केडगाव प्रतिनिधी ता.१९ जुलै
मटका देतोय लोकांना झटका !
साहेबांच्या आशीर्वादाने अवैध धंदे तेजीत...
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी हद्दीत सोरट,आँनलाईन मटका,जुगार सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यात आँनलाईन मटका चालु आहे.
मटका खेळणाऱ्या लोकांचा मटका बसत नसल्याने लोकांना आता झटका बसु लागला आहे. एवढे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालु आहे.
अवैध धंदे हे साहेबांच्या आशिर्वादाने चालु असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
कोणत्या साहेबांच्या आशिर्वादाने धंदे चालु आहे याची चर्चा केडगाव परिसरात जोर धरु लागली आहे. यामुळे अनेक अवैध धंदेवाले उदयास येऊ लागले आहे. कमी श्रमात जास्त पैसे मिळु लागल्याने तरूण वर्गात चढा ओढ सूरु झाली आहे. तरूण पिढी व्यसनेच्या आहारी जाऊ लागली आहे. त्यामुळे अशा अवैध् धंद्यावर ग्राहक कल्याण फाऊंडेशन यांनी यवत पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन त्या निवेदनात कारवाईची मागणी केली आहे.निवेदन देऊन एक महिना उलटला तरी कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याची खंत ग्राहक फाऊंडेशन मंचाच्या वतीने केली आहे.