Wednesday, July 24, 2019

पाटस येथील अंबिकानगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एच डी एफ सी बँकेच्या वतीने वृक्षारोपण !


पाटस येथील अंबिकानगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एच डी एफ सी बँकेच्या वतीने वृक्षारोपण !

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.२५ जुलै २०१९

वृक्ष लागवडी पेक्षा वृक्ष तोड ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.वृक्ष संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.याच उद्देशाने बँकिंग क्षेत्रातील अग्रस्थानी असलेली एच डी एफ सी बँक दौंड शाखा यांच्या वतीने अंबिका नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
बँकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या योजनेचे स्वागत करून पदाधिकारी यांचे आभार यावेळी सरपंच संभाजी खडके व मुख्याध्यापक शहजी गिरे यांनी मानले.
 यावेळी पाटस गावचे सरपंच संभाजी खडके,केंद्रप्रमुख वनवे, मुख्याध्यापक शहाजी गिरे,सह शिक्षिका गावडे,एच डी एफ सी बँकेचे पदाधिकारी,पालक वर्ग उपस्थित होते.