा हातभार लावला आहे.सांस्कृतिक,कला,क्रीडा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यास कायम तत्पर असलेले भोसले शिक्षक मुलांच्या व पालकांच्या कायम मनात
राहतील.दौंड तालुक्यातील पाटेठाण या शाळेत यांची बदली झाली असून ग्रामस्थांनी
त्यांना पुढील कार्यास यावेळी भरभरून शुभेच्छा दिल्या.
Friday, June 22, 2018
Tuesday, June 19, 2018
Monday, June 18, 2018
Sunday, June 17, 2018
Saturday, June 16, 2018
शिरूर || मांडवगण फराटा येथील 99 वर्षांचे तरुण;विनायक अण्णा फराटे !
मांडवगण फराटा येथील 99 वर्षांचे तरुण ; विनायक अण्णा फराटे
Friday, June 15, 2018
दौंड|आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळं आणि बि...
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या वतीने फळं आणि बिस्किटांचं वाटप
Thursday, June 14, 2018
छत्रपति फिल्मस् सागर शेलार प्रस्तुत हत्याकांड चा ट्रेलर सध्या बहुचर्चित ठरतोय !!!
छत्रपति फिल्मस् सागर शेलार प्रस्तुत हत्याकांड चा ट्रेलर सध्या बहुचर्चित ठरतोय !!!
Wednesday, June 13, 2018
मजुरांच्या मुलांची यशाला गवसणी ; दहावीत यश गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक
"मजुरांच्या मुलांची यशाला गवसणी ; दहावीत यश गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक"
डी न्यूज लाईव्ह कुरकुंभ प्रतिनिधी(अलीम सय्यद) : श्री फिरंगाईमाता विद्यालयातील अतिशय गरीब कुटुंबातील व घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या कु.गौरी सदाशिव जाधव व अंकित नारायण कांबळे या दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवीत विद्यालयाचे नावलौकिक केले आहे.यश मिळविण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची गरज नाही तर जिद्द चिकाटी आत्मविश्वासाची गरज आहे. हे या दोन विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. अंकित कांबळे याची घरची परिस्थिती बेताची असल्याने तो शाळेतून घरी गेल्यावर रात्री वडिलांच्या मदतीसाठी पावभाजी ची गाडी चालवीत असे अशा हलाखीच्या परिस्थिती मध्ये दहावीत ८६.८० टक्के मिळवीत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु. गौरी सदाशिव जाधव हिने ९०.६० टक्के मिळवीत गणित विषयात१०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.या दोन विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.कोणतीच खासगी शिकवणी नसताना ना कोणतीच सुविधा नसताना देखील प्रतिकूल परिस्थिती वर मात करत यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. एकिकडे सर्व सोयी सुविधा घेऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या पालकांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. परिस्थितीशी सामना करीत उत्तम गुणवत्ता समाजापुढे ठेवणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून ही कौतुक होत आहे.
या दोघांना विद्यालयातील गणित विषय शिक्षक बाबासो सांगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गणित विषयाबद्दल असणारी आवड,सराव तसेच गणित शिक्षक सांगळे यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन हेच आमच्या यशाचे रहस्य आहे असे या दोन विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.
"यशाकरिता कुठल्याही सोयी सुविधांची गरज नसते फक्त आवड व काहीतरी करून दाखविण्याची जिद्द लागते."
.........प्राचार्य,नानासाहेब भापकर (श्री फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ )
दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुण कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या रोजगारापासून वंचित !
"दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुण कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या रोजगारापासून वंचित !"
