Sunday, April 29, 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड


राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड
डी न्यूज़ लाइव्ह प्रतिनिधि | राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आलीय. मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झालं होतं.
पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. याशिवाय नवाब मलिक यांची उपाध्यक्षपदी तर हेमंत टकले यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामागिरी करण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर असेल. 

गणेश टेमगीरे खुनाचे गुन्ह्यातील यवत पोलिसांनी ७२ तासात तिनही आरोपींना केले जेरबंद






गणेश टेमगीरे खुनाचे गुन्ह्यातील यवत पोलिसांनी ७२ तासात तिनही आरोपींना केले जेरबंद 
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी
यवत पोलिसांनी पुन्हा एकदा दबंग कामगिरी करून दाखवली आहे.गेले एका वर्षातील बहुतेक गुन्हे उघड तर सर्वच आरोपी गजाआड करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. ७२ तासाच्या आत गणेश टेमगीरे याचे खुनाचे गुन्ह्यातील तिनही आरोपींना यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 दौंड तालुक्यातील कासुर्डी टोलनाक्याच्या नजीक बिभीषण जगदाळे यांच्या कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (२६ एप्रिल) रोजी १०.३० वाजन्याच्या सुमारास भरतगाव येथील गणेश झुंबर टेमगिरे या तरुणाची कोणी अज्ञात इसमांनी डोक्यात दगड,लाकडी दांडके,लोखंडी रॉड घालून हत्या केली होती.त्याबाबत यवत पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खुनाचा गुन्ह्याचा तपास करताना आरोपी दत्तात्रय ठोंबरे(रा.कासुर्डी, फाटा, ता.दौंड, जि.पुणे),आकाश धनवे(सध्या-रा.खामगांव फाटा,ता.दौंड,जि.पुणे/मूळ रा.गोमळ वाडा,ता.कासार शिरोळ,जि.बिड),विक्रम आनंदा सुळस्कर(रा.भोंडवे वस्ती,कासुर्डी,ता.दौंड,जि.पुणे) हे तीन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते परंतु आरोपी त्या ठिकाणाहून पळ काढून फरार झाले होते.यवत पोलीसांनी आरोपींच्या मागावर राहून गोपनीय माहीती काढून आरोपी पुणे-हडपसर परीसरात लपल्याबाबतची माहीती मिळाल्याने रविवार(२९ एप्रिल) रोजी हडपसर गाडीतळ भागात सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस नाईक दिपक पालखे,संदीप कदम,गणेश पोटे,रणजित निकम,दशरथ बनसोडे, पोलीस कॉनस्टेबल खबाले या तपास पथकाद्वारे सापळा लावून तिघानांही हडपसर गाडीतळ परीसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यात घेतलेले संशयीत तिनही आरोपी पुढीलप्रमाणे (१) दत्तात्रय बाबा ठोंबरे,वय १९वर्षे रा.कासुर्डी,फाटा, ता.दौंड, जि.पुणे) (२)आकाश तुळशिराम धनवे, वय २१वर्षे (रा.खामगांव फाटा, ता.दौंड, जि.पुणे. मूळ रा.गोमळ वाडा, ता.कासार शिरोळ, जि.बिड)(३)विक्रम उर्फ बाबू आनंदा सुळस्कर,वय २७, रा.भोंडवे वस्ती, कासुर्डी, ता.दौंड, जि.पुणे/मूळ रा.देवकर मावड़ी, ता.पुरंदर, जि. पुणे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्यातील मयत गणेश टेमगीरे हा दत्त्ता ठोंबरे याच्या बहीणीवर वाईट नजर ठेवुन होता व त्या कारणास्तव मयताने त्यास यापूर्वी मारहाण केली होती तसेच घटनेच्या दिवशीही मयत दत्ता डोंगराच्या बहिणीबद्धल वाईट बोलू लागल्याचा राग आल्यानेच त्यास लोखंडी रॉडलाकडी दांडके व दगड डोक्यात टाकुन ठार मारल्याची कबुली दिली आहे.

तिनही आरोपींना गुन्ह्यात अटक केले आहे.अटक आरोपी न्यायालयात समक्ष हजर करून आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक तपास करणार असल्याचे यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.


