डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : स्त्री स्वाभिमान हा प्रोजेक्ट भारत सरकारने महिलांसाठी घेतलेला उपक्रम आहे. जो ग्रामीण भागातील महिलासाठी स्वच्छ व निरोगी पॅड स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी CSC मार्फत राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान hygine पॅड जास्त प्रमाणात वापरले जावे.अजूनही 82% ग्रामीण भागातील महिला कापडाचा वापर करतात.ज्या चुकीच्या पद्धतीमुळे Cervical कॅन्सर सारख्या आजारांना बळी पडावे लागते.परदेशी ब्रँडेड Saniatory नॆपिक्सन जरी बाजारात उपलब्ध असले तरी ते सर्वसामान्य महिलेला घातक ठरू शकतात. कारण त्यामध्ये Chemical चा वापर व Cotton चा वापर ज्यास्त असतो. हे Cotton कंपनी स्टोरेज करण्यासाठी कीटक नाशकांचा वापर करते आणि आशा Cotton चा वापर करून हे पॅड बनविले जाते.ज्यामुळे इन्फेक्शन व Cervical Cancer चे होण्याचा संभव वाढतो. या सर्व गोष्टी लक्षात आल्यामुळे भारत सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक साधनाचा वापर करून हे पॅड बनविण्यात येते.जसे की, झाडाच्या बुंध्या पासून हे मटेरिअल बनविले जाते.ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल मटेरियल वापरत नाहीत.आणि हे पॅड पूर्णपणे हॅन्ड मेड असून ते 99.9% निर्जंतुक करून पॅकिंग केले जाते शिवाय याची किंमत ब्रॅण्डेड कंपनी पेक्षा निम्या किमतीत उपलब्ध आहे.भारत सरकारने सिद्धिविनायक कॉम्पुटर चे संचालक सागर धुमाळ व सौ मिनाक्षी धुमाळ यांचा दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भारतात अशा प्रकारचे Saniatory नॅपकिन बनविणारे फक्त 15 युनिट कार्यान्वित आहेत ज्या मध्ये केडगावच्या युनिटचा 3 क्रमांक लागतो.ही बाब पुणे जिल्हा व दौंड तालुक्यासाठी अभिमानस्पद आहे.