
गणेश टेमगीरे खुनाचे गुन्ह्यातील यवत पोलिसांनी ७२ तासात तिनही आरोपींना केले जेरबंद
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी
यवत पोलिसांनी
पुन्हा एकदा दबंग कामगिरी करून
दाखवली आहे.गेले एका वर्षातील बहुतेक गुन्हे उघड तर सर्वच आरोपी
गजाआड करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. ७२
तासाच्या आत गणेश टेमगीरे याचे खुनाचे गुन्ह्यातील तिनही आरोपींना यवत पोलिसांनी
जेरबंद केले आहे.
सदर खुनाचा गुन्ह्याचा तपास करताना आरोपी दत्तात्रय ठोंबरे(रा.कासुर्डी, फाटा, ता.दौंड, जि.पुणे),आकाश धनवे(सध्या-रा.खामगांव फाटा,ता.दौंड,जि.पुणे/मूळ रा.गोमळ वाडा,ता.कासार शिरोळ,जि.बिड),विक्रम
आनंदा सुळस्कर(रा.भोंडवे वस्ती,कासुर्डी,ता.दौंड,जि.पुणे) हे तीन
आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते परंतु आरोपी त्या ठिकाणाहून पळ काढून फरार झाले
होते.यवत पोलीसांनी आरोपींच्या मागावर राहून गोपनीय माहीती काढून आरोपी पुणे-हडपसर
परीसरात लपल्याबाबतची माहीती मिळाल्याने रविवार(२९ एप्रिल) रोजी हडपसर गाडीतळ
भागात सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस नाईक दिपक पालखे,संदीप कदम,गणेश पोटे,रणजित निकम,दशरथ बनसोडे, पोलीस कॉनस्टेबल खबाले
या तपास पथकाद्वारे सापळा लावून तिघानांही हडपसर गाडीतळ परीसरातून ताब्यात घेण्यात
आले आहे.ताब्यात घेतलेले संशयीत तिनही आरोपी पुढीलप्रमाणे (१) दत्तात्रय बाबा
ठोंबरे,वय १९वर्षे रा.कासुर्डी,फाटा, ता.दौंड, जि.पुणे) (२)आकाश तुळशिराम धनवे, वय २१वर्षे (रा.खामगांव फाटा, ता.दौंड, जि.पुणे. मूळ
रा.गोमळ वाडा, ता.कासार शिरोळ,
जि.बिड)(३)विक्रम उर्फ बाबू
आनंदा सुळस्कर,वय २७, रा.भोंडवे वस्ती,
कासुर्डी, ता.दौंड, जि.पुणे/मूळ
रा.देवकर मावड़ी, ता.पुरंदर, जि. पुणे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरच्या
गुन्ह्यातील मयत गणेश टेमगीरे हा दत्त्ता ठोंबरे याच्या बहीणीवर वाईट नजर ठेवुन होता व त्या
कारणास्तव मयताने त्यास यापूर्वी मारहाण केली होती तसेच घटनेच्या दिवशीही मयत
दत्ता डोंगराच्या बहिणीबद्धल वाईट बोलू लागल्याचा राग आल्यानेच त्यास लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगड
डोक्यात टाकुन ठार मारल्याची कबुली दिली आहे.
तिनही आरोपींना गुन्ह्यात अटक केले
आहे.अटक आरोपी न्यायालयात समक्ष हजर करून आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक
तपास करणार असल्याचे यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे
यांनी सांगितले.