एक मित्र एक वृक्ष चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुथा व ग्रुप मेम्बर्स अंकुश धायगुडे यांच्या लग्नकार्यात त्यांच्याकडून वृक्षारोपणासाठी रोख स्वरुपात मदत स्वीकारताना.
D NEWS LIVE
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी चौफुला (नवीनगाव) येथील शिक्षक अंकुश धायगुडे व त्यांच्या परिवाराने सत्कार व फटाक्यांना लागणारा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपणासाठी एक मित्र एक वृक्ष या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला ५० वृक्ष दान करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण तयार करून दिला आहे.अनेक गोष्टी शिकवताना मुलांना आपण फक्त सांगत असतो.त्याचे अनुकरण केले तर त्याचे रुपांतर हे प्रत्यक्षात यायला वेळ लागत नाही.वृक्ष तोडीमुळे या बकाल झालेल्या रन-रणत्या उन्हात सावलीची उब हरवत चालली आहे.लग्न कार्यासाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करण्यासाठी एक मित्र एक वृक्ष या संस्थेला मी मदत केली आहे.आपणही अशाच प्रकारे सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजचे देणे लागतो या उद्देशाने समाजहिताचे कार्य करणे खूप महत्वाचे आहे असे यावेळी अंकुश धायगुडे यांनी सांगितले.
एक मित्र एक वृक्षचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी यावेळी संस्थेच्या वतीने धायगुडे यांचे आभार मानले व त्यांनी आव्हान केले आहे कि,वृक्ष दाता हा आपल्या पासूनच तयार झाला पाहिजे म्हणून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या वृक्षरोपण कार्यासाठी पुढे यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.