डी
न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: गावातील काही मंडळी याच याञा उत्सवांत गटातटाचे भांडण उकरून
काढतात.यातून याञा उत्सवाला गालबोट लागते.पोलीस प्रशासनाने अशा घटना घडू नयेत यासाठी आखीव–रेखीव प्रयत्न करण्याची
गरज आहे.सध्या राज्यभर गावागावांतील याञा,जञा,उरुस,सुरु आहेत.ग्रामदैवतेचा उत्सव साजरा
करण्यासाठी सर्व गावातील मंडळी एकञ येत असल्याचे चिञ सर्वत्र पाहायला मिळते.माञ गावातील काही राजकीय मंडळी आपल्या
स्वार्थापायी याच याञा उत्सवांत
गटातटाचे भांडण उकरून काढतात.यातून याञा उत्सवाला गालबोट लागते.शिवाय भांडण तंट्यामुळे
अनेकांना कोर्टाच्या पायर्या चढाव्या लागतात.तर काहीची गावात बदनामी
होते.भांडण पेटविणारे माञ गुन्हा दाखल झालेल्या तरुणांसाठी जामिन होण्यासाठी पळापळ
करतात.ही बाब आता तरुणांनी लक्षात घेऊन तरुणांनी आपले वर्तन सुधारण्याचा प्रयत्न
केला पाहीजे.गावातील काही जेष्ठांनी व पालकांनी अशा घडूच नयेत म्हणून या याञा
काळात आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.वर्षातून एकदा प्रत्येक
गावगाड्यात ग्रामदैवतेचा याञा उत्सव मोठ्या दिमाखात पार पाडण्याचा प्रयत्न
गावातीलच याञा कमिटी करत असते.परंतु काही मंडळी एकमेकांची
जिरवण्याच्या नादात विरोधासाठी विरोध करण्यासाठी काही तरुणांना याञा उत्सवात
धुडगुस घालण्यास प्रोत्साहन देत असतात.ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्यात छबिण्याच्या
कार्यक्रमात एकमेकांकडे खुन्नशीने पाहणे,तमाशा,आर्केस्टा किंवा इतर करमणुकीच्या कार्यक्रमात
धांगड-धिंगा करून कार्यक्रम बंद पाडणे,कुस्त्याच्या आख्याड्यात विनाकारणच
खोडा घालण्याचा प्रयत्न करणे,मागील जुने भांडण उकरून काढून शिवीगाळ करण्याच्या घटना अनेक गावांत प्रत्येक वर्षी घडतात.यातुन
मोठे भांडण घडले तर हाणामारीच्या घटनेतुन अनेक जणांवर गुन्हे दाखल होतात.यामध्ये सामान्य
कुटुंबातील युवकांचा,तरुणांचा
समावेश असल्याने पुढारपण करणारी मंडळी किंवा पडद्यामागुन भांडण पेटविणारे माञ या
प्रकरणात कुठेही आढळुन येत नाही.त्यामुळे तरुणांनी याञा उत्सव किंवा सार्वजनिक
कार्यक्रमात कायदा व सुवस्थेचे भान राखणे गरजेचे आहे.अशा घटनामुळे तरुणांच्या
पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.काही गावामध्ये वैयक्तिक बांधावरून
चाललेले वाद याञा काळात काढले जातात.
भांडणाची कारणे
याञा उत्सवात गावातील सत्ताधारी पक्ष
बहुतेकदा सहभागी असतो.ही बाब दुसऱ्या गटातटाच्या राजकारणात दुसऱ्या गटाला पटत
नाही.त्यामुळे याञा उत्सवात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो.करमणुकीच्या
कार्यक्रमात तर काही युवकांना गोंधळ घालण्यासाठी मुद्दामच भडकावले जाते.यातुन काही
तरुणांवर गुन्हे दाखल होताता.कुस्तीच्या आखाड्यात किंवा तमाशाच्या कार्यक्रमात
दारू पिऊन मुद्दाम घुसणे,पंचापेक्षा
बाहेरच्या लोकांनीच कुस्तीच्या निकालासाठी आग्रह धरणे.याञा उत्सवाच्या हिशोबात मुद्दाम
गोंधळ घालणे,याञा
उत्सवात मुद्दाम बेफाम दुचाकी चालवणे,मुलीच्या छेडछाडीच्याही घटना घडतात.तर
कधीकधी याञा कमिटीने जमाखर्चाचा हिशोब न देणे यावरुन उत्सवात गोंधळ घातला
जातो.त्यामुळे याञा उत्सव साजरा होण्याऐवजी भांडण तंट्यावरच अधिक चर्चा होते.काही
गावामध्ये तर याञेच्या काळात दोन गटात भांडण व्हावे.म्हणून तिसरा गट एकमेकांची मानहाणी
करणारी पञके अज्ञात व्यक्तीकडून फेकतो.ही बाब अत्यंत गंभीर असुन यातुन गावात
अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.अशा लोकांमुळे गावातील उत्सवाला
देणगीदारही देणगी देण्यास टाळाटाळ करतात.अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला.तर त्यांना आयुष्यभर त्याची झळ सोसावी
लागते.
कायदा सुवस्थेसाठी विशेष प्रयत्न
याञा उत्सव शांततेत पार पाडणे ही
सर्वात महत्त्वाची भुमिका पोलिस प्रशासनाची असते.परिणामी पोलिस प्रशासनावर काही
वेळेस हल्ले होत असल्यामुळे पोलिस बंदोबस्त द्यावा तरी किती प्रश्न प्रशासनाला
पडतो.याञा भरविताना वादविवाद टाळण्यासाठी मंनोरंजन कार्यक्रमाऐवजी धार्मिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.कोर्टाच्या आदेशाला
केराची टोपली दाखवून संपूर्ण राञभर तमाशाचे आयोजन केल्यामुळे पोलिस प्रशासन राञी
१० नंतरच्या कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नसल्याने झालेल्या
भांडणाला याञा कमिटीच जबाबदार आहे असे चिञ सर्वत्र पाहायला मिळते आहे.भविष्यात
तमाशा मंडळे फक्त
गावात होणाऱ्या भांडणामुळे बंद पडतात कि काय अशी शंका उपस्थित होत आहे.