Saturday, July 13, 2019

देलवडीत "हर गांव हमारा" ला प्रतिसाद !


देलवडीत "हर गांव हमारा" ला प्रतिसाद !

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.१३ जुलै २०१ 

एचडीएफसी बँकेकडून नागरिकांना साठी प्रशिक्षण शिबिर

एचडीएफसी बँकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या हर गांव हमारा या कार्यक्रमा अंर्तगत दौंड तालुक्यातील देलवडी येथे नागरिकांनासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांना आर्थिक साक्षरता  डिजिटल उत्पादने व बँकेच्या अन्य सुविधांची माहिती मिळावी यासाठी बँकेच्या वतीने देश पातळीवर अनोख्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक सक्षम बनविन्यासाठी बँकेच्या वतीने हे पाऊल उचलन्यात आले आहे.
बँकेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
एचडीएफसी बँकेच्या आयोजीत करण्यात आलेल्या शिबिरास शाखा व्यवस्थापक प्रसाद ठाकूर, परमेश्वर अवघड,प्रदीप बनकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच योजनांची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
बचत बँक खाते,सुकन्या योजना,सामाजिक सुरक्षा योजना,फिक्स डिपॉजिट,कृषी कर्ज,किसान गोल्ड कार्ड,कृषी कर्ज,नेट बँकिंग,मोबाइल बँकिंग आणि डिजिटल उत्पादनाची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी देलवडी गावातील नागरिक,दुकानदार,शेतकरी,महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


"ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक साक्षर बनविण्यासाठी एचडीएफसी बँकेद्वारे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.'हर गाव हमारा या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची नाळ बँकेशी जोडली जात आहे.आधुनिक युगातील बँकिंग क्षेत्रातील डिजिटल पद्धतीद्वारे ग्राहकांच्या साक्षरतेवर भर दिला जात आहे.बँकेच्या ५३ टक्के शाखा या निमशहरी भागात आहेत.संपूर्ण भारतात पाच हजार शाखांचा टप्पा नुकताच पार केला आहे.या उपक्रमास ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे."
           ज्ञानेश्वर चव्हाण
            कृषी अधिकारी