दौंड प्रतिनिधी : ता.३१ जुलै २०१९ दौंड तालुका राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल च्या वतीने महारष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मलठण येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शालेय विध्यार्थ्यांना वह्या,पुस्तके वाटप करण्यात आले.किशोरवयीन मुलीना डॉ.युवराज गोडसे व डॉ.वंदना मोहिते यांनी मार्गदर्शन केले.आहार पद्धत,महिला सबलीकरण या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.
ज्येष्ठांसाठी यावेळी डोळ्याचे चेकअप,रक्तातील साखर,मोतीबिंदू आरोग्य तपासणी करण्यात आली.अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी डॉ सेलचे तालुकाध्यक्ष डॉ प्रमोद रंधवे यांनी दिली.
यावेळी राष्ट्र्वादी कॉंग्रेस दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवदिप उंद्रे,गणेश थोरात,पंचायत समिति सभापती ताराबाई देवकाते,राष्ट्रवादी डॉ सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रमोद रंधवे,डॉ.वंदना मोहिते,डॉ.युवराज गोडसे तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्र्वादी डॉ सेल दौंड तालुकाध्यक्ष डॉ प्रमोद रंधवे यांनी केले होते.