डी न्यूज लाईव्ह कुरकुंभ प्रतिनिधी (अलीम सय्यद): दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या करिता येथील स्वतः पुढाकार घेऊन स्थानिक रोजगार उपलब्ध देण्याकरिता येथील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या आस्थापनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर प्रथम प्राधान्य हा स्थानिक बेरोजगारांना मिळणे आवश्यक आहे पण कुरकुंभ एम आय डीसी येथील परप्रांतीयांना पहिले प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जाते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही प्रदुषणासाठी बहुवार्चित आहे , गेली तीस वर्षांपासून औद्योगिक वसाहतिचे प्रदुषण ग्रामस्थ सहन करीत आहेत ,अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला प्रदूषण जास्त असताना ही पर्यायी व्यवस्था नसल्याने बहुतांश स्थानिक शेतकरी त्रास सहन करीत याच ठिकाणी राहत आहेत. कित्येकांची जमीन वसाहतितील कंपन्यांना गेल्या आहे अशा स्थितितही स्थानिकाना प्राधान्य दिले जात नसल्याने वसाहतविषयी उच्चशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. असताना देखील येथील स्थानिक तरुणांना नोकरीचा खालचा दर्जाची वागणूक येथिल कंपन्यांकडून दिली जात असल्याचा दावा येथील बेरोजगार करीत आहे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्थानिक तरुणांना रोजगारीकरिता प्राधान्य देत नसल्याने परिसरात बेरोजगार तरुनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न गंभीर बनत चालला आहे कुरकुंभ आणि पांढरेवाडी , परिसरातील युवक सुशिक्षित आणि उच्चशिक्षित आहेंत आशावेळी पात्रता असूनही नोकरीसाठी केलेला अर्जाची साधी दखलही कंपन्यांकडून घेतली जात नाही.संबधित युवक कंपनीच्या गेटवर विचारना करण्यासाठी गेल्यास किंवा संबंधित अधिकार्यांना भेटल्यावर त्यांनी हिन् दर्जाचा वागणूक देत उडवाउडवीची उत्तरे देउन परत पाठवून दिले जाते. गावामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे शिक्षण घेउन देखिल रोजगार मिळत नसल्याने तरुण वाममार्गाचा अवलंब करीत आहेत, याच प्रश्नावर विचार करून येथील स्थानिक तरुण युवक स्वतः सहभाग घेत एम आय डी सी मधील प्रत्येक कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्होवा या करिता प्रत्येक कंपनीत जाऊन स्थानिकांना रोजगार मिळवा असा पत्र , अर्ज, प्रत्येक कंपनी ला देण्यात आला आहे. सर्व तरुण एकत्र येऊन या लढ्याला यश मिळेल अशी अपेक्षा येथील तरुण करीत आहे.
"गेली तीस वर्षांपासून आम्हाला या कंपन्यांनी हीन दरजेची वागणूक दिली पण आता आम्हाला न्याय हवा यामुळे आम्ही सर्व तरुण या प्रत्येक कंपनीना अर्ज देत आहोत."
................ बेरोजगार तरुण
"पुढील काळाचा विचार करून स्थानिक तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार काम व अन्य व्यवसाय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. "
........... छाया नानासो झगडे (सरपंच(नवनिर्वाचित),ग्रा.पं.पांढरेवाडी)
...........रशीद मुलाणी (सरपंच(प्रभारी),ग्रा.पं.कुरकुंभ)
...........राहुल भोसले (सरपंच(नवनिर्वाचित),कुरकुंभ)
मा.शरदचंद्रजी सूर्यवंशी नेते,शिवसेना,दौंड यांच्या कडून डी न्यूज लाईव्ह च...