Saturday, April 28, 2018

जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या



D NEWS LIVE UPDATES युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवक कार्यकर्ते रॉकी ऊर्फ राकेश राळेभात या दोघांची तीन अज्ञात व्यक्तींनी आज सायंकाळी साडे सहाच्या सुमारास येथील बाजार समिती कॉम्प्लेक्‍स समोर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. घटनास्थळी वापरण्यात आलेली नऊ व एक जिवंत काडतुसे सापडली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Thursday, April 26, 2018

शिक्षकाने लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून एक मित्र एक वृक्षला ५० झाडांची केली मदत


एक मित्र एक वृक्ष चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुथा व ग्रुप मेम्बर्स अंकुश धायगुडे यांच्या  लग्नकार्यात त्यांच्याकडून वृक्षारोपणासाठी रोख स्वरुपात मदत स्वीकारताना.

D NEWS LIVE 

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी चौफुला (नवीनगाव) येथील शिक्षक अंकुश धायगुडे व त्यांच्या परिवाराने सत्कार व फटाक्यांना लागणारा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपणासाठी एक मित्र एक वृक्ष या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला ५० वृक्ष दान करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण तयार करून दिला आहे.अनेक गोष्टी शिकवताना मुलांना आपण फक्त सांगत असतो.त्याचे अनुकरण केले तर त्याचे रुपांतर हे प्रत्यक्षात यायला वेळ लागत नाही.वृक्ष तोडीमुळे या बकाल झालेल्या रन-रणत्या उन्हात सावलीची उब हरवत चालली आहे.लग्न कार्यासाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करण्यासाठी एक मित्र एक वृक्ष या संस्थेला मी मदत केली आहे.आपणही अशाच प्रकारे सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजचे देणे लागतो या उद्देशाने समाजहिताचे कार्य करणे खूप महत्वाचे आहे असे यावेळी अंकुश धायगुडे यांनी सांगितले.
एक मित्र एक वृक्षचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी यावेळी संस्थेच्या वतीने धायगुडे यांचे आभार मानले व त्यांनी आव्हान केले आहे कि,वृक्ष दाता हा आपल्या पासूनच तयार झाला पाहिजे म्हणून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या वृक्षरोपण कार्यासाठी पुढे यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.   


Monday, April 23, 2018

मुलांनी शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची आवड निर्माण करावी- संतोष परदेशी

जागतिक पुस्तक दिनानिमित्त आर.एम.धारीवाल विद्यानिकेतन प्रशाला व ज्युनियर कॉलेज कोंढापुरी या ठिकाणी मराठी अभ्यासक संतोष परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : जागतिक पुस्तक दिनानिमित्त आर.एम.धारीवाल विद्यानिकेतन प्रशाला व ज्युनियर कॉलेज कोंढापुरी या ठिकाणी मराठी अभ्यासक संतोष परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना परदेशी म्हणाले की, "ग्रंथ हेच गुरु" या उक्तीप्रमाणे ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.माहिती संप्रेषण तंत्रज्ञान युगात वावरत असताना साहित्यिकांनी निर्माण केलेले वेगवेगळे लिखानरुपी पुस्तके आपणासाठी ठेवा आहे.या पुस्तकातून मिळालेले ज्ञान आपणास समृद्ध बनवते.मिळालेल्या अवांतर वाचनातून माणसाची विचारशक्ती,कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन आपण शालेय जीवनापासून केले पाहिजे व ही पुस्तके रद्दीमध्ये न विकता त्याचे जतन करणे गरजेचे आहे.यावेळी वेगवेगळ्या साहित्यिकांच्या पुस्तकांची माहिती त्यांनी दिली.तसेच पुस्तकांचे पूजनही करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य पी.एम. दौंडकर होते.तसेच बालाजी खराटे,रूपाली नलावडे,हरीभाऊ अढागळे, शकिला शेख,संजयकुमार,आनंदा गोंडे, बापु खारतोडे,मनोज कोल्ले,सोनाली माने,कार्तिक कुमार सपकाळ, चंद्रकांत भोजणे,रहात अफरोज,राजेंद्र धुमाळ,मीना कुलकर्णी,दत्तात्रय भोसले,अर्जुन भूमकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू खारतोडे यांनी केले तर आभार मनोज कोल्हे यांनी मानले.

Saturday, April 21, 2018

१५ खेळाडूंना क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी लवकरच पाठवणार : नंदकुमार पवार


संगम क्रिकेट क्लब ठरला वाघेश्वर चषक २०१८ चा विजेता 
१५ खेळाडूंना क्रिकेट अकॅडमीमध्ये लवकरच प्रशिक्षणासाठी पाठवणार : नंदकुमार पवार 



डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधीछत्रपती संभाजी महाराज युवा फेडरेशन आणि VCC  यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवगण फराटा येथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वॉर्ड रचनेनुसार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध्येमध्ये एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला.लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी आप-आपल्या परीने खेळ दाखवला.
या स्पर्ध्येमध्ये प्रथम पारितोषिक विजेता संघ ठरला वॉर्ड क्रमांक 3 चा संघमालक असलेल्या सुनील शितोळे देशमुख यांचा संगम क्रिकेट क्लब,दुसर्या क्रमांकाचा विजेता ठरला तो संघमालक पंडितराव फराटे यांच्या वॉर्ड क्रमांक 6 च्या VCC  क्रिकेट क्लबने त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला फायटर क्रिकेट क्लब या संघाचे संघमालक होते सुधीर मचाले वॉर्ड क्रमांक 2 आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षिस मिळवलं ते वॉर्ड क्रमांक एक चे संघमालक गोवर्धन चव्हाण यांच्या मालकीचा असलेल्या बालाजी क्रिकेट क्लबने तसेच या स्पर्धेमद्धे शिस्तबद्ध आणि लहान वयातील खेळाडूंनी चांगला खेळ केला त्याबद्दल राहुल थोरात यांच्या मालकीचा असलेल्या शिवाजी चौक या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.अशा प्रकारे विजेते संघ होते.त्याचप्रमाणे या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नाईन स्टार क्रिकेट क्लब चा कर्णधार संदीप गिरे याची निवड झाली.सर्वोत्कृष्ट फलंदाज दीपक चौगुले,सनी घोगरे यांची तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून.गणेश राऊत याची निवड झाली.कमी वयामद्धे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अशी अष्टपैलू कामगिरी करणारा रणजित शंकरराव फराटे याची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे या स्पर्धेमधील उत्कृष्ठ झेलचे बक्षीस सादिक बालगिर याना देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी  सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी भरघोस मदत केली.यामद्धे प्रथम पारितोषिक पुढील प्रमाणे राहुल दादा तावरे(शिवरुद्र कन्ट्रक्शन) रु.1,1,111 व्दितीय पारितोषिक बंडू तात्या शेलार,शंभू संदीप जगदाळे,मच्छिंद्र सरोदे रु.8,888 तृयीय पारितोषिक अभिषेक दादा दरेकर,अमोल जगताप, राम जगताप रु.7,777 चतुर्थ पारितोषिक सागर नाना फराटे,भूषण शितोळे रु.5,555 या स्पर्धेसाठी चषक सौजन्य गावचे उपसरपंच सुभाष पाटील फराटे यांनी दिले.तसेच मॅन ऑफ द सिरीज संतोष नागवडे रु2100 त्याचप्रमाणे जगदीश गायकवाड, राजू कांबळे,योगेश भैय्या फराटे, गोवर्धन चव्हाण, या सर्वांनी वैयक्तिक बक्षीसे दिली.त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जाहिरात सौजन्य म्हणून दत्ता कदम (हर्षद पेट्रोलियम), राहुल शेठ सुराणा (हॉटेल आनंद भुवन),सुधीर मचाले (हॉटेल शिवरत्न) स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य हनुमंत फराटे इनामदार आणि देविदास थोरात यांनी दिले.तर प्यावेलीयन सौजन्य.प्रशांत फराटे(ओम कन्ट्रक्शन) आणि बबनशेठ पाटोळे(हॉटेल राजमुद्रा) स्पर्धेमद्धे पंच म्हणून काम पाहिले ते सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील फराटे,राजू पवार, प्रकाश गव्हाणे,पप्पू चौगुले, राहुल गिरे यांनी काम पाहिले.स्कोरर म्हणून किसन भोसले, सुजित थोरात,सोहेल सय्यद यांनी समालोचनाची भूमिका पार पाडली.तंटा मुक्तीचे अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे, नंदकुमार पवार, हनुमंत फराटे इनामदार,प्रसाद कटारिया,राहुल तावरे ई मान्यवराचे सहकार्य मोलाचे लाभले.श्री छत्रपती संभाजी महाराज युवा फेडरेशन आणि VCC यांच्या वतीने नंदकुमार पावर यांनी मनापासून सर्वांचे आभार मानले.



