डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.१४ एप्रिल २०१८
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे श्री वाघेश्वर चषक २०१८ या चषकाचे व्ही.सी.सी व श्री छत्रपती संभाजी महाराज युवा फेडरेशन चे अध्यक्ष नंदकुमार पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूनां एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
आज १४ एप्रिल रोजी महामानव,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शृंखलेचे उदघाटन मांडवगण फराटा गावचे सरपंच शिवाजी अण्णा कदम, उपसरपंच सुभाषराव फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष हणूअण्णा फराटे, राहुल दादा तावरे, दत्ता नाना कदम,कार्याध्यक्ष गोवर्धन चव्हाण ,उपाध्यक्ष योगेश भैय्या फराटे,सचिव राजू भाऊ कांबळे, संदीप गिरे, लक्ष्मण राठोड,पंड़ीत फराटे, सुधीर मचाले,सागर नाना फराटे,वैभव दादा फराटे,राम जगताप,अमोल जगताप,कदम नाना,बंड़ु तात्या शेलार व आदी मान्यवर उपस्थित होते. या शृंखलेमध्ये जे खेळाडू चांगला खेळ दाखवून कौशल्य दाखवतील त्या १५ खेळाडूंना पुणे या ठिकाणी क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी त्यांना पाठविले जाणार आहे.असे यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराज युवा फेडरेशन चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले.