Tuesday, December 31, 2019

सभापतीपदी आशा शितोळे व उपसभापतीपदी नितीन दोरगे यांची निवड !


दौंड प्रतिनिधी ता.३१ डिसे      
दौंड पंचायत समितीच्या सभापतीपदी आशा शीतोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापतीपदी नितीन दोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमंत पाटोळे उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांनी काम पहिले.तर यावेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे,माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार,दिलीप हंडाळ,रामभाऊ टुले,विरधवल जगदाळे,वैशाली नागवडे,राणी शेळके,लक्ष्मण दिवेकर,नानासो फडके,मधूकर दोरगे,दौलत ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Monday, December 30, 2019

बावीस वर्षानी अनुभवले विद्यार्थी जिवन !


केडगाव प्रतिनिधी ता.३० डिसें   

नाथनगर विद्यालय बोरिपार्धी ता.दौंड येथे सन 1997 च्या वेळी दहावीत असणारे विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनी भेटले.
अनेक दिवसापासून सर्वजण एकत्र येण्यासाठी  प्रयत्न करत होते.परंतु दहावी झाल्यानंतर प्रत्येक जणाचे मार्ग वेगळे झाले होते.प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे असल्याने सर्वांना संपर्क साधने अवघड झाले होते.परंतु यासाठी दिलीप साळुंखे यांनी सर्वांचे फोन नंबर मिळवून एक ग्रुप तयार केला.त्या माध्यमातून सर्वजण चौफुला येथे बोरमलनाथ येथे जमले होते.परंतू बावीस वर्षानी प्रथम भेटणार असल्याने बावीस वर्षात सर्व जणामध्ये बदल झाला होता.
काहीना हा अपल्या वर्गात होता असे वाटत नव्हते.इतका बदल पहावयास मिळाला ज्या वेळी सर्व जण आले.त्यावेळी इयत्ता दहावी नंतर कुणी काय केले. याबद्दल गप्पा झाल्या जुन्या आठवणीना पुन्हा उजाळा मिळाला.सर्वजण पुन्हा शाळेत घडलेल्या घटनेत रममाण झाले की ते आता विद्यार्थी नाहीत याचे देखिल भान विसरले.सर्वजण इतके गप्पात रममाण झाले की दिवस कसा निघुन गेला हे कळले नाही.
यापुढे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुख दुखात सहभगी होण्यासाठी हा ग्रुप बनवला आहे. तब्बल बावीस वर्षानी भोजनाचा आंनद घेतला या पुढे ग्रुपच्या माध्यमातून समाज उपयोगी कामे करण्याचा निर्णय ग्रुपने घेतला आहे.

Sunday, December 29, 2019

केडगाव | गळ्यातील दागिने हिसकावून चोरटे फरार !

केडगाव प्रतिनिधी ता.२९ डिसें
     केडगाव ता.दौंड मधील धक्कादायक घटना शिक्षिकेच्या गळ्यातील अडीच  तोळ्याचे गंठन हिसकावुन चोरटे फरार झाले आहे.
केडगाव ता.दौंड येथील आशा अनिल बाप्ते  वय वर्षे 56 रा.सरदार नगर केडगाव स्टेशन या जवाहरलाल विद्यालय येथे शिक्षीका आहेत. (ता 29 डिसेंबर 2019) रोजी सकाळी 11•45 वा च्या सुमारास आशा बाप्ते या घरामध्ये असलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी गेल्या होत्या कचरा टाकुन घराकडे जात असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकल वर बसून त्यांच्या समोर आले.
त्यांच्यातील मोटार सायकल वर पाठिमागे बसलेला इसम मोटार सायकल वरून उतरून त्याच्या जवळ येऊन तुम्हांला पत्रिका द्यायची आहे.
आमच्यातील अणखी एक जन पलिकडील लाईनला पत्रिका वाटुन येत आहे.आम्हाला तुमच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्या सारखे दागिने करायचे आहे असे म्हणत त्याने अचानकपणे त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन जबरदस्तीने गळ्यातून हिसका मारत तोडले.
पळत जाऊन मोटार सायकल थांबलेल्या इसमाच्या पाठिमागे बसून दोघेही मोटार सायकल वरून पळून गेले.
मोटरसायकल वर पुढे बसलेल्या चोरट्यांचे वर्णनं वय अंदाजे 34 ते 38 वर्षं असुन अंगाने जाड जुड,रंगाने काळा अंगात काळे रंगची जरकींन पँट असा त्याच्या पेहराव आहे.
 गंठन हिसकावुन नेलेल्या इसमाचे वय अंदाजे 30 ते 32 असुन तो रंगाने गोरापान अंगात टी शर्ट निळ्या रंगाची जीन्स पँट असा पेहराव या घटनेचा अधीक तपास पोलिस सहायक निरीक्षक धनंजय कापरे,पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.

Saturday, December 28, 2019

नानगांव ग्रामपंचायतचा "आमचा गाव आमचा विकास" आराखडा रेडी !



