जागतिक पुस्तक दिनानिमित्त आर.एम.धारीवाल विद्यानिकेतन प्रशाला व ज्युनियर कॉलेज कोंढापुरी या ठिकाणी मराठी अभ्यासक संतोष परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : जागतिक पुस्तक दिनानिमित्त आर.एम.धारीवाल विद्यानिकेतन प्रशाला व ज्युनियर कॉलेज कोंढापुरी या ठिकाणी मराठी अभ्यासक संतोष परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना परदेशी म्हणाले की, "ग्रंथ हेच गुरु" या उक्तीप्रमाणे ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.माहिती संप्रेषण तंत्रज्ञान युगात वावरत असताना साहित्यिकांनी निर्माण केलेले वेगवेगळे लिखानरुपी पुस्तके आपणासाठी ठेवा आहे.या पुस्तकातून मिळालेले ज्ञान आपणास समृद्ध बनवते.मिळालेल्या अवांतर वाचनातून माणसाची विचारशक्ती,कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन आपण शालेय जीवनापासून केले पाहिजे व ही पुस्तके रद्दीमध्ये न विकता त्याचे जतन करणे गरजेचे आहे.यावेळी वेगवेगळ्या साहित्यिकांच्या पुस्तकांची माहिती त्यांनी दिली.तसेच पुस्तकांचे पूजनही करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम. दौंडकर होते.तसेच बालाजी खराटे,रूपाली नलावडे,हरीभाऊ अढागळे, शकिला शेख,संजयकुमार,आनंदा गोंडे, बापु खारतोडे,मनोज कोल्ले,सोनाली माने,कार्तिक कुमार सपकाळ, चंद्रकांत भोजणे,रहात अफरोज,राजेंद्र धुमाळ,मीना कुलकर्णी,दत्तात्रय भोसले,अर्जुन भूमकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू खारतोडे यांनी केले तर आभार मनोज कोल्हे यांनी मानले.