मा.शरदचंद्रजी सूर्यवंशी नेते,शिवसेना,दौंड यांच्या कडून डी न्यूज लाईव्ह चॅॅनेल ला हार्दिक शुभेच्छा
Monday, June 11, 2018
"एक मित्र एक वृक्ष' ग्रुप ने जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान जागृती अभियान,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन
"एक मित्र एक वृक्ष' ग्रुप ने जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान जागृती अभियान,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन
यावेळी विठ्ठलवाडीतील ९७ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.तसेच मृत्यूनंतर नेत्रदान केलेल्या नेत्रदात्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.एक मित्र एक वृक्ष या ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी गेली ३ वर्षे केलेल्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. श्रीवल्लभ अवचट यांनी आयुर्वेदिक व देशी वृक्षांचे महत्व सांगितले.मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलवाडी शाळेत अडूळसा, पारिजातक, सिसम, वड, पिंपळ, कडूलिंब, बहावा, बकूळ, ताम्हण, उंबर, पांगारा, पळस, आपटा अशा विविध दुर्मिळ व देशी वृक्षांचे रोपन करण्यात आले. "झाडे लावू-झाडे जगवू" हा संदेश देण्यात आला.यावेळी सुभाष फासगे यांनी नेत्रदान जागृतीवर रांगोळी रेखाटली होती.तसेच दौंडचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी नेत्रदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
दौंड तालुक्यात १२ वीच्या विज्ञात शाखेत प्रथम आलेली निकिता जालिंदर कांबळे व १० वीमधून प्रथम आलेली नेहा जालिंदर कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर देऊळगावगाडा माध्यमिक विद्यालयामध्ये १० वीमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेले प्रतिक्षा दादा बारवकर, पवन पोपट बारवकर,प्रतीक नानासो बारवकर,किरणकुमार होले,ॠषिकेश बारवकर या गुणवंत विद्यार्थ्यांचेही वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.
Friday, June 8, 2018
आदित्य
ने मांडवगण फराटा गावाचे नाव देश पातळीवर झळकावले
मांडवगण
फराटा,शिरूर
मांडवगण
फराटा येथील लहाणग्या आदित्य जगताप ने सात मिनींटात सोडविली 150 गणिते!
आदित्य
ने मांडवगण फराटा गावाचे नाव देश पातळीवर झळकावले.
आदित्य
याच वय अवघे 9 वर्षे आहे.
कोणत्याही
प्रकारच गणित विचारा आदित्य क्षणात उत्तर देणार.
आदित्यने
त्याच्या बुद्धी कौशल्याने आत्तापर्यंत देश आणि राज्यपातळीवर बुद्धिबळ स्पर्धेत 3 ट्रॉफी, आणि 2 मेडल मिळवलेले आहे.
अब्याकस
मध्ये मुंबई येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 5 मिनिटात
100 गणिते सोडवून भारत देशात दुसरा येण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्रात
पहिला येण्याचा मान मिळवला आणी देश पातळीवर आदित्यची निवड झाली.
गावचे पोलिस
पाटील गंगाधर भाउसाहेब फराटे, हे आदित्यचे आजोबा आहेत.
Monday, June 4, 2018
पुणे जिल्ह्यात गोपाळ समाजहित महासंघाचा दुसरा वर्धापन दिन साजरा
पुणे जिल्ह्यात गोपाळ समाजहित महासंघाचा दुसरा वर्धापन दिन साजरा
शिरूर प्रतिनिधी : ता.०४ जुलै २०१८ गोपाळ समाजहित महासंघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्यातील शिरूर तालुक्यामध्ये मांडवगण फराटा येथे आयोजित GSM आढावा बैठक पार पडली.गोपाळ समाजहित महासंघाच्या पुढील ध्येय-धोरणांविषयी आणि GSM च्या दोन वर्षाच्या कार्य काळातील कार्यावर एक प्रकाश झोत टाकत समाज बांधवांना संघटनेची गरज का आहे?का आपण एकत्र आलं पाहिजे? शिक्षणाचे महत्त्व तसेच आपल्या समाज बांधवांवर होणारे अन्याय अत्याचाराला कशा प्रकारे संघटनेच्या मार्फत सामोरे जावं अशा प्रकारची माहिती देऊन एका आनंदमय वातावरणामद्धे GSM चा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.
Friday, June 1, 2018
पुण्यामध्ये जोरदार पाऊस;पावसाने पुणेकर सुखवले
पुण्यामध्ये जोरदार पाऊस
पुणे प्रतिनिधी : पुणे व पिंपरी चिंचवड येथे शुक्रवार ता.०१ जून रोजी गारांचा पाऊस झाला असुन,या पावसाने पुणेकर सुखावले आहेत. पुण्यात आज मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती.घामाच्या धारा निघत होत्या.अंगांची काहिली होत असताना,आज झालेल्या पावसाने पुणेकर सुखवले आहेत.या पावसाने हवेत गारवा जाणवत होता.
Subscribe to:
Posts (Atom)