Wednesday, April 18, 2018

सॅनेटरी नॅपकीन बाबत ग्रामीण भागात सागर धुमाळ व सौ मिनाक्षी धुमाळ यांचे प्रबोधन

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : स्त्री स्वाभिमान हा प्रोजेक्ट भारत सरकारने महिलांसाठी घेतलेला उपक्रम आहे. जो ग्रामीण भागातील महिलासाठी स्वच्छ व निरोगी पॅड स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी CSC मार्फत राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान hygine पॅड जास्त प्रमाणात वापरले जावे.अजूनही 82% ग्रामीण भागातील महिला कापडाचा वापर करतात.ज्या चुकीच्या पद्धतीमुळे Cervical कॅन्सर सारख्या आजारांना बळी पडावे लागते.परदेशी ब्रँडेड Saniatory नॆपिक्सन जरी बाजारात उपलब्ध असले तरी ते सर्वसामान्य महिलेला घातक ठरू शकतात. कारण त्यामध्ये Chemical चा वापर व Cotton चा वापर ज्यास्त असतो. हे Cotton कंपनी स्टोरेज करण्यासाठी कीटक नाशकांचा वापर करते आणि आशा Cotton चा वापर करून हे पॅड बनविले जाते.ज्यामुळे इन्फेक्शन व Cervical Cancer चे होण्याचा संभव वाढतो. या सर्व गोष्टी लक्षात आल्यामुळे भारत सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक साधनाचा वापर करून हे पॅड बनविण्यात येते.जसे की, झाडाच्या बुंध्या पासून हे मटेरिअल बनविले जाते.ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल मटेरियल वापरत नाहीत.आणि हे पॅड पूर्णपणे हॅन्ड मेड असून ते 99.9% निर्जंतुक करून पॅकिंग केले जाते शिवाय याची किंमत ब्रॅण्डेड कंपनी पेक्षा निम्या किमतीत उपलब्ध आहे.भारत सरकारने सिद्धिविनायक कॉम्पुटर चे संचालक सागर धुमाळ व सौ मिनाक्षी धुमाळ यांचा दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भारतात अशा प्रकारचे Saniatory नॅपकिन बनविणारे फक्त 15 युनिट कार्यान्वित आहेत ज्या मध्ये केडगावच्या युनिटचा 3 क्रमांक लागतो.ही बाब पुणे जिल्हा व दौंड तालुक्यासाठी अभिमानस्पद आहे.

Tuesday, April 17, 2018

याञा उत्सवात होणारी भांडणे ठरताहेत डोकेदुखी !