दौंड प्रतिनिधी : ता.२९ डिसें

आमचा गाव आमचा विकास २०२०-२१ ते २४-२५ या पंचवार्षिक कार्यकाळात राबविण्यात येणाऱ्या विकास आराखडयासाठी ग्रामसभेचे ता.२८ रोजी आयोजन करण्यात आले होते.
मानव विकास निर्देशांक, शिक्षण, आरोग्य,उपजीविका, महिला बालकल्याण, मागासवर्गीय व इतर कामाबाबत विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच मंजुरी साठी प्रस्ताव पुढे पाठवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पोपट शेलार यांनी दिली आहे.
नानगाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ५६२९ लोकसंख्या आहे.
जिल्हा परिषद यांच्या माहितीप्रमाणे लोकसंख्येच्या आकडेवारी नुसार विकास कामांची मांडणी करण्यात येत असते.
दौंड तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक आराखडा बाबत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु अनेक ठिकाणी वादात ग्रामसभेचा समारोप झालेला दिसून आला आहे.तसेच नानगांव ग्रामपंचायत येथे ग्रामसभा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी केडगाव पोलीस औट पोस्टचे पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे हे यावेळी उपस्थित होते.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व ग्रामसभा शांततेत पार पडली.
ग्रामसभेसाठी यावेळी सरपंच पुष्पा गुंड,उपसरपंच सुनीता रासकर,सी.बी.खळदकर,विश्वास भोसले,पोपट लव्हे,विकास रासकर,अशोक खळदकर, विष्णू खराडे,विशाल शेलार,संजय शेलार व सर्व महिला सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.

Sunday, December 15, 2019

कुसेगाव येथे देव-दानव युद्धाचा थरार !


पाटस प्रतिनिधी : ता.१५ डिसें २१०९

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील कुसेगाव येथे शुक्रवारी (ता
१३) रोजी  देव-दानव युद्धाचा थरार पाहायला मिळाला. 
निमित्त होतं भानोबा देवाच्या यात्रेचं.बोल भानोबाचं.. चांगभलं.. म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी कुसेगाव (ता.दौंड) येथे भानोबा देवाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या दिवशी भानोबा देवाच्या गाव प्रदक्षिणेच्या वेळी देव-दानव यांच्या प्रतिकात्मक युद्ध झाले. रणभूमीवर दानवांचे मुडदे पडले.
श्री क्षेत्र कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक,ओलांडा,पोवाडा, कुस्त्या,लोकनाट्य आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला होता.
अशी आहे भानोबा देवाची आख्यायिका..भानोबा देव हे (कोयाळी,ता.खेड) येथे दुष्काळ असल्यामुळे (मंगळवेढा,जि.सोलापूर) येथे आपली गुरे चरण्यासाठी गेले असता तेथे रामोशी व मातंग समाज यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन भानोबा देवाचा येथे वध करण्यात आला असा पुराणात उल्लेख आहे.तसेच जुने जाणकारही सांगतात.याचाच बदला म्हणून या यात्रेत रामोशी व मातंग समाज बांधवांमध्ये भानोबा देवाच्या यात्रेच्या पालखी सोहळ्यात प्रतिकात्मक युद्ध केले जाते. युद्धभूमीवर प्रतिकात्मक मुडदे पडतात.युद्धभूमीवर पडणाऱ्या व्यक्ती तब्बल दोन तास बेशुद्धावस्थेत असतात. यावेळी भानोबा देवाचा घाम बेशुद्ध पडणाऱ्या व्यक्तिवर टाकून कानामध्ये भानोबाचं चांगभलं बोललं जातं.तेव्हा कुठे बेशुद्ध व्यक्ती शुद्धीवर येत असते.ही आख्यायिका पाहण्यासाठी व देव दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी संपूर्ण महाराष्ट्रातून येथे उमडत असते.

Saturday, December 14, 2019

दौंडकराच्या जीवाशी खेळू नका आमदार खासदार जागे व्हा !

दौंड प्रतिनिधी : ता.14 डिसें 2019

दौंड शहरातील उड्डाण पूल ते गोल राऊंड हा रहदारीचा मुख्य रस्ता नियमानुसार केला जात नाही.नियमानुसार हा रस्ता २४ मीटरचा हवा होता परंतु काही ठिकाणी १८ मीटर तर काही ठिकाणी १२ मीटर चा केला आहे.
वास्तविक पाहता हा रस्ता मोठा होणे गरजेचे आहे.मात्र काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता लहान केल्याची अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान व दौंड नगरपरिषदचे नगरसेवक राजेश गायकवाड यांनी दिली आहे.

हा रस्ता मोठा होण्यासाठी तोंडी व लेखी स्वरूपाची सूचना प्रशासनाला केली आहे.परंतु प्रशासन गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
येथील अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता मोठा झाला पाहिजे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

(ता.१३) रोजी तडका हॉटेल समोर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र  येऊन स्थानिक नागरिकांना बरोबर प्रशासनाच्या विरोधात दौंडकर जागे व्हा रस्ता रुंदीकरणासाठी एकत्र या दौंडकराच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही,अतिक्रमण काढा दुर्घटना टाळा,'तेरी भी चूप,मेरी भी चूप',मायबाप सरकार जागे व्हा,आमदार खासदार जागे व्हा दौंडकरांच्या जीवाशी खेळू नका अशा स्वरूपाचे फलक हातात घेउन घोषणा बाजी यावेळी करण्यात आल्या होत्या.


यावेळी वासुदेव काळे,सचिन गायकवाड,राजेंद्र खट्टी,बबलू कांबळे,बादशहा शेख,ओसीम शेख,रुपेश होंकाडे,आबा होले, सचिन धोत्रे व आदी मान्यवर उपस्थित होते.