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: गावातील काही मंडळी याच याञा उत्सवांत गटातटाचे भांडण उकरून काढतात.यातून याञा उत्सवाला गालबोट लागते.पोलीस प्रशासनाने अशा घटना घडू नयेत यासाठी आखीव–रेखीव प्रयत्न करण्याची गरज आहे.सध्या राज्यभर गावागावांतील याञा,जञा,उरुस,सुरु आहेत.ग्रामदैवतेचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व गावातील मंडळी एकञ येत असल्याचे चिञ सर्वत्र पाहायला मिळते.माञ गावातील काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थापायी याच याञा  उत्सवांत गटातटाचे भांडण उकरून काढतात.यातून याञा उत्सवाला गालबोट लागते.शिवाय भांडण तंट्यामुळे अनेकांना कोर्टाच्या पायर्या चढाव्या  लागतात.तर काहीची गावात बदनामी होते.भांडण पेटविणारे माञ गुन्हा दाखल झालेल्या तरुणांसाठी जामिन होण्यासाठी पळापळ करतात.ही बाब आता तरुणांनी लक्षात घेऊन तरुणांनी आपले वर्तन सुधारण्याचा प्रयत्न केला पाहीजे.गावातील काही जेष्ठांनी व पालकांनी अशा घडूच नयेत म्हणून या याञा काळात आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.वर्षातून एकदा प्रत्येक गावगाड्यात ग्रामदैवतेचा याञा उत्सव मोठ्या दिमाखात पार पाडण्याचा प्रयत्न गावातीलच याञा कमिटी करत असते.परंतु काही मंडळी एकमेकांची जिरवण्याच्या नादात विरोधासाठी विरोध करण्यासाठी काही तरुणांना याञा उत्सवात धुडगुस घालण्यास प्रोत्साहन देत असतात.ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्यात छबिण्याच्या कार्यक्रमात एकमेकांकडे खुन्नशीने पाहणे,तमाशा,आर्केस्टा किंवा इतर करमणुकीच्या कार्यक्रमात धांगड-धिंगा करून कार्यक्रम बंद पाडणे,कुस्त्याच्या आख्याड्यात विनाकारणच खोडा घालण्याचा प्रयत्न करणे,मागील जुने भांडण उकरून काढून शिवीगाळ करण्याच्या  घटना अनेक गावांत प्रत्येक वर्षी घडतात.यातुन मोठे भांडण घडले तर हाणामारीच्या घटनेतुन अनेक जणांवर गुन्हे दाखल होतात.यामध्ये सामान्य कुटुंबातील युवकांचा,तरुणांचा समावेश असल्याने पुढारपण करणारी मंडळी किंवा पडद्यामागुन भांडण पेटविणारे माञ या प्रकरणात कुठेही आढळुन येत नाही.त्यामुळे तरुणांनी याञा उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रमात कायदा व सुवस्थेचे भान राखणे गरजेचे आहे.अशा घटनामुळे तरुणांच्या पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.काही गावामध्ये वैयक्तिक बांधावरून चाललेले वाद याञा काळात काढले जातात. 
भांडणाची कारणे
याञा उत्सवात गावातील सत्ताधारी पक्ष बहुतेकदा सहभागी असतो.ही बाब दुसऱ्या गटातटाच्या राजकारणात दुसऱ्या गटाला पटत नाही.त्यामुळे याञा उत्सवात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो.करमणुकीच्या कार्यक्रमात तर काही युवकांना गोंधळ घालण्यासाठी मुद्दामच भडकावले जाते.यातुन काही तरुणांवर गुन्हे दाखल होताता.कुस्तीच्या आखाड्यात किंवा तमाशाच्या कार्यक्रमात दारू पिऊन मुद्दाम घुसणे,पंचापेक्षा बाहेरच्या लोकांनीच कुस्तीच्या निकालासाठी आग्रह धरणे.याञा उत्सवाच्या हिशोबात मुद्दाम गोंधळ घालणे,याञा उत्सवात मुद्दाम बेफाम दुचाकी चालवणे,मुलीच्या छेडछाडीच्याही घटना घडतात.तर कधीकधी याञा कमिटीने जमाखर्चाचा हिशोब न देणे यावरुन उत्सवात गोंधळ घातला जातो.त्यामुळे याञा उत्सव साजरा होण्याऐवजी भांडण तंट्यावरच अधिक चर्चा होते.काही गावामध्ये तर याञेच्या काळात दोन गटात भांडण व्हावे.म्हणून तिसरा गट एकमेकांची मानहाणी करणारी पञके अज्ञात व्यक्तीकडून फेकतो.ही बाब अत्यंत गंभीर असुन यातुन गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.अशा लोकांमुळे गावातील उत्सवाला देणगीदारही देणगी देण्यास टाळाटाळ करतात.अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला.तर त्यांना आयुष्यभर त्याची झळ सोसावी लागते.
कायदा सुवस्थेसाठी विशेष प्रयत्न
 याञा उत्सव शांततेत पार पाडणे ही सर्वात महत्त्वाची भुमिका पोलिस प्रशासनाची असते.परिणामी पोलिस प्रशासनावर काही वेळेस हल्ले होत असल्यामुळे पोलिस बंदोबस्त द्यावा तरी किती प्रश्न प्रशासनाला पडतो.याञा भरविताना वादविवाद टाळण्यासाठी मंनोरंजन कार्यक्रमाऐवजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संपूर्ण राञभर तमाशाचे आयोजन केल्यामुळे पोलिस प्रशासन राञी १० नंतरच्या कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नसल्याने झालेल्या भांडणाला याञा कमिटीच जबाबदार आहे असे चिञ सर्वत्र पाहायला मिळते आहे.भविष्यात तमाशा मंडळे  फक्त गावात होणाऱ्या भांडणामुळे बंद पडतात कि काय अशी शंका उपस्थित होत आहे.

Saturday, April 14, 2018

ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उभे करण्यासाठी वाघेश्वर चषकाचे आयोजन





डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.१४ एप्रिल २०१८
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे श्री वाघेश्वर चषक २०१८ या चषकाचे व्ही.सी.सी व श्री छत्रपती संभाजी महाराज युवा फेडरेशन चे अध्यक्ष नंदकुमार पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूनां एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
आज १४ एप्रिल रोजी महामानव,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शृंखलेचे उदघाटन मांडवगण फराटा गावचे सरपंच शिवाजी अण्णा कदम, उपसरपंच सुभाषराव फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष हणूअण्णा फराटे, राहुल दादा तावरे, दत्ता नाना कदम,कार्याध्यक्ष गोवर्धन चव्हाण ,उपाध्यक्ष  योगेश भैय्या फराटे,सचिव राजू भाऊ कांबळे, संदीप गिरे, लक्ष्मण राठोड,पंड़ीत फराटे, सुधीर मचाले,सागर नाना फराटे,वैभव दादा फराटे,राम जगताप,अमोल जगताप,कदम नाना,बंड़ु तात्या शेलार व आदी मान्यवर उपस्थित होते. या शृंखलेमध्ये जे खेळाडू चांगला खेळ दाखवून कौशल्य दाखवतील त्या १५ खेळाडूंना पुणे या ठिकाणी क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी त्यांना पाठविले जाणार आहे.असे यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराज युवा फेडरेशन चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले.